केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यांदरम्यान वारंवार सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या संदर्भात राहुल गांधींनाही स्वतंत्र पत्र पाठवण्यात आले असून त्यांच्या सुरक्षेसाठी हा गंभीर चिंता विषय असल्याचे सीआरपीएफने स्पष्ट केले आहे.
Read More
खोटं आणि पुराव्याशिवाय बोलणे आणि त्या खोटारडेपणातच आनंद मानणे, यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाजुर्र्न खर्गे यांच्याशी कुणीही स्पर्धा करू शकेल का? नुकतेच खर्गे म्हणाले की, “मागासवर्गीय दलित आणि महिलांना मतदानाचा अधिकार देण्यास भाजप-संघ तयार नाही.” यावर काय म्हणावे? भाजपच्या सत्ता स्थापनेमध्ये महिला आणि मागासवर्गीय, तसेच दलित समाजाचे भरभरून योगदान आहे, हे जगजाहीर. त्यामुळेच भाजप सर्व समाज आणि महिला मतदारांचे शतप्रतिशत मतदान होण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण, सततच्या अपयशामुळे खर्गे यांना हे सत्य कळतच नाही कदाचित
महाराष्ट्र काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते नुकतेच दिल्लीला गेले. नियोजित वेळेनुसार बैठकही पार पडली. मात्र, प्रत्यक्षात हाती काय लागले? केवळ छायाचित्रे आणि आंतरिक नाराजी! ना पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे भेटले, ना राहुल गांधींशी थेट संवाद झाला. उपस्थित होते केवळ प्रभारी रमेश चेन्निथला आणि नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ! हीच बैठक मुंबईत झाली असती, तर वेळ, पैसा आणि मनस्ताप वाचला असता, अशी खंत अनेक नेत्यांनी व्यक्त केली.
कर्नाटकात नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी, नेतृत्वबदलाचा निर्णय हायकमांड घेणार असे सांगून चर्चेस आणखी धार दिली आहे.
दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज
हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या पराभवानंतर, काँग्रेस पक्ष निराशेच्या गर्तेत अडकला असल्याचं बघायला मिळातं आहे. पक्षाची पुढची भूमिका काय असेल यापेक्षा दुसऱ्यांची उणीदुणी काढण्यातच काँग्रेस धन्यता मानत असल्याचं बघायला मिळतं आहे. अशातच आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केवळ राजकारणासाठी पवित्र महाकुंभवर टीका केली आहे. भारत सरकार गरीबांकडे लक्ष्य देण्याऐवजी महाकुंभवर एवढा पैसा का खर्च करत आहे असा सवाल खर्गे यांनी केला.
(Dr. Manmohan Singh) देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२व्या वर्षी निधन दुखःद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांचे स्वतंत्र स्मारक उभारावे, अशी मागणी काँग्रेसकडून केली गेली. डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारता येईल, अशा ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली. श
राज्यसभेत सलग तीसऱ्या दिवशी विरोधकांनी गदारोळ माजवला आहे. जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडल्यानंर आता जगदीप धनखड यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी आरोप केला आहे की ते सत्ताधाऱ्यांची तळी उचलून धरत आहे. यावर विरोधकांना जगदीप धनखड यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. तसेच काही काळासाठी राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : शुक्रवार दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला. सभापती जगदीप धनखर यांनी सभागृहात सांगितले की, "काँग्रेस खासदाराच्या आसनातून चलनी नोटांचे बंडल सापडले आहे." यावर अध्यक्षांनी अतिरिक्त माहिती देत सांगितले की, गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ रोजी सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी सीट क्रमांक २२२ वरून रोख रक्कम जप्त केली. तेलंगणातील काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी ( Abhishek singhvi ) यांना ही जागा देण्यात आली आहे.
