( Vijaya Rahatkar ) भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सह प्रभारी विजया रहाटकर यांची प्रतिष्ठित व प्रभावी अशा राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही आपला ठसा उमटविला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा असेल.
Read More
२०२४च्या आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर भाजपाची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने पक्ष संघटनेत मोठे फेर बदल करण्यास सुरुवात केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने राष्ट्रीय पातळीवरील नव्या टीमची घोषणा केली आहे.
पालघरमध्ये दोन साधूंची हत्या ताजी असतानाच उत्तर प्रदेशमध्ये बुलंदशहर जिल्ह्यात पुन्हा दोन साधूंची हत्या झाली. गावातील मंदिरात दोन साधूचे मृतदेह आढळून आले.
अराजकीय भूमिकेचा नैतिक विजय झाल्याचे सांगत त्यांनी दिला राजीनामा
विजया रहाटकर यांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन
धनंजय मुंडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल आता महिला आयोगाकडूनही दखल घेण्यात आली आहे. धनंजय मुंडेंविरोधात सुमोटो दाखल करून घेण्यात आला असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राज्याच्या ग्रामविकास व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा नेटीझन्सनीही चांगलाच समाचार घेतला आहे. महिला कल्याणाचा आव आणत महिलांबद्दल स्वतःच्याच बहिणीबद्दल असे वक्तव्य करणारा, असा भाऊ कुणालाही न मिळो अशा भावना ट्विटरवर व्यक्त करून धनंजय मुंडेंनाही चांगलेच फैलावर घेण्यात आले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेससारख्या पक्षाच्या नेत्याचे स्वतःच्याच बहिणीबद्दलचे हे विधान अत्यंत वेदनादायी असल्याचे मत व्यक्त केले जात आ
महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणाची ही वारी आहे. वारीमध्ये प्रत्येक महिलेला सन्मान मिळतो, वारी समानतेचे प्रतीक असल्यानेच 'वारी नारीशक्ती' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे रहाटकर यांनी सांगितले.
पाळणाघरांसाठी नियमावली, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा, हतात्मा जवानांच्या वीरपत्नी यांच्यासाठीही रहाटकर यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने राज्य सरकारला वेळोवेळी महत्त्वपूर्ण शिफारशी केलेल्या आहेत.