अतुल सावे म्हणजे मराठवाड्यातील भाजपचा आश्वासक आणि कट्टर हिंदुत्ववादी चेहरा. ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः’ या ब्रीदवाक्याप्रमाणे त्यांचे कर्तृत्व दिसून येते. यशस्वी उद्योजक असूनही वडिलांना दिलेल्या शब्दासाठी आणि लोकहिताच्या तळमळीतून त्यांचे सामाजिक, राजकीय कार्य अखंड-अविरत सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ते इतर मागास, बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आज दि. २६ फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने
Read More
म्हाडा कोंकण मंडळाच्या विरार बोळींज वसाहतीतील टप्पा क्रमांक १,२ व ३ मधील अल्प, मध्यम उत्पन्न गटातील ९४०९ सदनिकाधारकांकडून आकारण्यात येणारे मासिक सेवाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेवाशुल्क कमी करण्याबाबत वसाहतीतील रहिवाशांकडून व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. त्याबाबत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे व म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या संयुक्त बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सदर प्रकल्पामध्ये आजतागायत प्रत्यक्ष ताबा घेतलेल्या व यापुढे
प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यात येतात. मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व अहिल्याबाई होळकर धनगर वस्ती योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना घरकुल मिळाली पाहिजेत.
ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ सुरू करण्यात आल्याची माहिती इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी बुधवार, दि. १३ डिसेंबर रोजी दिली. आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट लाभ देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल, असेही त्यांनी सांगितले.