दिल्लीच्या संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू असताना, राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. अशातच आता संसदेतील मुद्दयांवरून इंडिया आघाडीमध्ये फूट पडताना दिसत आहे. संसदेच्या कार्यवाही आज सुरू होण्याआधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला तृणामूल काँग्रेसचे नेते मात्र गैरहजर राहिले. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर काँग्रेसने बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुकींमध्ये काँग्रेसला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या पदाधिकारे, कार्यकर्ते यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे.
स्वातंत्र्यानंतर हिंदूंच्या धार्मिक अधिकारांचा प्रचंड संकोच करणारे सर्व कायदे हे काँग्रेसच्याच राजवटीत झाले आहेत, हा योगायोग नव्हे. हिंदूंच्या सर्व प्रमुख तीर्थस्थळांमधील मूळ व प्राचीन हिंदू मंदिरे तोडून तेथे मशिदी उभारण्यात आल्याचे लेखी ऐतिहासिक आणि पुरातत्त्व पुरावे उपलब्ध आहेत. ऐतिहासिक काळात तत्कालीन राज्यकर्त्यांच्या हातून झालेली चूक सुधारण्याची संधी आजच्या मुस्लीम नेत्यांकडे आहे. त्याऐवजी ते या चुकीचे समर्थन करीत असल्याने आजचा संघर्ष निर्माण झालेला दिसतो.
मल्लिकार्जून खर्गेंनी ( Mallikarjun Kharge ) राज्यातील काँग्रेस नेतृत्वाला सुनावले खडेबोल!
नवी दिल्ली : पक्षातील अंतर्गत कलह, नेत्यांची बेताल वक्तव्ये आणि एकजुट नसल्यानेच काँग्रेसचा पराभव होत आहे, असा निष्कर्ष काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ( Mallikarjun Kharge ) यांनी काढल्याचे समजते.
मल्लिकार्जुन खर्गे हे भाजप आणि संघाला विषारी साप म्हणाले आणि त्यांना ठेचले पाहिजे असे म्हणाले, याचा एक अर्थ असा करायचा का, की ते श्रोत्यांना हिंसा करण्याचे आवाहन करीत आहेत. लोकशाहीत हिंसा बसत नाही. निवडणूक ही अहिंसक राज्यक्रांतीचा मार्ग असते. तेव्हा अशी भाषा ही अत्यंत अशोभनीय म्हटली पाहिजे.
नवी दिल्ली : ( Rahul Gandhi ) सिद्धरामय्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शक्ती’ योजनेबाबत कर्नाटकात नवा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी या योजनेचा पुनर्विचार करण्याचे विधान केल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर टीका केली होती. त्यानंतर शुक्रवारी भाजपनेही कर्नाटक सरकारवर हल्लाबोल केला आहे.
प्रियांका गांधी यांचा राजकारणात सक्रिय प्रवेश होत असताना, पक्षातील वरिष्ठ नेत्यांना मात्र अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे दिसून आले आहे. २३ ऑक्टोबर रोजी प्रियांका गांधी यांचा उमेदवारी अर्ज भरला जात असताना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना मात्र दाराबाहेर ताटकळत उभं ठेवले गेलं.
(Congress) स्वतःच्या राज्यांमध्ये सपाटून मार खाल्लेल्या नेत्यांवर काँग्रेसने महाराष्ट्र जिंकण्याची जबाबदारी सोपवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तीन माजी मुख्यमंत्री आणि तीन माजी उपमुख्यमंत्र्यांचा यात समावेश आहे.
स्वच्छ चारित्र्य म्हणून ज्याला पोलीस करावे, तोच खरा निघतो अशी अवस्था काँग्रेसची झाली आहे. स्वच्छ चारित्र्य असलेला एकनिष्ठ नेता म्हणून खरगेंच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली खरी पण, आता तेच काँग्रेसचे अवघड जागेचे दुखणे झाले आहे. खरगेंनी परत केलेल्या जमिनी हा एक घोटाळाच असल्याची शंका आता जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.
