Media

बांगलादेशातील कट्टरपंथींसाठी कथित फॅक्टचेकर मोहम्मद झुबेर धावला

Bangladesh Attack बांगलादेशात सुरू असलेल्या अराजकतेनंतर दुसरी लढाई सोशल मीडियावर सुरू झाली आहे. बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंविरोधात अमानुषपणे अत्याचार केल्याच्या व्हिडिओंचा महापूर आला आहे. कधी दुकानांची तोडफोड तर कधी घरात घुसण्याचा प्रयत्न, कट्टरपंथींनी कुणाच्या घरात मुली आहेत का याचा ठावठिकाणा शोधत असल्याच्याही अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. या सोबत त्यांनी पुराव्यादाखल व्हिडिओही प्रकाशित केले आहेत. मात्र, भारतातील अल्ट न्यूजचा फाउंडर जो स्वतःला कथित फॅक्ट चेकर म्हणवून घेतो त्याने केलेला कारना

Read More

मी सकाळी मस्त आनंदात उठतो आणि तुम्ही अजून नाईन टू फाईव्ह जॉब करता : ऑरी

गेल्या काही काळात जितकी हिंदी सेलिब्रिटींची चर्चा होत नाही त्याहून जास्त चर्चेत ओरहान अवत्रामणी म्हणजे ऑरी असतो. प्रत्येक सेलिब्रिटीसोबत त्याचे फोटो असल्यामुळे तो सगळ्यांनाच कसा ओळखतो अशी चर्चा कायम चंदेरी दुनियेतील वर्तुळात रंगलेली असते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या अनंत आणि राधिकाच्या लग्न सोहळ्यातील सर्व कार्यक्रमातील त्याची उपस्थिती देखील लक्षणीय होती. मात्र, आता ऑरीला जरा नेटकऱ्यांच्या रागीट सुराचा सामना करावा लागणार आहे. कारण, ऑरीने नवीन हेअरस्टाइलचा फोटो शेअर करत त्यातील कॅप्शनमध्ये ९-५ काम करणाऱ्या चा

Read More

अतुल भातखळकर यांची भाजप माध्यम विभागाच्या केंद्रीय समन्वयकपदी नियुक्ती

कांदिवली पूर्व मतदारसंघातील आमदार अतुल भातखळकर यांची भाजपच्या माध्यम विभागाच्या केंद्रीय समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, दि. 23 जुलै रोजी याबाबत माहिती दिली. नुकत्याच पुण्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना “सडेतोड भूमिका व्यक्त करा, विरोधकांना ठोकून काढा,” अशी परवानगी दिली. त्या पार्श्वभूमीवर, परखड मते मांडणार्‍या आ. भातखळकर यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. बावनकुळे यांनी मंगळवारी

Read More

“तुम्ही बोलण्यातली सभ्यता…”, अविनाश नारकरांनी नेटकऱ्याला फटकारले

कलाकारांना सोशल मिडियावर कोणत्याही कारणाने ट्रोल करणं सुरुच असतं. कधी त्यांच्या राजकीय, सामाजिक मतांवरुन तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींवरुन त्यांना कायम टार्गेट केलं जातं. सध्या अभिनेते अविनाश नारकर यांना नेटकऱ्याने त्यांच्या डान्सवरुन ट्रोल केले आहे. अविनाश नारकर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या नारकर सोबत सोशल मीडियावरील ट्रेण्ड फॉलो करताना दिसत असतात. नुकताच अविनाश यांनी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. ज्यावर एका नेटकऱ्याने असभ्य भाषेत प्रतिक्रिया दिली असून नारकरांनी सडेतोड उत्तर दिलं.

