महाराष्ट्रामध्ये रहिवाशी क्षेत्रामध्ये एक गुंठा जमीनीचा तुकडा पाडता येईल, असा कायदा आम्ही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आणतो आहे, असे महसूलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
Read More
नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी तसेच विविध विभांगासाठी १० महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मंगळवार, २७ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही मंत्रिमंडळ बैठक पार पडली.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने खबरदारी घेत ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी दिली.
मुंबई मनपाच्या निवडणुकांची शक्यता लक्षात घेता, ठाकरेंना अचानक मुंबईबद्दल पुतनामावशीच्या प्रेमाचे कोरडे उमाळे दाटून येऊ लागले. ज्या ठाकरी कारभाराने मुंबईची बजबजपुरी केली, पालिकेत लूट आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घातले, मुंबईकरांचे जीवन असह्य केले, तेच ठाकरे आज अदानींच्या नावे मुंबईकरांची दिशाभूल करतात, हा विरोधाभास जनतेच्या नजरेतूनही सुटणारा नाही!
महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाबद्दल काय म्हणाले मंत्री नितेश राणे?
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर करण्यात आला. यामध्ये राज्याच्या प्रगतीची, तसेच राज्यासमोरील आव्हानांची सखोल मांडणी करण्यात आली आहे. याच आर्थिक पाहणी अहवालाचा घेतलेला हा धांडोळा...
Maharashtra Budget 2025 जगभरात आर्थिक तणावाची स्थिती असताना, महाराष्ट्राची आर्थिक घडी विस्कटू न देता, अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. १० मार्च रोजी ७ लाख २० हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. शेती, शेतीपुरक क्षेत्रे, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास आदी क्षेत्रांसाठी भरीव तरतूद त्यात करण्यात आली आहे. त्यामुळे ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प, असे त्याचे वर्ण करावे लागेल.
मुंबई : 'झिरो पेंडंन्सी'साठी परिचित असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयात सचिव ( Secretary ) पदावर करण्यात आली आहे. याआधी ते उपमुख्यमंत्री कार्यालयात सचिव पदावर कार्यरत होते.
मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद ही एक तांत्रिक व्यवस्था आहे. आम्ही तिघेही एकत्रितपणे निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. बुधवार, ४ डिसेंबर रोजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी मिळून सत्तास्थापनेबाबतचे पत्र दिले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या नावाची शिफारस करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. बुधवारी महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला असून गुरुवार, ४ डिसेंबर रोजी सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान, महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली.
महायुती सरकारच्या शपथविधीसाठी जय्यत तयारी सुरु असून महायूतीच्या नेत्यांकडून या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यासह अनेक नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केली.
रिपोर्ट कार्ड देण्याकरिता धाडस लागतं. त्यासाठी काम करावं लागतं, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला आहे. बुधवारी महायूती सरकारने संयुक्त पत्रकार परिषद घेत दोन वर्षांतील कामांचं रिपोर्टकार्ड सादर केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
( Mumbai Toll Exemption )एकापेक्षा एक महत्त्वाकांक्षी निर्णयांचा धडाका लावलेल्या महायुती सरकारने सोमवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी मुंबईकरांना अनोखी भेट दिली. मुंबईतील पाच प्रवेशमार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सोमवारी मध्यरात्री १२ वाजेपासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
सर्वांगीण विकासापासून कोसो दूर असलेल्या बंजारा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘बार्टी’च्या धर्तीवर 'वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था' (वनार्टी) स्थापन करण्याचा निर्णय सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर अमित गोरखे यांनी २५ हून अधिक जिल्हे आणि १५० हून अधिक तालुक्यांतील नागरिकांशी 'बहुजन संवाद यात्रे'द्वारे संपर्क साधला असून, ठिकठिकाणी या यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
उद्धव ठाकरेंनी एकदा आरसा बघावा. ज्या काश्मीरमध्ये ज्या ‘कलम ३७०’ मुळे काश्मीर भारतापासून वेगळे झाले होते. ते ‘कलम ३७०’ रद्द करणारे मोदी यांच्यासोबत गृहमंत्री अमित शाह आहेत.