"जनतेने वारंवार नाकारलेलं 'फेल प्रोडक्ट' वारंवार पॉलीश करून बाजारात उतरवण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान नरेंद्र मोदींना जे पत्र लिहीलं आहे. त्या पत्राला वाचून मला असं जाणवलं की त्यापासून सत्य हे कित्येक मैल दूर आहे. यावरुन एक गोष्ट तर लक्षात येतेच की राहुल गांधींची नेता म्हणून असलेल्या करामती आपण डोळेझाक करत आहात किंवा विसरला तरी आहात. त्यामुळेच याच गोष्टींची आठवण करून देण्यासाठी मी या मुद्द्यांना हात घालत आहे."
काँग्रेस आमदार भाई जगतापांनी उपरणे गळ्यातच ठेवावे, असा आग्रह धरला. मात्र उद्धव ठाकरे यांनी हसत हसत त्याला नकार दिला. संजय राऊतांनी आपल्या गळ्यातील उपरणे शेवटपर्यंत काढले नाही. माध्यमांनी उद्धव ठाकरेंची कृती कॅमेऱ्यात टिपल्याने त्यांना सारवासारव करावी लागली. आपल्या भाषणात ते म्हणाले, काँग्रेसच्या कार्यक्रमाला असल्याने मी गळ्यात गमछा घातला. तुमचा आदर ठेवला, मान ठेवला. पण उद्या याचा नक्की फोटो येणार. तो फोटो यावा यासाठीच मी काँग्रेसचा गमछा गळ्यात घातला होता. मी इकडे तिकडे काय करतो, त्याकडे विरोधकांचे जास्त लक्
मातोश्री सोडून राहूल गांधी आणि खर्गेंच्या दारात उभं राहण्याची पाळी उद्धव ठाकरेंवर आली आहे, अशी टीका भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केली. उद्धव ठाकरे जागावाटपाच्या चर्चेसाठी तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. यावर आता दानवेंनी टीका केली आहे.
आजवरच्या इतिहासात राज्यसभेच्या सभापतीपदाचा सर्वाधिक अपमान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीच केला आहे, अशा शब्दात उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी खर्गे यांना सुनावले आहे.
विधानसभा निवडणूकीला थोडेच दिवस शिल्लक असताना मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस पाहायला मिळत आहे. मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी नवनिर्वाचित खासदार आणि अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यविरोधात मल्लिकार्जून खर्गेंना पत्र लिहिलं आहे. वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
तामिळनाडूमध्ये विषारी दारूच्या प्राशनाने अनेकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सत्ताधारी द्रमुकसह काँग्रेस नेते राहुल गांधी यांचेही मौन चिंताजनक आहे, असे पत्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिले आहे.
देशातील जनतेने भाजप सरकारच्या एकाधिकारशाहीविरोधात कौल दिला असून फॅसिस्ट शक्तीविरोधातील लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडी आघाडीच्या बैठकीनंतर बुधवारी रात्री केले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसप्रणित इंडी आघाडीस अपेक्षेपेक्षा जास्त यश प्राप्त झाल्याने त्यांचा हुरूप वाढला आहे.
काँग्रेसप्रणित विरोधी पक्षांच्या ‘इंडी’ आघाडीस २९५ हून अधिक जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे मतदान शनिवारी संपले. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी ‘इंडी’ आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यानंतर बोलावलेल्या इंडी आघाडीच्या बैठकीस प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
मोदीजींवर टीका करण्याआधी मल्लिकार्जून खर्गेंचा व्हिडीओ बघा, असा खोचक टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊतांना लगावला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यानंतर इंडी आघाडीची स्थिती अतिशय भक्कम असून ४ जून नंतर देशात इंडी आघाडीचीच सत्ता य़ेईल, असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी व्यक्त केला आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत लखनौमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी खर्गे म्हणाले, आतापर्यंत चार टप्प्यात निवडणुका झाल्या आहेत. त्यामध्ये इंडी आघाडी खूप पुढे आहे.
