महाविकास आघाडीच्या वळचणीला जात काल-परवा मुंबईमध्ये पार पडलेल्या ‘सत्याच्या मोर्चा’मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उभे आयुष्य ज्यांना विरोध केला, त्या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मांडीला-मांडी लावून बसल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. राजकीय सोय म्हणून राज ठाकरे यांचे वागणे सोयीचे असले, तरी वैचारिकदृष्ट्या त्यांचा झालेला बुद्धिभेद राज यांना मानणार्या वर्गाला निश्चितच पटला नसेल. पण, राजकारणाच्या नावाखाली सतत भूमिका बदलणार्या राज यांना कोण सांगेल की, हे वागणं बरं नाही. जेव्हा पक्
Read More
( Mahavikas Aghadi ) "विना परवाना मोर्चा काढला तर शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई होईल."असे स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक नोव्हेंबर च्या विरोधकांच्या मोर्चावर दिले आहे. तर "हिंदू नावाची उबाठा गटाला ॲलर्जी असल्याने फॅशन स्ट्रीट म्हणण्याची वेळ उबाठा गटावर आली आहे. आणि लोकसभेला जागा वाढल्या तेव्हा गप्प असणारे विरोधक आता आयोगावर प्रश्नचिन्ह उभा करून नौटंकी करीत आहेत."अशी टीका भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवार दि.३१ रोजी केली.
(Sanjay Raut) उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेस वरिष्ठ नेत्यांना लिहिलेल्या पत्रात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्याविरोधातील तक्रार नोंदवली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस हायकमांडकडे संजय राऊतांच्या याचं तक्रारीमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीत मनसेला(MNS) घेण्यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मांडलेल्या भूमिकेवरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) ही तक्रार केली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. विशेषत: बेस्ट कामगार पतपेढीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात दिवसभर या भेटीची चर्चा रंगली होती.
(Mumbai BEST Election Results) मुंबईतील 'दी बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटी'ची निवडणूक सोमवारी १८ ऑगस्ट रोजी पार पडली. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निकालाने ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत प्रचंड चर्चा असलेल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला २१ पैकी एकही जागा जिंकण्यात यश आलेले नाही. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि
(Navnath Ban On BEST Elections) राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या मुंबईतील 'दी बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटी'ची निवडणूक सोमवारी १८ ऑगस्ट रोजी पार पडली. या निवडणूकीत मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन लढवलेल्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळवता आलेली नाही. या पराभवामुळे ठाकरे गटाने बेस्ट पतपेढीतील तब्बल ९ वर्षांची सत्ता गमावली आहे. दुसरीकडे भाजप आणि शशांक राव यांच्या नेतृत्वातील पॅनलने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवार दि. २० ऑगस्ट रोजी भ
(Sanjay Raut on Best Election Result) मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या मुंबईतील 'दी बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटी'च्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या नेतृत्वातील उत्कृष्ट पॅनेलचा दारुण पराभव झाला आहे. यासह बेस्ट पतपेढीतील ९ वर्षांची सत्ता ठाकरे गटाने गमावली आहे. याविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता खासदार संजय राऊत यांनी आपल्याला निकालाची माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली.
(Shashank Rao On BEST Election) मुंबईतील 'द बेस्ट एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी'च्या निवडणुकीत शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत पॅनलने १४ जागा जिंकत एकहाती यश मिळवले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या 'उत्कर्ष' पॅनलला २१ पैकी एकही जागा मिळवता आली नाही. या निकालानंतर शशांक राव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटावर टीका केली. तसेच "कोणी कितीही एकत्र आले आणि त्यांनी कामगारांचे हित पाहिले नाही तर भोपळाच मिळणार ना", असा टोला शशांक राव यांनी लगावला.
राज्यात शिवसेनेत पक्ष प्रवेशाची लाट सुरू असून शनिवारी ठाण्यातील आनंद आश्रम येथे कल्याण लोकसभेतील प्रभावी पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडलेल्या या प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ विभागातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शनिवार, २६ जुलै रोजी मनसेत ९ नव्या विभाग अध्यक्षांच्या नियूक्त्या करण्यात आल्या असून अनेक जागांवर फेरबदलही करण्यात आले आहेत.
