मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर लवकरच रंगभूमीवर पुनरागमन करत आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमांमध्ये आपली छाप उमटवल्यानंतर आता तो पुन्हा एकदा नाटकासाठी सज्ज झाला आहे. शशांक शेवटचा गोष्ट तशी गमतीची या नाटकात दिसला होता. अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकात त्याने लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्यासोबत काम केलं होतं. मात्र, या नाटकानंतर तो फारसा रंगभूमीवर दिसला नव्हता. आता तो ‘११ वपुर्झा’ या विशेष नाट्यप्रयोगात झळकणार आहे.
Read More
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. दीप प्रज्वलनानंतर श्रीफळ वाढवून नटराजाच्या चरणी नतमस्तक होत या महोत्सवाचा शुभारंभ झाल्याची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ दिग्दर्शक.वामन केंद्रे, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांसोबत नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे तसेच कार्यकारिणी सदस्य आणि नियामक मंडळ सदस्य उपस्थित होती. नाट्य