पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे देशवासीयांच्या मनात दुखः आणि क्रोध आहे. जसा द्वेष आणि शत्रुता हा आपला स्वभाव नाही, तसा मार खाणे हादेखील आपला स्वभाव नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून दमदार उत्तराची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण केली जाईल,” असा विश्वास वाटतो, असे स्पष्ट मत सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केले.विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते मंगेशकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
Read More
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवार, २१ एप्रिल रोजी याबद्दलचा शासन निर्णय जारी करण्यात आला. याद्वारे धर्मादाय रुग्णालयांना ८ महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रृत घैसास यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार धरत त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
यापुढे तनिषा भिसे प्रकरण घडू नये यासाठी कायदेशीर कारवाई करणार आहे, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात मृत्यू अन्वेषण समितीचा चौकशी अहवाल सादर केला आहे. या प्रकरणातील तिन्ही अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आले असून यापुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Vijay Vadettiwar काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर केलेली टीका, ही याच प्रवृत्तीचे उदाहरण. वडेट्टीवार म्हणाले की, “गाण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबीयांचे योगदान काय?” आपल्या देशात जेव्हा एखाद्या कुटुंबाने आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेच्या सुरांमध्ये गुंफले, तेव्हा त्यांच्या नावावर आज प्रश्न उपस्थित करणारी वृत्ती ही उलट्या काळजाचे प्रतीकच मानावी.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरीबांसाठी असलेला ३० कोटी रुपयांचा निधी वापरलाच नसल्याची धक्कादायक माहिती धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालातून पुढे आली आहे. तसेच गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालय दोषी असल्याचेही या अहवालात स्पष्ट झाले आहे.
गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत सर्वत्र संतापाचे वातावरण असताना आता धर्मादाय रुग्णालयांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्व धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे 'धर्मादाय' असा उल्लेख असलेला फलक दर्शनी भागात लावावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वेळेत उपचार न केल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, शिवसेनेकडून भिसे कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली होती. परंतू, भिसे कुटुंबियांनी ती मदत नाकारली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. थकीत कर भरण्याबाबत ही नोटीस बजावण्यात आली असून हा कर तात्काळ भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यामुळे आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्या दोन्ही मुलींचे पालकत्व स्विकारण्याची मागणी करण्यात येत आहे.
(Tanisha Bhise Death Case) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आता महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली आहे. भिसे कुटुंबाकडून डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांना पाच तास थांबवून ठेवले आणि त्यांना १० लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे या घटनेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आहे, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याने राज्यभरात एकच खळबल उडाली आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल पुढे आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत या अहवालाती ठळक बाबींवर भाष्य केले.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणी एक मोठी अपडेट पुढे आली आहे. या रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोर कारभारामुळे एका महिलेने जीव गमावल्याने शिवसैनिकांनी रुग्णालयावर धडक मोर्चा काढला आहे. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर चिल्लर पैसे फेकत निषेध व्यक्त केला.
(Tanisha Bhise death case) भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे आपला जीव गमवावा लागला. तनिषा यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाला थेट मंत्रालयातून फोन आला होता. मात्र, तरीही रुग्णालायाने तनिषा यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप तनिषा यांची नणंद प्रियंका पाटील यांनी केला आहे.
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली दुकान उघडलेल्या डॉक्टरांच्या लालसेमुळेच दोन लेकरे जन्मत:च आईच्या मायेला पोरकी झाली, अशा शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेवर संताप व्यक्त केला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेने जीव गमावला असून राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
(Pune Pregnant Woman Case) पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोर कारभारमुळे गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पुणे महानगरपालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेची गंभीर दखल घेतली असून या घटनेच्या चौकशीसाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या (पुणे) अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेशी संबंधित लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी शुक्रवार, ४ एप्रिल रोजी केली.
आधी १० लाख रुपये भरा मगच रुग्णाला दाखल करून घेऊ, अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, ३ मार्च रोजी घडली.