डोंबिवलीत कॉग्रेस आणि मनसे ला खिंडार पडले असून विधानसभा निवडणूकीत सगळ्य़ात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपात अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणूकीचे बिगुल वाजयला सुरूवात झाली असून भाजपात जोरदार इनकमिंग सुरू झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. कॉग्रेस, मनसे यांच्यासह विविध मंडळातील कार्यकर्ते, शेकडो नागरिकांसह त्यांनी रविवारी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेश अध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रवेश करण्यात आला आहे.
(Manoj Tiwari On Raj Thackeray) महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदीच्या मुद्यावरून वाद चांगलाच पेटला आहे. मिरा-भाईंदर येथे व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून सभा घेतली. या सभेत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, मराठीच्या मुद्द्यावरुन अभिनेता, भाजप खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे. "राज ठाकरे यांच्यासोबत जो जाईल तोही संपणार", असे खासदार तिवारी यांनी थेट राज ठाकरे यांचे नाव घेऊन म्हटले आहे
(Nishikant Dubey On Raj Thackeray) मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांना आव्हान दिले होते. शुक्रवारी राज ठाकरे यांनी मिरा भाईंदर येथे सभा झाली. यावेळी त्यांनी निशिकांत दुबे यांच्यावर तोफ डागली. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा पलटवार करत प्रत्युत्तर दिले आहे.
आज अशा लोकांना जर माफ केले गेले तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे नेते राज ठाकरे यांनी दिली आहे. गुरुवारी विधानभवनात झालेल्या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला.
(Raj Thackeray) राज्यात सुरु असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात घमासान पाहायला मिळाले. दरम्यान, गुरुवारी १७ जुलैला विधीमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये 'काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?' असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
(Uddhav Thackeray Saamana Interview) उबाठा खासदार संजय राऊत यांनी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर नुकताच जारी करण्यात आला आहे. ‘सामना’तून ही उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ मुलाखत येत्या १९ आणि २० जुलै रोजी दोन भागांमध्ये प्रसारित होणार आहे. मुलाखतीला ‘ब्रँड ठाकरे’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी एक्सवर टीझर पोस्ट करुन माहिती दिली आहे. १९ आणि २० जुलैला सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरे मिळणार, असेही या टीझरमधून सांगितले जात आहे.
(Raj Thackeray on MNS-UBT Alliance) राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यात एकत्र आल्यावर राजकीय वर्तुळात आता मनसे आणि उबाठाच्या युतीच्या चर्चेने जोर धरला. मात्र दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. एकीकडे उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक असल्याचे बोलत असले तरी राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध पोलिस महासंचालकांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. अॅड. नित्यानंद शर्मा, अॅड. पंकज कुमार मिश्रा आणि अॅड. आशिष राय यांनी ही तक्रार केली आहे. वरळीतील विजयी रॅलीमध्ये राज ठाकरेनी भडकाऊ भाषण केल्याचे आरोप केले आहेत. महाराष्ट्रात रहात असलेल्या परराज्यातील नागरिकांवर हल्ले केले जात आहेत.
पुणे जिल्ह्यातील उबाठा गट आणि मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवार, १० जुलै रोजी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील आनंदआश्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
(Avinash Jadhav) मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून मराठीवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा-भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (८ जुलै) मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाईला सुरूवात केली आहे. सोमवारपासून पोलिसांनी मनसे आणि उबाठाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी पहाटे पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव
मीरा-भाईंदरमध्ये मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मंगळवार, ८ जुलै रोजी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे आंदोलनस्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, या मोर्चाला परवानगी का नाकारण्यात आली यामागचे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
(Marathi MNS Morcha in Mira bhayandar) मराठीच्या मुद्द्द्यावरुन मीरा-भाईंदर परिसरात मनसे, उबाठा गट आणि मराठी एकीकरण समितीकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे वातावरण चिघळले होते. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता मात्र पोलिसांनी अचानक आपली भूमिका बदलत मराठी मोर्चाला परवानगी दिली. सध्या बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन या मार्गाने मोर्चा निघाला आहे.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मीरा-भाईंदरमध्ये सध्या वातावरण तापले असून पोलिसांनी ताब्यात घेतलेले मनसे नेते अविनाश जाधव यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी सुटका करताच त्यांनी मोर्चात सहभाग घेतला.
