हिदुत्ववादी विचारवंत विर सावरकर यांच्याविरोधातील वक्तव्याबाबत राहुल गांधी यांना लखनऊ येथील दंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावला होता. न्यायालयाच्या या आदेशाला गांधीनी विरोध करत सर्वोच्च न्यायालयात आव्हान केले होते. त्या आव्हानाला उत्तर प्रदेश सरकारने विरोध केला आहे. गांधी यांनी “पूर्वनियोजित कृतीद्वारे समाजात द्वेष पसरवला," असा आरोप करत राज्य सरकारने त्यांच्या याचिकेची फेटाळणी करण्याची विनंती केली आहे.
Read More
प्रसिद्ध पटकथा लेखक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी दाखल केलेल्या विशेष रजा याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने नोटीस बजावली आहे. 'कॉपीराइट कायदा, १९५७' अंतर्गत घोष यांच्यावर फौजदारी खटला दाखल झाला होता. हा खटला रद्द करण्याची मागणी झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असता, सर्वोच्च न्यायालयाने दंडाधिकारी यांच्या समोर वैयक्तिकरित्या हजर राहण्यापासूनही सूट देत घोष यांना दिलासा दिला आहे.