सत्यजित तांबे हा तर ‘ट्रेलर’ आहे. तांबे ज्यांना कुटुंबप्रमुख मानतात, तेही सत्यजित तांबेंसारखे वागले, तर काँग्रेसचे काही खरे नाही!
Read More
कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष असल्याचा हवाला त्यासाठी पवारांनी दिला. पण, तेच पवार मुंबई क्रिकेट संस्थेचे अध्यक्ष आहेत. मग तिथे त्यांची बुद्धी का चालत नाही? कुस्तीच्या खेळाचे नियम अगत्याने कथन करणार्या पवारांना क्रिकेट कसे व कोणाशी खेळतात, हे ठाऊकच नाही का? असते तर त्यांनी ‘मोदी-शाह इतक्या सभा कशाला घेत आहेत,’ असा उलटा प्रश्न नक्कीच विचारला नसता. क्रिकेट कसे खेळतात? कुस्ती व क्रिकेटमधील साधर्म्य काय आहे?
जम्मू-काश्मीरच्या नावावर फक्त पैसे खाणार्यांचा, फुटीरतावाद्यांना पाठीशी घालणार्यांचा, पाकिस्तानशी संधानबांधणार्यांचा हा भारत नाही, तर समस्येच्या मुळाशी हात घालणारा, घाव घालणारा हा भारत आहे. परंतु, हा भारत जसा पाकिस्तानला नकोय तसाच काँग्रेसलाही नकोय. म्हणूनच तर दोघेही समदुःखी एकाच सुरात गळे काढताना दिसतात!