"सनातन संस्कृती भारताचा आत्मा असून ती अखंड व अविनाशी आहे", असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केले. मुजफ्फरपूर येथील एका महाविद्यालयाच्या १२६ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी 'शायनिंग इंडिया टू अमृत काल : टूवर्ड्स अँड एम्पॉवर्ड एण्ड विकसित भारत' या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
Read More
केरळसारख्या सुशिक्षित राज्यात एकीकडे डाव्या सरकारविरुद्ध खंबीर भूमिका घेणारे राज्यपाल दिसून येतात, तर दुसरीकडे या देशात जन्म घेऊनही ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास एक महिला नकार देते! देशविरोधी, देशविघातक शक्ती त्या राज्यात विषारी बीजे कशी पेरत आहेत, त्याची कल्पना यावरून येते. पण, अशा विषवल्लीच्या विरुद्ध राष्ट्रवादी शक्ती त्या राज्यात पाय घट्ट रोवून उभ्या राहत आहेत, भारतविरोधी शक्तींना समर्थपणे तोंड देत आहेत. एक ना एक दिवस ही विषवल्ली राष्ट्रवादी शक्ती उखडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाहीत!
पुण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून पीएफआयच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एनआयएने केरळमधील पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी करण्यास सुरुवात केली. यात कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, सप्टेंबर २०२२ मध्ये पीएफआय या दहशतवादी संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून बंदी घालण्यात आली होती.
पक्षीय राजकारण उभी हयात घालवेल्यांना आपल्या पक्षनिष्ठा किती विसरता येतील का, हा खरा प्रश्न आहे. शिवाय आज आपले जीवन एवढे राजकारणग्रस्त झालेले आहे की, राज्यपालांना स्वतःच्या पक्षाला मदत करण्याचा मोह होणे तसे साहजिकच. पण, म्हणून ते समर्थनीय ठरते, असेही नाही. यावर काही तरी वेगळा उपाय करण्याची वेळ आली आहे.
देशाचे माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंना २५वा ‘श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती नॅशनल एमिनेन्स अवॉर्ड’(एसआयईएस) प्रदान करण्यात आला. हे पुरस्कार सार्वजनिक नेतृत्व, समुदाय नेतृत्व, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच, सामाजिक विचारवंतांच्या क्षेत्रात देण्यात आले आहेत, ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिले आहे. विविध प्रकारांतील इतर पुरस्कारांमध्ये केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते डॉ. मार्तंड वर्मा शंकरन वलियनाथन, भारत सरका
केवळ केरळमध्येच मंत्र्यांच्या व्यक्तिगत कर्मचार्यांना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे, असे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांनी म्हटले आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यास दोन वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती वेतन मिळण्याची खात्री झाली की, त्या कर्मचार्याच्या जागी दुसर्या कार्यकर्त्याची वर्णी लावली जाते. त्याच्या चरितार्थाची कायमस्वरूपी सोय डाव्या आघाडी सरकारकडून केली जाते.
आरिफ मोहम्मद खान आणि असदुद्दीन ओवेसी हे दोघेही धर्माने मुसलमान. पण, या दोघांची विचार करण्याची पद्धती किती भिन्न आहे हे या ‘हिजाब’ प्रकरणावरून दिसून आले.
राज्यपाल अरिफ महंमद खान यांच्या या कृतीमागे त्यांचा काही राजकीय स्वार्थ नसला तरी या घटनेचे भांडवल करून राज्यपालांच्या या कृतीवर ‘पुरोगामी’ म्हणविणार्या नेत्यांकडून, जहाल मुस्लीम संघटनांकडून टीका झाल्यावाचून राहणार नाही. टीका झाली तरही राज्यपालांनी नक्कीच एक चांगली कृती केली असे म्हणता येईल.
राज्यपालपद हे तसे पाहिले तर राजकीय नेमणुकांचे आहे. आजपर्यंत आपल्या देशात अनेक राज्यांचे राज्यपालपद केंद्रात सत्तारूढ असलेल्या पक्षाने आपल्या मर्जीतील राजकारणी व्यक्तीला दिलेले दिसेल. मग अशी व्यक्ती पक्षीय निष्ठा कशी विसरू शकेल?
देवबंद विद्यापीठात मुस्लीम विद्यार्थ्यांची माथी भडकविण्याचे काम सुरू असल्याचा धक्कादायक दावा माजी कें द्रीय मंत्री आणि मुस्लीम अभ्यासक आरिफ मोहम्मद खान यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे. दरम्यान, खान यांचे वक्तव्य मुस्लीम समुदायात खळबळ उडवून देणारे ठरणार आहे.