मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अशा योजनांच्या अंमलबजावणीत महावितरणने देशात नावलौकिक मिळवला असून ऊर्जा परिवर्तनाचे महावितरणचे मॉडेल जगासाठी मोठे उदाहरण ठरणार आहे. महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हे शक्य झाले आहे.परंतु महावितरणला आर्थिकदृष्टया अधिक सक्षम करणे गरजेचे असून त्यासाठी सर्वानीच कटिबद्ध होऊन मिशन मोड वर काम करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
Read More
अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने यंत्रणेसाठी हाय अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीसह पावसाळ्यातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आपत्कालिन नियोजन करण्यात आले आहे.
बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ मार्च २०२५पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
मुंबई : “घरांच्या छतावर सौरऊर्जानिर्मिती ( Solar Energy ) पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या योजनेत उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याला गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारकडून २६० कोटी, ९१ लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळाली आहे,” असे ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.
महावितरणकडून शेतीसाठी सौर ऊर्जेचा देशात सर्वाधिक वापर करण्यात येणार असून यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीज पुरवठा मिळणार असून औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांवरील सबसिडीचा बोजा कमी होईल. स्वस्त सौर ऊर्जेमुळे वीज खरेदीच्या खर्चात मोठी बचत होऊन सर्वच वीज ग्राहकांचे वीज दर मर्यादित राखण्यात मदत होईल.
राज्यात वीज ग्राहकांनी छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने दिलेले १०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट महावितरणने चार महिने आधी पूर्ण केले असून या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांचे आणि महावितरणच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. उद्दीष्ट पूर्ण झाले असले तरीही महावितरण ही मोहीम यापुढेही चालू ठेवणार असून अधिक जोमाने काम करेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मुंबई : ऊर्जा ही सर्व प्रगती साध्य करण्याची मुलभूत गरज आहे. सर्व क्षेत्रांच्या प्रगतीकरिता आवश्यक तेवढी ऊर्जा उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याद्दष्टीने महावितरण सध्या चांगले काम करत आहे, असे महावितरणचे नवनिर्वाचित अध्यक्ष लोकेश चंद्र म्हणाले. तसेच, गेली अनेक वर्षे महावितरणमधील अधिकारी व कर्मचारी सातत्याने कठोर परिश्रम करत आहेत. ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व शाश्वत वीजपुरवठा देत वीजहानी कमी करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र म्हणाले.
मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून लोकेश चंद्रा (भाप्रसे) यांनी पदाची सूत्रे स्वीकारली आहे. याआधी ते मुंबई ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक पदी कार्यरत होते. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा हे १९९३ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी (दिल्ली) मधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी आणि एमटेक (स्ट्रक्चर्स) पदवी प्राप्त केली आहे.
पुणे जिल्ह्यात पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संयुक्त कंपनी / विशेष हेतु कंपनीच्या (स्पेशल पर्पज व्हेइकल) संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे.