कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील कृष्णा नदी पात्रात भगवान विष्णूची मूर्ती सापडली असून सदर मूर्तीचे प्रारूप हे रामललासारखे असल्याचे समोर आले आहे. तसेच, भगवान विष्णूच्या मूर्तीसोबतच प्राचीन शिवलिंगही सापडले आहे. दरम्यान, इस्लामी आक्रमकांपासून संरक्षण करण्यासाठी सदर मूर्ती कृष्णा नदीच्या पात्रात टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Read More
भारतीय शिल्प-मूर्ती-चित्रकला या सर्व व्यक्त कलांमधील चिह्नसंस्कृतीची जोपासना करणाऱ्या निर्मात्या शिल्पकाराच्या-मूर्तीकाराच्या-चित्रकाराच्या निर्मितीमागील नेमक्या धोरणाचा परिचय, प्राध्यापिका डॉ. विद्या दहेजीया यांनी फार रोचक शैलीत करून दिला आहे.
चिह्नसंस्कृती ‘सिम्बोलिझम’ किंवा प्रतिकशास्त्र म्हणजेच ‘आयकॉनॉलॉजी’ याचा अभ्यास करताना एक वास्तव विशेष प्रकर्षाने जाणवले की, प्राचीन भारतीय समाजाने या चिह्नांचा आणि प्रतिकांचा वापर शिशु-किशोर-कुमार वयातील विद्यार्थी आणि स्त्री-पुरुष नागरिकांच्या शिक्षणासाठी फार चतुराईने केला होता.