(Mamta Kulkarni) बॉलिवूडमधील ९० च्या दशकातील अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) या पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी "दाऊद इब्राहिम हा काही दहशतवादी नाही", असे खळबळजनक विधान केले. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद आता सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत.
Read More
Mamata Banerjee "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आधुनिक जिना म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालतील मुस्लिम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात", अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी १३ एप्रिल रोजी रविवारी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली आहे. वक्फ सुधारित विधेयकावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता सरकार सपशेल अयशस्वी ठरले आहे.
: पश्चिम बंगाल मध्ये सध्या एका वेगळ्याच घोटाळ्याने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. विद्यार्थांना, उच्च शिक्षणासाठी देण्यात आलेल्या टॅबलेटच्या पैशांमध्ये फेरफार होत असून विद्यार्थांच्या बँक खात्याऐवजी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये हे पैसे जमा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या संदर्भात कोलकाता पोलीस आणि विशेष तपास पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी तपास केला असून वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयातील (R G Kar Medical College) बलात्कार प्रकरणी पीडित मृत मुलीच्या आई-वडिलांनी गोप्यस्फोट केला आहे. याप्रकरणात बुधवारी सांगितले की, कोलकाता पोलिसांनी डॉक्टरांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना लाच देण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या आई-वडिलांनी केला आहे. पैसे घेऊन हे प्रकरण लवकरात लवकर मिटवून टाकू असा दावा पीडितेच्या आई- वडिलांनी केला.
Trinamool Congress आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकरण सध्या ताजे असून देशातील अनेकांनी याप्रकरणाला विरोध दर्शवला आहे. याप्रकरणी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर भाजपने आंदोलन केले. अशातच तृणमूल काँग्रेसची युवा शाखा असलेल्या तृणमूल विद्यार्थी काँग्रेसच्या १३ विद्यार्थींनींचे प्रकरण आढळले आहे. विद्यार्थींनींनी कार्यक्रमाला जाण्यास नकार दिल्याने काही विद्यार्थींनींना कॉमन टॉयलेटमध्ये डांबण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Girl sexually harassed प. बंगाल येथील तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाला गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आल्याची घटना घडली आहे. १३ वर्षीय आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे कारण सांगितले गेले आहे. पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील गंगारपूर उपविभागातील बंशीहारी य़ेथे ही घटना घडली. राष्ट्रीय मथळ्य़ानंतर राज्य सरकारने दखल घेत कारवाई केली.
Mamta Banerjee केंद्रीय मंत्री आणि प. बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदारांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर कोलकाता येथे हिंसाचार भडकवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी प. बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. त्याचवेळी पं.बंगालचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष सौमित्र खान म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २०२६ पर्यंत सिलीगुडी असलेला पूर्वोत्तर भारत वेगळा करण्याचा ममतांचा कट असून त्या सत्तेसाठी काहीही करतील असे सौमित्र खान म्हणाले आहेत, यामुळे एकच खळबळ माजली आहे.
RG Kar Medical College आर जी कर बलात्कार प्रकरणात एका विद्यार्थ्य़ाने डॉक्टर युवतीवर झालेल्या बलात्काराचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना जाब विचारला आहे. यामुळेच आता जाब विचारणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी युवकाला अटक केली. ममता बॅनर्जींना जाब विचारणे युवकाची चूक आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Mamta Banerjee Resign आर जी कर महाविद्यालयात पीडितेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी पीडितेच्या आईने प.बंगालच्या मुख्यमंत्रीं ममता बॅनर्जींनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ममता बॅनर्जी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचे पीडितेच्या आईचे म्हणणे आहे. ममता बॅनर्जींनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी आर्त मागणी पीडितेच्या आईने केली आहे.
