Ramnavami 2025 वाल्मिकी ऋषींची गेली हजारो वर्षे मानवी मनाला शांत करणारी रसाळ मधुकथा म्हणजेच रामकथा. राम आणि सीतेची ही सुंदर कथा खूप प्राचीन. काळाची पाऊले जशी पुढे पडायला लागली, तशी ही कथा केवळ भारताची राहिली नाही, तर ती देशांच्या सीमा ओलांडून हिमालयापारही गेली. देशोदेशीचे राजकीय संबंध बदलत राहिले, नवीन सामाजिक परिस्थिती आकाराला आली आणि माणसाच्या एकूणच राहणीमान, जीवनमानातील स्थित्यंतरांनी प्रगतीचा आलेख गाठला. पण, या सगळ्या बदलांना तोंड देत, ही मधुर कथा देशविदेशातील विद्वानांच्या आणि रसिकांच्याही मुखात रुळली.
Read More
Lord Shree Ram अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या (Lord Shree Ram) दुसऱ्या मजल्यावर ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. हा निर्णय सर्वांच्या साक्षीने घेण्यात आला आहे, अशी माहिती तिर्थक्षेत्राचे खजिनदार महंत गोविंद देवगिरी यांनी गुरावारी दिली होती. महंत श्री गिरी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारत्मा अशोक सिंघल अयोध्येत आले आहेत. प्रभू श्रीरामाचे चरित्र हे भाविकांना समजावे. त्याचा त्यांनी अभ्यास करावा असा एक हेतू यामागे आहे.