(Mumbai Suburbs) मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी बांग्लादेशी आणि रोहिंग्यांची अवैध घुसखोरी रोखणे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी योग्य ती कार्यवाही त्वरित करावी आणि समितीचे लवकरात लवकर पुनर्गठन करावी, अशा सूचना मंत्री लोढा यांनी सोमवार, दि. २७ जानेवारी रोजी दिल्या. मुंबई उपनगरांना 'मिनी बांग्लादेश' बनू देणार नाही, असेही ते म्हणाले.
Read More
देशी खेळ जपले जावे त्याचबरोबर देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 'छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रिडा महोत्सवा चे आयोजन केले जाणार असल्याची माहिती कौशल्य, नाविन्यता, उद्योजकता आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. देशी क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या मंत्रालयात आयोजित बैठकीदरम्यान ते बो
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका वस्ती स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात येत असून, त्याद्वारे लॉट १२ अंतर्गत दुरुस्त केलेल्या सार्वजनिक शौचालयाचे आज पालकमंत्री लोढा यांनी लोकार्पण केले. वांद्रे पश्चिम येथील नित्यानंद नगर येथे हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. प्रसंगी भाजपा मुंबईचे अध्यक्ष आणि स्थानिक आमदार आशिष शेलार व मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यभरात रक्षाबंधनानिमित्त प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. यावेळी राज्याचे कॅबिनेट आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लोअर परेल येथे रक्षाबंधनानिमित्त मालवणी येथील महिलांना आमंत्रित केले होते. यावेळी मालवणीतील महिलांनी त्यांना राख्या बांधल्या आणि औक्षण केल्याचे पाहायला मिळाले.
प्रत्येक वॉर्डच्या कार्य क्षेत्रातील झोपडपट्टीत रस्ते काँक्रिटीकरणाबरोबरच मुलभूत सोयी - सुविधांचा विकास करण्याला प्राधान्य देण्यात येणार असून , दोन हजार महापालिकांच्या शाळांमध्ये जीम उभारण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. दरम्यान, मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन २०२३-२४ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ९२०.०० कोटी रूपये, अनुसूचित जाती उपयोजना ५१.०० कोटी रूपये व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) अंतर्गत ५.७१ कोटी रूपये असा एकूण ९७६.७१ कोटी र
मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या अनेक घटना घडत असून बुधवार दिनांक २८ जून रोजी मुंबईतील मालाड पश्चिम येथील मामलेदार वाडी परिसरात झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कौशल महेंद्र दोषी (वय ३८)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बुधवार सकाळपासूनच मुंबईत पावसाची रिमझिम सुरु असून मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरातील मणिभाई मुंजी चाळ येथे सुमारे ३५ फूट उंचीचे एक पिंपळाचे झाड कोसळले. यावेळी झाडाचा वजनदार भाग डोक्यावर पडल्यामुळे कौशल या ३८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही जुलै आणि आता ऑगस्टमध्ये बरसलेल्या पावसात मुंबईची तुंबई झालीच. त्यामुळे मुंबई महानगरपालिका पूरस्थिती रोखण्यासाठी विविध उपाययोजनांचा सातत्याने दावा करीत असली तरी यंदाही पालिकेने केलेल्या सर्व उपाययोजना फोल ठरल्या आहेत. त्यामुळे यावर्षीही मुंबईही बुडत्यांचे शहरच ठरले आहे.
मुंबई उपनगर तसेच ठाणे परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
“मुंबईमधील उपनगरात मोठ्या प्रमाणात मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. परंतु, राज्य सरकार त्यांच्या पुनर्विकासाकडे दुर्लक्ष करून केवळ मुंबई शहरामधील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी विनियमात सुधारणा करीत आहे. शासन केवळ स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी विकासकांना प्रोत्साहन देत आहे,” अशी टीका भाजपचे आमदार अॅड. पराग अळवणी यांनी नुकतीच राज्य सरकारच्या धोरणावर आक्षेप घेताना केली.
खर्चाचा तपशील न दिल्यामुळे ‘बेस्ट’ला देण्यात येणार्या मदतीबाबत महापालिका प्रशासन हात आखडता घेत असतानाच, आता ‘ग्राऊंड बुकिंग’मुळेही ‘बेस्ट’ला अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ‘बेस्ट’ तोट्यात येत असून कामगारांनाही मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
लहान मुलाच्या सर्वात जवळ त्याची आई असते आणि तिचे जास्त प्रयत्न असतात ते मूल घडवण्यामागे... परंतु, पैशाअभावी किंवा अज्ञानामुळे काही महिला ते करू शकत नाहीत. म्हणून स्त्रियांना सक्षम करणे व त्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या सर्वाचा विचार करून गरीब मुले व महिला यांसाठी ‘सिद्धी’ म्हणजे ‘प्रसिद्धी’ ही आपण म्हणू शकतो. ‘सिद्धी महिला कल्याणकारी संस्थे’ची स्थापना एप्रिल २०१६ रोजी करण्यात आली. नावाप्रमाणेच ही संस्था महिलांसाठी कार्यरत आहे. परंतु, गरीब मुले आणि शैक्षणिक कार्यातही या संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढच्या ४८ तासांमध्ये पावसाची शक्यता
मुंबईत सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई उपनगर जिल्ह्यात आज शनिवार, दि. ३ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी जाहीर केले.
मुंबईतल्या पावसाने भारतातील सर्वात जास्त पर्जन्यमान असलेल्या चेरापुंजीचा विक्रम मोडला आहे. चेरापुंजीत रविवारी २२८ तर मुंबईत गेल्या २४ तासांत २३१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.