Shantanu Sen डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात अन्यायाविरोधात आवाज उठवला म्हणून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने शंतनू सेन यांना पदावरुन बडतर्फ केले आहे. बलात्कार आणि हत्येची घटना घडली ते आर.जी. कर रुग्णालय हे असामाजिक तत्वांचा अड्डा बनला आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळेच त्यांच्यावर ही पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने १२ जुलै २०२४ रोजी राधिका मर्चंट सोबत सात फेरे घेत साता जन्माची लग्नगाठ बांधली. अंबानी कुटुंबियांच्या या आनंदात सामील होण्यासाठी कलाकार, राजकीय नेते आणि परदेशी पाहूण्यांनी हजेरी लावली होती. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
गाझियाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालय ABSE मध्ये जय श्री रामचा नारा लावल्याबद्दल एका विद्यार्थ्याला स्टेजवरून हटवण्यात आले होते. त्यानंतर आता ABSE महाविद्यालयाची वेबसाइट हॅक करण्यात आली आहे. वेबसाईटवर मोठ्या अक्षरात जय श्री राम लिहिले आहे. तसेच घोषणाबाजीला विरोध करणाऱ्या प्राध्यापिका ममता गौतम यांचा फोटो एडिट करत त्यात त्यांचे नाक शूर्पणखेसारखे कापण्यात आले आहे. ही घटना वादाच्या एका दिवसानंतर म्हणजेच दि.२१ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी ABES कॉलेजचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये स्टेजवर उभ्या असलेल्या एका विद्यार्थ्याने जय श्री रामचा नारा लावला तेव्हा ममता गौतम नावाच्या महिला प्राध्यापिकेने त्याच्याशी गैरवर्तन तर केले आणि स्टेजवरून खाली उतरवले. याप्रकरणी हिंदू संघटनांच्या विरोधानंतर आता आरोपी महिला प्राध्यापकाने तिच्या बचावासाठी एक व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओमध्ये त्या स्वत:ला सनातनी असल्याचे सांगून जय श्री रामचा नाराही देताना दिसल्या. महाविद्यालय व्यवस्थापनाने प्राध्याप
नवरात्री म्हणजे निसर्गाशी एकरूप होऊन आनंदोत्सव करण्याचा सोहळा. नवरात्राला ऊर्जा, शक्ती, कर्तृत्व, शौर्य, पराक्रमाची परंपरा आहे. नवरात्र म्हणजे आसुरी विचारसरणीवर विजय मिळविण्याचे दिवस. नवरात्रात कात्यायिनी, शैलपुत्री, सरस्वती किंवा महादुर्गा अशा विविध रुपांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आपण आपल्या देशालाही भारतमातेच्या म्हणजेच देवीच्या रूपात पाहतो. मात्र समाजात दुर्लक्षित राहिलेल्या, न्यूनगंडामुळे पुढे न आलेल्या, रानावनात विखुरलेल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहून इतरांच्याही जीवनात मोलाची भर टाकणा
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केल्याने बुधवारी पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात तब्बल नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. सप्टेंबर २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेस (टीएमसी) मध्ये सामील झालेले माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना मंत्रिपद देण्यात आले. बाबुल सुप्रियो, स्नेहसिस चक्रवर्ती, पार्थ भौमिक, उदयन गुहा, प्रदिप मुझुमदार, तजमुल हुसेन, सत्यजित बर्मन, बिरबाह हंसदा आणि बिप्लब रॉय चौधरी यांनी स्वतंत्र प्रभारासह मंत्री म्हणून शपथ घेतली
निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. दि. १८ जुलै रोजी मतदान होणार असून दि. 21 जुलैला देशाचा पुढचा राष्ट्रपती निवडला जाणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ दि. २५ जुलै रोजी संपत आहे. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. लोकसभा, राज्यसभा सदस्य आणि आमदार राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करतील. तर, विधान परिषदेचे सदस्य आणि दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. भारतातील राष्ट्रपती निवडणुकीची सध्याची पद्धत १९७४ पासून सुरू आहे. आणि हीच पद्धत २
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू आहे. पश्चिम बंगाल राज्यातील बेथुआदहरी रेल्वे स्टेशन आणि ट्रेनवर जमावाने हल्ला केला. काल दि. १२ रोजी संध्याकाळी, पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील बेथुआदहरी रेल्वे स्थानकावर इस्लामी जमावाने हल्ला केला. तसेच स्थानकावरील लोकल ट्रेनचे नुकसान केले.
रवींद्रनाथ टागोर यांच्या 161व्या जयंतीनिमित्त ‘पश्चिमबंग बांगला अकादमी’तर्फे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एका शासकीय कार्यक्रमात साहित्यविषयक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, आता अकादमीच्या निर्णयाविरोधात अनेक बंगाली साहित्यिकांनी आवाज उठवला आहे.
पश्चिम बंगालसह देशातील अनेक भागात रामनवमी साजरी करणाऱ्या हिंदूंच्या मिरवणुकांवर हल्ले झाले आहेत. हावडा येथील रामनवमीच्या मिरवणुकांवर झालेले हल्ले हे पश्चिम बंगाल पोलिसांचे कारस्थान असल्याचा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.
आज जगातील विविध देशांतील हिंदू भारतीय हिंदूंसाठी निदर्शने करू लागले. पण, अशीच एकजूट इथल्या आणि तिथल्या हिंदूंनी कायमस्वरूपी दाखवली तर ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ चळवळीची गरज उरणार नाही.
भाजप पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या प.बंगाल येथील दौऱ्यादरम्यान झालेल्या हल्ल्याचे प्रकरण अजूनही शांत झालेलं नाही. अशातच आता एबिव्हीपी आणि तृणमूल छात्र परिषद यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
२०२१ मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे.पी.नड्डा दौऱ्यावर असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर जमावाने दगडफेक केली. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या हल्ल्याचा निषेध केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी अडचणीत येण्याची शक्यता आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यात खोटी माहिती दिल्याने दिल्ली न्यायालयाने त्यांना नोटीस पाठवली.
रामनामाच्या नुसत्या उच्चाराने दगडधोंडेही चक्क पाण्यावर तरंगतात. मात्र, जे दगडही नाहीत अन्धोंडेही नाहीत, असे अमर्त्य सेन यांसारखे विद्वान वा ममतांसारखे विक्षिप्तजन आपल्या 'मर्त्य' बुद्धीच्या प्रभावातून रामनामाच्या जयघोषाला विरोध केल्याने तरणार तर नाहीतच उलट स्वतःच बुडतील, असे वाटते.
ममता बॅनर्जी यांनी जाहीरपणे, ज्यांनी 'कट मनी' घेतला आहे, त्यांनी तो परत करावा, असे वक्तव्य केले, ते पाहता त्यांच्या 'आशीर्वादा'नेच हे सर्व चालले होते, असे दिसून येत आहे. प. बंगालमध्ये आपलेच शासन असल्याने आपणास कोण विचारतो, अशा गुर्मीत त्या होत्या. पण भाजपने त्या राज्यात जोरदार मुसंडी मारल्याने ममता सरकारची एकेक कृष्णकृत्ये बाहेर येऊ लागली आहेत. 'कट मनी' हे त्यातील एक म्हणावे लागेल!
पश्चिम बंगालचा गड भाजपच्या तोफेने दणाणल्यानंतर ममतादीदी सैरभैर झाल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या भयेने ग्रासल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना जनतेचा लुटलेला पैसा परत देण्याची सुबुद्धी त्यांना सुचली.
भूमिपुत्रांच्या गरजांची पूर्तता झाल्यानंतर जर ही संसाधने शिल्लक राहत असतील तर ती इतरांना देण्याचा विचार करता येतो. मात्र, भूमिपुत्रांनाच संसाधनांपासून वंचित ठेऊन घुसखोरांना त्यांचा लाभ देणे कदापिही समर्थनीय ठरू शकत नाही.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलुगू देसम, समाजवादी पक्ष, बसप, तृणमूल काँग्रेस आदी अनेक पक्ष पराभवाच्या धक्क्यातून कसे सावरायचे, याचा विचार करण्याच्या मागे लागले आहेत. काँग्रेस पक्ष तर सध्या संभ्रमावस्थेत असल्यासारखा दिसत आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) उद्या सोमवारी (दि.१७) देशव्यापी बंदची हाक दिली आहे.
प. बंगाल हे राज्य भारतीय संघराज्याचा एक भाग असल्याचे ममता बॅनर्जी विसरतात कसे? राजकीय हिंसाचार आणि त्या राज्यात वैद्यकीय आंदोलनामुळे निर्माण झालेली स्थिती याबद्दल केंद्राने विचारणा केल्यास ममता बॅनर्जी डोके फिरल्यासारखे उत्तरे कशी काय देऊ शकतात? राज्यात अनागोंदी कारभार चाललेला असताना केंद्राने बघ्याची भूमिका घ्यावी, अशी ममता बॅनर्जी यांची अपेक्षा असली तरी केंद्रास तसे वागून चालणार नाही.
ममतांनी केल्या सर्व मागण्या मान्य
‘चार तासात कामावर हजर व्हा, नाहीतर कामावरून हाकलून लावीन’ ही मुख्यमंत्र्याला शोभणारी भाषा नाही. यातही ममतांची जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे. त्याच मुख्यमंत्री व गृहमंत्री आहेत. म्हणजेच डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांची होतीच. पण, आरोग्यखातेही त्यांच्याकडेच असल्याने त्यांच्या आक्रस्ताळेपणाला वेगळाच रंग चढला. याला निव्वळ ‘राजकीय आत्महत्या’ म्हणता येईल.
पश्चिम बंगाल मध्ये हिंसाचाराने कळस गाठला असून कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यास ममता बॅनर्जींचे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील पश्चिम बंगाल राज्यसरकार केंद्राने बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
सोमवारी भाजपाच्यावतीने बशीरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये १२ तासांचा बंद पुकारण्यात आला
लोकसभा निवडणुकीत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांना जनतेने धूप घातला नसल्याचे दिसत असताना विरोधी पक्ष तेच ते जुने आरोप का करीत आहेत? का त्यांच्या हाती अन्य काहीच मुद्दे नसल्याने त्यांची अशी बाष्कळ बडबड चालू आहे? जनतेला जी उत्तरे सापडली ती या चाचपडणाऱ्या विरोधकांना का सापडू नयेत याचे आश्चर्य वाटते!
नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी लोकशाही, संविधान धोक्यात येईलच्या हाकाट्या पिटणाऱ्यांना प्रत्यक्षात बंगालमध्ये लोकशाहीद्रोही ममतांच्या गुंडांनी घातलेला हैदोस दिसला नाही. स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांना ममता बॅनर्जींसारखे आक्रस्ताळे व्यक्तिमत्त्व एकूणच लोकशाही व्यवस्थेलाच सुरुंग लावण्याचे प्रतिगामी काम करत असल्याचे समजले नाही. असे का?
तृणमूल काँग्रेसनेच हत्या घडवल्याचा भाजपचा आरोप
पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील ‘जय श्रीराम’ या घोषणेवरुन वाद सुरु आहे. या वादात मात्र पोस्टमन आणि टपाल खात्याची चांगलीच धांदल उडाल्याचे दिसून येत
शरद पवार असो, राहुल किंवा ममतादीदी सगळ्याच सोंगट्या आता उलट्या पडताना दिसत आहेत. पवारांना स्वयंसेवकांची चिकाटी भावतेय, तर दीदींना प्रशांत किशोरच्या रणनीतीची गरज भासतेय. हा सर्वस्वी मोदीदिग्विजयाचा धसका आणि आगामी काळातील राजकीय उलथापालथीची नांदीच म्हणावी लागेल.
बंगालमध्ये विकसित झालेल्या राष्ट्रवादाचे खोलवरचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. ज्यांच्यापुढे आपण केवळ नतमस्तकच होऊ शकतो, अशी हिमालयाच्या उंचीची बरोबरी करणारी थोर माणसे बंगालमध्ये झाली. ममता बॅनर्जींवर त्यांचे काही संस्कार आहेत का?
ममतांनी स्वतः भाजप कार्यालयाचे कुलुप तोडून भाजपचे नाव आणि पक्षाचे चिन्ह खोडून काढले. यानंतर ममतांनी स्वतःच्या हाताने तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव लिहिले.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांचा जय श्रीराम म्हणणाऱ्या नागरिकांना दटावणारा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर आता पुन्हा एकदा तसाच प्रकार उघडकीस आला आहे. ममता बॅनर्जी यांचा ताफा बुधवारी परगणा जिल्ह्यातून जात असताना ममता 'जय श्रीराम' म्हणणाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्या. "हिंमत असेल तर समोर येऊन घोषणा द्या" असे आव्हान त्यांनी घोषणा देणाऱ्यांना केले.
पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगना जिल्ह्यातील हा व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे. ममतांचा ताफा या ठिकाणावरून जात असताना काही जणांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या.
'जय श्रीराम’ची घोषणा देणारे बंगालमध्ये गुन्हेगार आणि गुंड ठरवले जात असतील, तर ती हिंदूंच्या दृष्टीने निश्चितच चिंताजनक बाब म्हणावी लागेल.
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या सरकारला भाजपने मोठा धक्का दिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या तीन आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला. याचवेळी बंगालमधील तब्बल ५० नगरसेवकांनीदेखील भाजप प्रवेश केला.
पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, भाजप आणि रा.स्व.संघ यांचे काहीतरी नक्की होईल, असे वाटावे इतके ते शब्दांचे अस्त्रशस्त्र वापरीत. अर्थात पेशवाई गाडू, मनूबिनू यांचीही फोडणी त्यामध्ये असे. अर्थात, प्रकाश यांच्यापाठी महामानवांचे आडनाव आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारून १८ जागा काबिज केल्यामुळे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आला आहे
पुढील सहा महिन्यात पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचे सरकार कोसळणार असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केला
स्वातंत्र्यानंतर देशाच्या इतिहासात प्रथमच दुसऱ्यांदाच कॉंग्रेस वगळता संपूर्ण देशभरात इतर पक्षाला दुसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे. भाजपने आपल्या अभूतपूर्व विजयाची जल्लोषात तयारी केली आहे. देशात एडीएचा पंतप्रधान बनणार हे चित्र आता स्पष्ट दिसू लागले आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मतदानाची मोठी चर्चा झाली. तृणमूल काँग्रेस व ममता बॅनर्जींच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक टप्प्यात केलेल्या हिंसाचारामुळे अवघ्या देशाचे लक्ष बंगालकडे लागले होते.