नुकतेच काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या राधिका खेरा रडत रडत छत्तीसगढच्या राजीव भवनातून बाहेर आल्या. मागे काँग्रेसच्या जाहिरातीमध्ये भाजपविरोधात मुलगी म्हणायची ‘लडकी हूँ लड सकती हूँ।’ पण, हे वाक्य केवळ प्रियंका गांधींसाठी होते बरं का! ‘सोनियांची मुलगी’ म्हणून त्याच निवडणूक लढणार आणि बाकीच्या महिला नेत्यांच्या बाबतीत काय? तर ‘लडकी हूँ, रोही सकती हूँ’ हेच! काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची जांजगिरी चांपा जिल्ह्यात सभा होती.
देशातील मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी काँग्रेसने आपला लोकसभा निवडणूक जाहिरनामा प्रकाशित केला आहे. मात्र, हा जाहिरनामा नसून निव्वळ लबाडी असल्याचा घणाघात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषदेत केला आहे.
यंदाची लोकसभा निवडणूक ही सर्वच अर्थांनी परिवर्तनाची ठरत आहे. भाजप आणि काँग्रेससह जवळपास सर्वच पक्षांची रणनिती आखण्याची जबाबदारी नव्या नेत्यांकडे आहे. त्यामुळे निवडणुकीतील यशापयश या नेत्यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडी आणि वंचित बहूजन आघाडी यांच्यात समन्वय होताना दिसत नाही. यातच आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उबाठा आणि शरद पवार गटावरून उडाला असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना यासंदर्भात पत्रही लिहिले आहे.
काँग्रेसमध्ये बरेच सुपारीबहाद्दुर आहे. या सुपारीबहाद्दुरांना आवरलं नाही तर निवडणुकीनंतर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ते इचलकरंजी येथील सभेत बोलत होते.
यापूर्वी तुमच्या ३४० जागा होत्या आणि आता तर काय “अब की बार ४००पार”, या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्यावर राज्यसभेत हास्याची कारंजी उसळली. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील यावेळी आपले हास्य रोखू शकले नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणारील अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेस प्रारंभ झाला. त्याचप्रमाणे राज्यसभेत खासगी विधेयकेदेखील मांडण्यात आली.
काँग्रेसप्रणित देशभरातील २८ राजकीय पक्षांची ‘इंडी’ आघाडीला गळती लागली असून ममता बॅनर्जी, केजरीवाल यांच्या पाठोपाठ आता नितीशकुमारही त्यातून बाहेर पडले. काँग्रेसी अहंकारी वृत्ती तसेच ताठरपणा विरोधकांना अशी भूमिका घेण्यास प्रवृत्त करणारा ठरला. कोणत्याही हेतूशिवाय एकत्र आलेले हे पक्ष संधी मिळताच, आघाडीतून बाहेर पडले, हेच सत्य.
काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे राजकीयीकरण करत नाकारलेले निमंत्रण, हे त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या हिंदूद्वेषाच्याच कुनीतीचा पुढचा अध्याय! यामध्ये नेहरुंनी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला केलेल्या विरोधापासून ते अगदी काँग्रेसने रामाचे, रामसेतूचे न्यायालयात अस्तित्व नाकारण्याचा दाखवलेला करंटेपणा हा इतिहास अगदी सर्वश्रूत. पण, सेक्यॅलुरिझमच्या नावाखाली होणारा हा हिंदूविरोध एवढ्यापुरता मर्यादित नव्हता. आज राम मंदिराचे निमंत्रण नाकारणार्यांचा राजकीय इतिहास बारकाईने तपासला असता, स्वातंत्र्य
भाजप आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस उबाठा गटाला फक्त पाच जागा सोडतील अस म्हटल आहे. महाएमटीबीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे २३ जागा मागत आहेत पण त्यांच्याकडे २३ माणसं राहीली आहेत का असही ते म्हणाले.