आधी त्या शेखच्या कानाखाली वाजवा आणि मग आपण हिंदी सक्तीबद्दल चर्चा करू, अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी मनसेवर केली आहे. मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असून त्याने एका महिलेला शिवीगाळ केल्याची घटना घडली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय क
एका मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाने भर रस्त्यात दारू पिऊन धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये तो अर्धनग्न अवस्थेत एका महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे.
शिवसेना सोडण्यापूर्वी राज माझ्याकडे आला आणि नाशिकची मागणी केली,” अशी आठवण खुद्द हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बर्याच वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये सांगितली होती. "नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि कायम राहील,” असे बाळासाहेब नेहमी म्हणत. ते होते तोपर्यंत हे खरेही होते. मात्र, त्यांच्यापश्चात पक्षावर मांड ठोकलेल्या उद्धव ठाकरे यांच्या हातातून हा बालेकिल्ला पूर्णपणे सुटला आहे. त्याचा पाया राज ठाकरे, तर कळस भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी चढवण्याचे काम केले. आपल्या पहिल्याच निवडणुकीत मनसेने ना
(Kangana Ranaut) महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी - हिंदी भाषेवरुन राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. सरकारकडून हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही जीआर रद्द केले. यानंतर ५ जुलै मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांचा विजयी मेळावा मुंबईत पार पडला. दरम्यान या सगळ्या प्रकरणावरुन आता अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर उबाठा आणि मनसेच्या वतीने शनिवार, ५ जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या यूतीसंदर्भात एक मोठे विधान केले आहे. एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच असे ते म्हणाले आहेत.
पुढे काय काय गोष्ट घडतील याची कल्पना नाही. परंतू, मराठीसाठीची ही एकजूट कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे स्वप्न पुन्हा साकारावे, अशी अपेक्षा बाळगतो, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. शनिवार, ५ जुलै रोजी वरळीतील डोम सभागृहात आयोजित ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी वरळीच्या डोम मैदानात झालेला मेळावा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. या मेळाव्याला भाकपचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, माकपचे अजित नवले, रासपचे महादेव जानकर, विनोद निकोले आणि भालचंद्र मुणगेकर यांनी हजेरी लावली. मात्र, काँग्रेसने या मेळाव्यापासून जाणीवपूर्वक अंतर राखले. राज ठाकरेंच्या याआधीच्या आक्रमक भूमिकेमुळे बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याची भीती काँग्रे
(Sushil Kedia) गेल्या महिन्याभरापासून मुंबईसह राज्यात सुरु असलेल्या मराठी - हिंदी भाषेच्या वादात केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी उडी घेतली आहे. त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोशल मीडियावरुन आव्हान दिले आहे. केडिया यांनी राज ठाकरे यांना एक्सवर टॅग करत 'आपण मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा' अशी पोस्ट केली आहे.
हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली असून आता पक्षाने पुन्हा एक नवीन मोहिम हाती घेतली आहे. या माध्यमातून राज्यभरातून गुगल फॉर्मद्वारे नागरिकांच्या प्रतिक्रिया मागवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये, असा हल्लाबोल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. मनसे-उबाठा यूतीच्या चर्चांवरून त्यांनी नाव न घेता संजय राऊतांनाच हा टोला लगावल्याचे सांगण्यात येत आहे.
