(Gopichand Padalkar) सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधील मारकडवाडी गावात १० डिसेंबर रोजी महायुतीची सभा होत आहे. या सभेत जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
Read More
मुंबई : मारकडवाडी येथे ‘इव्हीएम’विरोधी आंदोलन कोणी घडवून आणले, हे जगजाहीर आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी या गावाला भेट देत विषय चिघळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक मतदार अत्यंत जागरूक असल्यामुळे त्यांची डाळ शिजली नाही. भाड्याच्या कार्यकर्त्यांना जमवून घेतलेली सभा त्यांना आटोपावी लागली. आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून, ज्या थापा मारून हे आंदोलन उभे करण्यात आले, त्याचा बुरखा फाटला आहे.
मुंबई : शरद पवार यांचा मी सन्मान करतो. त्यांना दीर्घ राजकीय अनुभव आहे, परंतु त्यांनी या वयामध्ये अशा प्रकारचा खोटारडेपणा करणे, जनतेला कन्फ्युज करणे अयोग्य आहे. एक प्रकारे ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान आहे, अशी परखड टिका भाजपाचे ( BJP ) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
ईव्हीएम मशीनविरोधात आंदोलन करणे हा तर भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या घटनेला विरोध आहे. जनतेने विचार करून महायुतीला निवडून दिले आहे. त्यांना तुम्ही एवढे अडाणी कसं समजू शकता? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधकांना केला आहे. शनिवार, ७ डिसेंबर रोजी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
(Markadwadi) माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्याबाबत घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांनंतर मतपत्रिकेवर मतदान करण्याची प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी घेतला. पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर मारकडवाडी येथील ग्रामस्थांशी चर्चा करुन जानकरांनी आपला निर्णय माध्यमांसमोर मांडला. जिल्हा प्रशासनाने तातडीने या गावात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.