माओवाद्यांशी संबंध ठेवल्याच्या आरोपांवरुन अटकेत असलेल्या गौतम नवलखाचे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी संबंध असल्याचा आरोप एनआयएने केला आहे. आयएसआयचा एजंट सय्यद गुलाम नबी फई याच्याशी गौतम नवलखाचा संबंध असल्याचे एनआयएने विशेष न्यायालयात सांगितले आहे.
Read More
भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणात अटक करण्यात आलेले फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनावर अनेक प्रश्न उभे केले जात आहेत
प. बंगालमधील माओवाद्यांचे उगमस्थान असलेल्या नक्षलबारीची आजची काय अवस्था आहे, यावर या निमित्ताने प्रकाश टाकल्यास लाल रंगाचा तेथून अस्त का होऊ लागला आहे, त्याची कल्पना येईल.
स्टॅन स्वामीला अटक केल्याबद्दल माओवाद्यांसह विविध ख्रिस्ती, मुस्लीम संघटनांच्या नेत्यांना त्याचा पुळका आला आहे. स्टॅन स्वामी या फादरने काही गैरकृत्य केले, असे या मंडळींना वाटतच नाही! त्यामुळे या फादरच्या सुटकेसाठी देशाच्या विविध भागांमध्ये मोर्चे काढले जात आहेत, निदर्शने केली जात आहेत.
इतिहासातील काळी आणि त्याचबरोबर सोनेरी पानेही उजेडात आणणारे हे पुस्तक अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचक या सर्वांनी आवर्जून वाचायलाच हवे असे आहे.
एटापल्लीत ‘पंतप्रधान ग्राम सडक योजने’च्या कामावरीलवाहने पेटवून देण्यात आल्याची घटना दि. १३ मे रोजी घडली. माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात हैदोस घातला आहे. निवडणुकीच्या काळामध्ये वाढलेला माओवादी हिंसाचार अजून वाढतच आहे. त्यामुळे २३ मे रोजी येणाऱ्या सरकारपुढे माओवाद कसा संपवायचा, हे एक मोठे आव्हान असणार आहे. या लेखामध्ये आपण माओवाद्यांच्या विरुद्ध सुरक्षात्मक उपाय अजून मजबूत करता येतील, यावर विचार करू.
खूप आधीपासून माओवाद्यांनी शहरी भागात आपली पाळेमुळे प्रयत्नपूर्वक रुजवली आहेत. शहरी माओवादी गटातील काही म्होरक्यांना आता अटक झाली आहे. त्यामुळे समाजाला लागलेली ही कीड संपेल, अशा भ्रमात कोणीच राहू नये. अजूनही प्रकाशात न आलेले, तपास यंत्रणेच्या कक्षेत न आलेले असंख्य शहरी माओवादी आपल्या आसपास वावरत असतील.
माओवाद्यांचा विचार आपल्या देशाला गोचिडासारखा चिकटला असून इथल्या सुदुढ लोकशाहीचे रक्त शोषण्याचेच त्याचे ध्येय असल्याचे त्यांच्या कार्यपद्धतीवरून दिसते. आता मात्र अटकेपासून दिलासा मिळावा म्हणून जंग जंग पछाडणाऱ्या माओवाद्यांना न्यायालयाने चांगलाच दणका देत कैदेत टाकण्याचा निर्णय दिला. यातूनच या हिंसक विचारधारेच्या थडग्याचा पाया रचला जाईल, हे नक्की.
जंगलातील शस्त्रधारी माओवाद्यांपेक्षा शहरी माओवादी हे अधिक धोकादायक आहेत. ही सगळी मंडळी समाजात बुद्धिजीवी म्हणून वावरतात. कबीर कला मंचासारख्या संस्थामाओवादी विचारांचा प्रचार आणि प्रसार करत असतात.
शहरी नक्षलवाद काय आहे, शहरी नक्षलवाद्यांचे कार्य कसे चालते, शहरी आणि जंगलातील नक्षलवादी एकमेकांना कसे पूरक काम करतात, याचीच माहिती या लेखातून जाणून घेऊया...