Read More

म्हाडाही आता समाजमाध्यमांवर ऍक्टिव्ह

आज तरुणाईपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच समाज माध्यमांचं आकर्षण आहे. हेच ओळखून आजच्या डिजिटल युगात सर्व प्रशासकीय विभाग, मंत्री, राजकीय पक्ष आणि नेते, कार्यकर्ते समाजमाध्यमांमध्ये आपला आवाका वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याच माध्यमातून अनेक प्राधिकरण आणि सरकारी कार्यालये नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या थेट हाताळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र क्षेत्रविकास आणि गृहनिर्माण प्राधिकरण (म्हाडा)ने देखील समाजमाध्यमांवर झळकण्यासाठी मैदानात उडी घेतली आहे. नागरिकांना थेट सोशलमिडीयाच्या माध्यमातून म्हाडाशी

Read More

“पुन्हा छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नाही”, चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय

अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक अशा तीनही जबाबदाऱ्या लिलया पेलणारे चिन्मय मांडलकेर (Chinmay Mandalekar) यांनी आजवर ६ चित्रपटांतून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर आहे. परंतु, सोशल मिडियावर चिन्मय यांच्या मुलाचे नाव जहांगीर का आहे? यावरुन झालेल्या ट्रोलिंगमुळे चिन्मय मांडलेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ते छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचा निर्णय त्यांनी घेतला असून त्यासंदर्भात स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ देखील त्यांनी (Chinmay Mandalekar) सोशल मिडियावर

Read More

नव्या कायद्याने नियतकालिकांची नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन!

मुद्रित माध्यमांमध्ये पुस्तके आणि वृत्तपत्रांची छपाई आणि प्रकाशनाचा परवाना देणारा ब्रिटिशकालीन असलेला १८६७चा ‘प्रेस अ‍ॅण्ड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स अ‍ॅक्ट’ (PRB Act, १८६७) नुकताच केंद्र सरकारने पूर्णपणे रद्द केला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये संसदेने हा ‘पीआरबी अ‍ॅक्ट’ रद्द करून, त्याजागी ‘प्रेस अ‍ॅण्ड रजिस्ट्रेशन ऑफ पिरीऑडिकल्स अ‍ॅक्ट’ (PRP Act, २०२३) आणला आहे. या नवीन कायद्याची आणि त्याच्या नियमांची अंमलबजावणी दि. १ मार्च २०२४ पासून देशभर सुरू झाली आहे. वृत्तपत्रांच्या जागी आता ‘नियतकालिके’ (Periodicals) शब्दाचा सम

Read More

रात्री-अपरात्री घरात घुसून पीडितेची छेड काढणाऱ्या नदीमला चोप!

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाचे हात पाय दोरीने बांधलेले असून त्याच्या आजूबाजूला अनेक लोक दिसत आहेत. दरम्यान एका पीडित महिलेचा मदतीचा आक्रोश येत आहे. तसेच या व्हिडिओत मुस्लिम तरुणाला जमावाने मारहाण केल्याचे चित्र रंगवले जात आहे.इस्लामिक नावांसह ट्विटर अकाउंट्वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. "४ मार्च रोजी यूपीच्या मुझफ्फरनगरमध्ये जमावाने नदीम नावाच्या मुस्लिम तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्याचे हात पाय दोरीने बांधले. 'आ

Read More

आयपीओ अपडेट : आर के स्वामी कंपनीचा आयपीओ ४ तारखेपासून बाजारात दाखल,प्राईज बँड २७० ते २८८ रूपये प्रति इक्विटी समभाग

आर के स्वामी कंपनीचा आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर) हा गुंतवणूकदारांसाठी मार्च ४, २०२४ ला शेअर बाजारात खुला होणार आहे. आयपीओत ५ रूपये प्रत्येकी दर्शनी मूल्यावर इक्विटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या आयपीओची प्राईज बँड हा २७० ते २८८ रूपये प्रति समभाग (शेअर्स) इतका कंपनीकडून जाहीर करण्यात आला आहे. हे समभाग खरेदी करण्यासाठी किमान ५० इक्विटी समभाग खरेदी करण्याची अट ठेवण्यात आली आहे. त्याहून अधिक खरेदी करण्यासाठी ५० समभागात प्रमाणे खरेदी करावी लागणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओ पूर्व गुंतवणूकीची तारीख १

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121