“आचरणातील शुद्धता, वैचारिक स्पष्टता आणि एकनिष्ठता ही स्व. मदनदासजी देवी यांच्या जीवनाची त्रिसूत्री होती. ’स्व’ विसरणे सोपे नसते; पण मदनदासजींनी संघटनेसाठी जीवन समर्पित केले. राष्ट्र, समाज आणि देशसेवेत किती टोकापर्यंत जायला हवे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचे जीवन होते, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी मदनदासजी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Read More
संघ वा संघ परिवारातील संस्थांमध्ये सर्व निर्णय सामूहिक चिंतनातून व चर्चेतून घेतले जातात. असे असले तरी या प्रक्रियेचे नेतृत्व कोणीतरी जबाबदार व्यक्तीने करावे लागते. अभाविपच्या राष्ट्रीय स्तरावरील या टीमचे नेतृत्व प्रथम प्रा. केळकर व पुढे मदनजींनी केले. प्रदीर्घ काळ चाललेल्या चिंतनातून व प्रत्यक्ष कार्यानुभवातून अभाविपचे संघटन मंत्र व संघटन तंत्र विकसित झाले. त्या प्रक्रियेला योग्य गती व दिशा देण्याचे कार्य या दोन्ही नेत्यांनी दीर्घकाळ अगदी समर्थपणे केले.
कधीकाळी छात्रशक्तीची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेऊन भारतभर फिरणारा हा पैलवान शरीराने थकत चालला. पुढे व्हीलचेअर सोबतीला आली तरीही संघटनेच्या, कार्यकर्त्यांच्या, परिवाराच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची, अपेक्षित त्या बैठकीला जाण्याची एक अनामिक ओढ, तरल इच्छा कळकळ शेवटपर्यंत कायम राहिली आणि त्यामुळे थकलेल्या शरीरानेही मदनजी अनेकांना भेटत राहिले. अनेकांना त्याही स्थितीमध्ये प्रेरणा देत राहिले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुंबईतील रौप्य महोत्सवी अधिवनेशनानिमित्त वसईत आम्ही विद्यार्थी मेळावा आयोज्ति केला होता. त्या मेळाव्यास राष्ट्रीय संघटनमंत्री मदनदास देवी व प्रदेश सरचिटणीस माधव ठाकूर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात तेव्हा माझी त्यांच्याशी भेट झाली. तेजस्वी चेहरा व ओजस्वी भाषणाने त्यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली होती.
मदनदास देवी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अर्ध्वयू आणि समाजजीवनावर आपली अमीट छाप उमटवणारे समाजशिल्पी. समाजशिल्पी एवढ्यासाठी की, त्यांनी हजारो कार्यकर्त्यांमधील सामाजिक चेतना जागृत केली. केवळ जागृत केली नाही, तर प्रवाही केली. त्या प्रवाहाने हा देश नव्याने घडला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. माझ्या विद्यार्थीदशेत मदनदासजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटनमंत्री होते. त्यामुळे तेव्हापासून अलीकडच्या काळापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाचे भाग्य मला लाभले. अभाविपची पाळेमुळे घट्ट करणे आणि त्या संघटनेचा विकास यात मदनदासजींचा सिंहाचा वाटा आहे. ते चार्टर्ड अकाऊंटन्सीमध्ये सुवर्ण पदक विजेते होते.
गेले काही वर्षं आजाराशी संघर्ष करणारे पुरुषार्थी व्यक्तिमत्त्व शेवटी आपली जीवनयात्रा पूर्ण करून स्वर्गागमन करते झाले. देवी कुल परंपरेने, प्राप्त संस्काराने युक्त, संघ संस्काराने अधिक विकसित झालेले व अभाविपच्या कार्यानुभवातून बहुमुखी घडलेले व्यक्तित्त्व म्हणजे तुमचे-आमचे सर्वांचे सुपरिचित मदनदासजी... जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा जीवनाचा शेवटचा दिवस निश्चित असतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटनमंत्री आदरणीय मदनदासजी देवी यांचे आपल्यातून अचानक निघून जाणे मनाला वेदना देणारे आहे. मदनदास देवीजी यांनी रा. स्व. संघाचे प्रचारक म्हणून स्वतःला राष्ट्र आणि समाजासाठी समर्पित केले होते. बालपणापासूनच त्यांनी राष्ट्रसेवेसाठी आपलं आयुष्य व्यतीत केले. मदनदासजी हे माझ्यासारख्या विविध क्षेत्रांतील अनेक कार्यकर्त्यांचे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व. माणूस आणि कार्यकर्ता घडवणारे ते एक विश्वविद्यालय होते. म्हणूनच त्यांच्या जाण्याने
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी (वय ८१ वर्षे) यांचे सोमवार (२४ जुलै) रोजी पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. आजारपणाशी झुंजणार्या मदनदासजी यांची प्राणज्योत अखेर मालवली. राष्ट्रोत्थान रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे यांनी दु:ख व्यक्त करतानाच श्रद्धांजली अर्पित केली आहे. त्यांच्या पार्थि
छात्रशक्तीचे रूपांतर राष्ट्रशक्तीमध्ये करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) माजी सह-सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) माजी राष्ट्रीय संघटन मंत्री मदनदास देवी यांचे सोमवारी पहाटे ५ वाजून ५ मिनिटांनी बंगळुरू येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८१ वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.