ठाणे पालिकेच्या अखेरच्या सर्वसाधारण सभेत महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटे काढीत, शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती असल्याचे सांगून पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीला चांगल्याच मिरच्या झोंबल्या. “एकीकडे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख महाविकास आघाडी झालीच पाहिजे, असे म्हणत असताना महापौर मात्र सेना-भाजप नैसर्गिक युतीचे दाखले देत आहेत. त्यामुळे ठाण्याची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर की, महापौर नरेश म्हस्के यांच्या विचाररणीवर चालते? याचा खुलासा पालकमंत्री एकनाथ
Read More
घोडबंदर रोडसह ब्रह्रांड-पातलीपाडा भागातील तीव्र पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी भाजपाच्या प्रयत्नांना शिवसेनेकडून आव्हान दिले जात आहे. वाढीव पाण्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेची शिष्टमंडळे महापालिकेत धडकली असली, तरी महापौर नरेश म्हस्के यांच्या इशाऱ्यानंतरही घोडबंदर रोड परिसराला वाढीव पाणीपुरवठा मात्र अद्याप सुरू झालेला नाही. सध्या पाणीटंचाईचा प्रश्न कायम असून, श्रेयवादाच्या लढाईत घोडबंदर रोडचे पाणी अडकल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू झाली आहे. व या प्रकारावरून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.