सागरी सुरक्षा भक्कम करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत भाऊचा धक्का येथे नवीन गस्ती नौका तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मंगळवार, १७ जून रोजी मंत्री नितेश राणे यांनी या गस्ती नौकेची पाहणी केली. तसेच सागरी सुरक्षेला शासनाचे नेहमीच प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Read More
मुंबई : अवैध मासेमारीला लगाम लावण्यासह राज्याची सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी दि. ९ जानेवारी रोजीपासून राज्यातील किनारपट्टीवर ( Coastal line ) ‘ड्रोन’द्वारे नजर ठेवली जाणार आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री नितेश राणे यांनी तसे निर्देश दिले आहेत. राज्याला लाभलेल्या ७२० किमी किनारपट्टीवर ‘ड्रोन’द्वारे डिजिटल सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.
भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (आयएमईसी) भारताच्या सागरी सुरक्षेत आणि युरोप आणि आशियामधील मालाची जलद वाहतूक करण्यास हातभार लावू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी केले. भारतीय उद्योग परिसंघाच्या (सीआयआय) भारत-भूमध्य व्यापार परिषदेत ते बोलत होते.
‘युएनएससी’ सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात मोठी संस्था असून त्याच्या खुल्या चर्चेच्या अध्यक्षपदावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेली सागरी सुरक्षेची पंचसूत्री व त्यातून चीनला दिलेला इशारा नक्कीच महत्त्वाचा मानला पाहिजे.
२६ नोव्हेंबरला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला ११ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेचे अवलोकन केले पाहिजे. गेल्या पाच वर्षांमध्ये सागरी सुरक्षेमध्ये काय सुधारणा झाल्या, सध्याची परिस्थिती कशी आहे आणि येणाऱ्या काळात अजून काय जास्त सुधारणा करणे गरजेचे आहे. या सगळ्या विषयावर चर्चा होणे जरुरी आहे.
पाकिस्तानी कमांडो किंवा दहशतवादी गुजरातच्या कच्छमार्गे भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती भारतीय गुप्तचर संघटनेच्या हाती लागली आहे. यामुळे गुजरातमधील सर्व बंदरांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.