भारतीय संगीतक्षेत्रात स्वताची वेगळी ओळख निर्माण करत, आपल्या कार्यतून भारतीय संगीत शास्त्रावर ठसा उमटवणाऱ्या पद्मश्री ह्रदयनाथ मंगेशकर यांना प्रतिष्ठेचा 'उत्तम वाग्गेयकर पुरस्कार' दि.९ मार्च रोजी प्रदान करण्यात आला.आचार्य जियालाल वसंत संगीत निकेतनच्यावतीने अजीवासन हॉल जुहू येथे आयोजित वसंतोत्सव २०२५ या कार्यक्रमात त्यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते. त्याच बरोबर ख्यत्नाम गायक सुरेश वाडकर, प्रेम वसंत, पद्मा वाडकर, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर,
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले असून २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांची व बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचा भाग म्हणून 'शिवचरित्र - एक सोनेरी पान' या गीताच्या लोकार्पण प्रसंगी, पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी आपली बहीण भारतरत्न लता मंगेशकर यांच्या विषयीच्या आपल्या गहिऱ्या पोकळीचा अनुभव व्यक्त केला. ‘हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले’ या पंक्तींप्रमाणे होणारी अवस्था आज आपल्या हृदयाची आहे अशी भावना मंचावर व्यक्त केली. तसेच लतादीदींची आठवण सतत हृदयात व्यापून असते असेही सांगितले.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे गाणं न ऐकलेला एकही श्रोता मिळणार नाही. लहानपणापासून कानांवर पडलेले पहिले सुर नक्कीच बाबूजी अर्थात सुधीर फडके आणि लता दीदींचे (Lata Mangeshkar) असतील यात तिळमात्र शंका नाही. पण लता दीदींची एक नवी ओळख जगासमोर आली असती याचा खुलासा अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते महेश कोठारे यांनी केला आहे. नुकतीच त्यांनी ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा with कलाकारच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली असता माहिती दिली. सध्या ‘झपाटलेला ३’ चित्रपटामुळे महेश कोठारे (Mahesh Kothare) चर्चेत असून
भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि दिग्दर्शक-अभिनेते-निर्माते महेश कोठारे यांच्यात एक समान धागा असून त्याबद्दल महेश कोठारे यांनी ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा with कलाकारच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली असता माहिती दिली. सध्या ‘झपाटलेला ३’ चित्रपटामुळे महेश कोठारे (Mahesh Kothare) चर्चेत असून याही चित्रपटात कोणती नवी टेक्नॉलॉजी पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार बुधवार दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृह येथे संपन्न झाला. दरवर्षी याच दिवशी संगीत, नाटक, कला, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी लता मंगेशकर पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अमिताभ बच्चन यांनी, “ज्यावेळी योग्य सुर लागतो तेव्हा आपली आत्मा परमात्म्याशी जोडल
पद्मविभूषण अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते या पुरस्काराचे तिसरे मानकरी असून पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरा पद्मविभूषण आशा भोसले यांना देण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना (Amitabh Bachchan) मराठी भाषेचा एक विशेष किस्सा सांगितला.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२व्या पुण्यतिथीनिमित्ताने २४ एप्रिल २०२४ रोजी दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, अनेक दिग्गजांच्या यादीत अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) याच्या गालिब नाटकाचा देखील विशेष सन्मान करत मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना चिन्मय (Chinmay Mand
भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कार नुकताच पद्मविभूषण अमिताभ (Amitabh Bachchan) यांचा प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी लता दीदींची एक विशेष आठवण सांगितली. गेल्या काही वर्षांपासून कलाकार परदेशात जाऊन नृत्य अथवा गायनाचे लाईव्ह कार्यक्रम करतात. पण तुम्हाला माहित आहे का? महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील एकेकाळी असे कार्यक्रम सादर करत होते. त्यांनीच स्वत:च या कार्यक्रमावेळी तो किस्सा सांगितला.
महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf) यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २४ एप्रिल रोजी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, यावेळी लता मंगेशकर पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना देण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी मायबाप रसिक प्रेक्षकांचे आभार मानत हा तुम्हा सर्वांचा सन्मान आहे असे म्हटले.
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांना दिल्या जाणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि लता मंगेशकर पुरस्काराची घोषणा १६ एप्रिल रोजी मुंबईत करण्यात आली आहे. यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना जाहिर झाला आहे. मंगेशकर कुटुंबीयांच्या प्रभुकुंज या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत लता मंगेशकर आणि दीनानाथ मंगेशकर पुरस्करांची घोषणा करण्यात आली.
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या संगीत क्षेत्रातील अफाट योगदानाला मानवंदना देण्याच्या उद्देशाने राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भित्तीशिल्प साकारण्याची संकल्पना मांडली होती. त्या अनुषंगाने न्यायमूर्ती सीताराम पाटकर मार्गावर महापालिकेच्या डी विभागाच्या माध्यमातून लता मंगेशकरांच्या जीवनावर आधारित भित्ती शिल्प साकारण्यात आले आहे.
स्वरसम्राज्ञी, भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांना अभिवादन म्हणून संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमीट योगदानावर आधारित भित्तिशिल्प मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागाने न्यायमूर्ती सीताराम पाटकर मार्गावर केम्प्स उड्डाणपुलालगत साकारले आहे. या भित्तिशिल्पाचे अनावरण दि. १० मार्च २०२४ रोजी सायंकाळी राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते, तसेच मंगेशकर कुटुंबिय व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
‘मेरी आवाज ही पेहचान है” हे सुमधुर गाणे आजही ऐकले की गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. साधी राहणी जरी असली तरी लतादीदींनी संगीत क्षेत्रात केलेल्या अजरामर कारकिर्दीला जगात तोड नाही. आज ६ फेब्रुवारी लता दीदींचे दुसरा पुण्यस्मरण दिवस. याच निमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.. लता मंगेशकर
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत आज दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत केली जाणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी संपुर्ण अयोध्यानगरी विविध मान्यवरांच्या उपस्थितीने बहरुन आली आहे. राम मंदिराच्या आवारात रामाची गाणी ऐकू येत आहेत. यात राम आएंगे हे गाणे विशेष असून चक्क दिवंगत गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. लता दीदींच्या आवाजातील हे गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांची अनुपस्थिती या गाण्यामुळे काहीशी दुर झालेली
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून १० जानेवारीपासून सुरु झालेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जीवन चरित्र स्पर्धेची १७ जानेवारी रोजी सांगता झाली. आज पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सदर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. मुंबईतील ११४८ शाळांमध्ये हि स्पर्धा घेतली घेली. ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक होती आणि यामध्ये १ लाख २० हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.
अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपुर्ण देश सज्ज झाला आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी उणीव भासत आहे.
गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाचे संगीत गुरुकुल ठाण्यात सुरू होत आहे, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. सर्व युगात जे सर्वश्रेष्ठ युग आपण अनुभवले ते लतायुग. त्यांची गाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत.
जमलेल्या माझ्या तमाम बांधवांने आणि भगिनींनो …हे एकच वाक्य आणि हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एकच नाव. बस्स, हे उच्चारलं की, काहीही सांगायची गरज नाही. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांच्या डोळ्यांसमोरून त्यांचा जीवनपट एखाद्या सुपरहिट चित्रपटाप्रमाणे सरकून जातो. बाळासाहेबांचा मराठी बाणा, हिंदू धर्म आणि महाराष्ट्राविषयीचं अलोट प्रेम ही त्यांच्या जीवनाची संजीवनी. ही संजीवनी घेऊनच त्यांनी राजकारण, समाजकारण, पत्रकारिता या सर्व क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली. त्यामुळेच उद्या बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त हा
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून २०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली.
स्वच्छ, सुंदर आणि मोकळे स्वर आणि शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाची सुरीली बैठक असलेल्या अबोली ठोसर यांनी रसिकमनांवर अधिराज्य गाजविले, त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया...
मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या नावे देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले. यावर्षीचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार देशासाठी महत्वाचे योगदान दिलेल्या एकाच व्यक्तीला दिला जातो. उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत आदिनाथ मंगेशकर यांनी पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली.
माझ्या पक्षात मला काय स्थान होते, हे विचारा कुणाला पण. वांद्य्राच्या साहेबांना भेटण्याचे भाग्य सगळ्यांनाच मिळत नव्हते. तेव्हा, शंकराच्या पिंडीआधी नंदी तसा मी होतो. केवढे माझे महात्म्य! कोरोना काळात तर ‘मुझको देखोगे जहा तक मुझको पाओगे वहा तक मै ही मैहू मै ही मै था.’ आता काय? डॉक्टर एकनाथ शिंदे? माझे स्वप्न असे अचानक तोडून मोडून टाकणार्या आणि मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंना ‘डॉक्टर’ पदवी मिळाली. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे बरं का?
आज, रविवार दि. २६ फेब्रुवारी. या वर्षाच्या दिनदर्शिकेत वाचनात येणारा दिवस बघितला की, ठळकपणे स्मरणारं दिनविशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी आणि आपण नकळत नतमस्तक होतो. सावरकरांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अगदी मोजक्याच विषयांची आणि त्यांच्या स्वप्नांची आठवण केली तरी त्यांना श्रद्धांजली वाहिल्याचे आपल्याला पुण्य मिळेल.
जावेद अख्तर यांनी लाहोरच्या कार्यक्रमात ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यावरुन पाकिस्तानचे कान टोचले, ते ‘काबिल-ए-तारीफ’च! पण, मायदेशी जसा अल्पसंख्याकांवरील तथाकथित अत्याचारांवरुन जावेदमियाँना पाझर फुटतो, तसा तो पाकिस्तानात का बरं फुटला नाही? तेथील हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांवरील अत्याचाराविषयी जावेदमियाँनी थोडे तव्वजू केले असते, तर त्यांच्या सेक्युलॅरिझमला चार चाँदच लागले असते!
आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या मान्यतेने नुकताच गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाच्या धोरणाचा ठराव निश्चित करण्यात आला आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते दि. 11 ऑक्टोबर, 2022 करण्यात आले होते.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर दि. ६ फेब्रुवारी रोजी पहिली पुण्यतिथी आहे. या दिवशी लता दीदींना त्यांचे चाहते तसेच अनेक मान्यवर आदरांजली वाहत आहेत. या प्रंसगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्वीट शेअर करुन लता दीदींना अभिवादन केलं आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन होऊन वर्ष लोटले. अर्थात, लता मंगेशकर यांचा आवाज चिरकाल टिकणारा असल्याने त्यांच्या स्मृती कायमच राहतील, हेही खरे. लेखक शिरीष कणेकर यांना लता मंगेशकर यांचा सहवास लाभला, त्यांच्याशी वार्तालाप करता आला. मुळात कणेकर हे लता यांना आपली आधारदेवता मानतात आणि ‘त्यात आपल्याला लपविण्यासारखे काही वाटत नाही’ असे त्यांनी स्वतःच म्हटले आहे. तेव्हा ते लताविषयी लिहितात तेव्हा त्यात नेहमीच भक्तीकडे वळणारा जिव्हाळा ओतप्रोत भरलेला असतो. ’लता’ याच नावाचे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. कणेकर