(Raj Thackeray) राज्यात सुरु असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात घमासान पाहायला मिळाले. दरम्यान, गुरुवारी १७ जुलैला विधीमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये 'काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?' असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
Read More
आज राज्यभरातून धनगर समाज 'ढोल बजाओ' आंदोलन