मनसेसोबत यूती करण्याशिवाय उद्धव ठाकरेंकडे दुसरा पर्यायच नाही. उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती केली तर त्यांच्या थोड्या तरी जागा येतील, असा टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. शुक्रवार, २० जून रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या आधीच मनसैनिकांना पत्र लिहीत शुभेच्छा देण्याकरिता शिवतीर्थावर येऊ नका असे आवाहन केले आहे. बुधवार, ११ जून रोजी त्यांनी मनसैनिकाना पत्र लिहिले असून माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली भेट होणे शक्य नाही, असे म्हटले आहे.
मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून मंगळवार, १० जून रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर धडक मोर्चा काढला आहे. गावदेवी मैदानापासून ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.
उबाठा-मनसे यूतीचं घोडं नेमकं कुठे अडलंय?
राज्यभरात उबाठा गट आणि मनसेच्या यूतीच्या चर्चा सुरु असून आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. आमच्या सरकारने जनतेला दिलेला संकल्पनामा पूर्ण करण्यासाठी आम्ही लढतो आहोत. आम्हाला इतर गोष्टीत रस नाही, असे ते म्हणाले.
राज्यभरात सध्या मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीबाबत चर्चा सुरु असताना आता उद्धव ठाकरेंनीदेखील आपले मौन सोडले आहे. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंसोबतच्या यूतीबाबत संकेत दिले आहेत.
एकत्र येण्याबाबत राजसाहेब आणि उद्धवजी बोलले तरच काहीतरी होईल. त्यामुळे आता त्यांची इच्छा असल्यास त्यांनी फोन करावा, अशी प्रतिक्रिया मनसे नेते आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी दिली आहे. उबाठा गट आणि मनसेच्या यूतीबाबात आदित्य ठाकरेंनी केलेल्या विधानानंतर त्यांनी गुरुवार, ५ जून रोजी माध्यमांशी संवाद साधत ही प्रतिक्रिया दिली.
आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहे. महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत, असे विधान उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीबाबत त्यांनी गुरुवार, ५ जून रोजी ही प्रतिक्रिया दिली.
ठाकरे बंधू एकत्र यावे ही आमची प्रामाणिक ईच्छा आहे, असे म्हणत उबाठा गटाकडून पुन्हा एकदा यूतीकरिता मनसेला साद घालण्यात आली आहे. सोमवार, २ मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर असताना उबाठा गटाचे नेते सुनील प्रभू यांनी ही प्रतिक्रिया दिली.
केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत प्रतिपालिका सभागृह हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आदित्य ठाकरेंना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. यासोबतच कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनादेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यभरात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, मनसेतील दुसऱ्या फळीतील काही नेत्यांचा या यूतीला विरोध असल्याचे दिसते. या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत न जाण्यासाठी पक्षनेतृत्वाला विनवणी केल्याचीही चर्चा आहे.
राज्यभरात सध्या मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत जाण्याची तयारी दाखवत एक अटदेखील ठेवली आहे. महाराष्ट्राचे हित ही एकच माझी शर्त असल्याचे ते म्हणाले.
मुंबई 'मेट्रो- ३'च्या टप्पा २अ मधील कामे प्रगतीपथावर आहेत. या टप्प्यातील मेट्रो स्थानकांवर सध्या नामफलक लावण्याचे काम सुरू असून, लवकरच सर्व स्थानकांची नावे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ठळकपणे लावली जातील याची हमी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने दिली आहे. यापूर्वी आरे ते बीकेसी दरम्यानचा मेट्रो-३ चा टप्पा सुरू झाला असून, त्या मार्गावरील सर्व स्थानकांवर मराठी आणि इंग्रजीत नामफलके आहेत.
मनसे नेते संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून फोन करून शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच घरी येऊन मारण्याची धमकीही या अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, संदीप देशपांडे यांनी या अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
(MNS News) मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी याचिका उत्तर भारतीय विकाससेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे. मनसैनिक आणि त्यांचे नेते राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप करणारी ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय देणार, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.