भारत जोडो यात्रेनंतर आता काँग्रेस पक्षाने 'भारत न्याय यात्रे' ची घोषणा केली आहे. ही यात्रा १४ राज्यांमधून जाणार असुन ६२०० किमी चा प्रवास करणार आहे. १४ जानेवारीला मणिपूरच्या इंफाळमध्ये यात्रा सुरू होणार असुन २० मार्चला मुंबईत संपेल.
इंडीया आघाडीचे मल्लिकार्जुन खर्गे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये खुप फरक आहे. आणि जनता मोदींनाच निवडेल अस मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल आहे. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बैठक २२ डिसेंबर ला पार पडली. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधीत करताना त्यांनी हे मत व्यक्त केल आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी लोकसभा आणि राज्यसभेतून विरोधी पक्षातील काही खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्याला विरोध म्हणून शुक्रवार, दि. २२ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत जंतरमंतर येथे इंडिया आघाडीची जाहीर सभा पार पडली. यावेळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह शरद पवारसुद्धा मंचावर उपस्थित होते. मात्र त्यांच्या भाषणावेळी त्यांचा अपमान झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
'इंडी' आघाडीचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात मोठा फरक आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनता नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा कौल देईल, असे ठाम मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
विरोधी पक्षांच्या काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीची झालेली चौथी बैठकही जागावाटप आणि नेतृत्वाच्या घोषणेशिवाय पार पडली आहे. त्याचवेळी खासदारांच्या निलंबनाविरोधात आघाडीतर्फे २२ डिसेंबर रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
काँग्रेस पक्षाने समर्थकांकडून देणगी गोळा करण्यासाठी 'डोनेट फॉर देश'नावाची मोहीम सुरू केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतः १.३८ लाख रुपयांची देणगी देऊन या मोहिमेची सुरुवात केली. पण, पक्षासोबत हास्यास्पद गोष्ट घडली. कारण काँग्रेसने ज्या नावासाठी मोहीम सुरू केली होती त्या नावाचे डोमेन नाव दुसर्याने नोंदणीकृत केले होते.फक्त नोंदणीच नाही तर तिथे भाजपला देणगी देण्याची लिंकही टाकली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाचे पडसाद शुक्रवार, दि. ८ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात उमटले. वीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारकर वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्याविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे मंत्रीपुत्र प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा कर्नाटक विधानसभेतून हटविण्याचे वक्तव्य केल्याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व ठाणे शहर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरज दळवी यांच्या नेतृत्वात प्रियांक खर्गे यांचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या पुतळ्याला चपला हाणुन लाथाडण्यात आले.यावेळी स्वा.सावरकरांचे योगदान काँग्रेसला लक्षात येणार नसल्याची टिका आंदोलकांनी केली.
वीर सावरकरांचा अपमान करणारे काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने तीव्र जनाक्रोश आंदोलन केले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना उपस्थित होते. मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, अधिकारी आणि भाजयुमो कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला आणि काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
विरोधकांच्या इंडी आघाडीत काँग्रेससह सामील असणारे उद्धव ठाकरे आणखी किती वेळा गप्प बसणार. त्यांना स्वातंत्र्यवीराचा वारंवार होणारा अपमान मान्य आहे का? असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मंत्री तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी केलेल्या सावरकरांच्या अवमानाच्या विरोधात नागपूर येथे भाजपातर्फे झालेल्या आंदोलनावेळी बावनकुळे माध्यमांशी संवाद साधत होते.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांच्याविरोधात महाराष्ट्र भाजपच्या वतीने दि. ८ डिसेंबर रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान आम्ही सहन करणार नाही. भाजपचे सर्व कार्यकर्ते उद्या राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील. वीर सावरकरांची प्रतिमा विधानसभेतून काढण्याच्या वक्तव्यावरून आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.