कोरोनासारख्या संकटांचे निराकरण करण्यासाठी ‘आरोग्य सेतू’ हा अनुप्रयोग प्रासंगिक प्रयत्न व सामूहिक दायित्वाचे द्योतक आहे. मात्र, त्याला व्यक्तीच्या खासगीपणावरील अतिक्रमण समजणे मूर्खपणाच ठरेल.
Read More
मान्सून परतीच्या मार्गावर असला तरी मुंबईतील खड्ड्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही. त्यामुळे मुंबईतील खड्ड्यांची सद्यस्थिती, खड्डे भरण्याचे तंत्रज्ञान आणि पालिकेच्या उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
११ मे रोजी नाना पालकर स्मृती समितीच्या इमारतीमध्ये अवयवदान क्षेत्रातील तज्ज्ञ समाजसेवक अनिरूद्ध कुलकर्णी यांचे ‘अवयवदान’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अवयवदान हा विषय तसा गंभीरच. या व्याख्यानामध्ये काय असेल बरं... असा अंदाज घेत असताना वाटले की, मृत्यू, त्यानंतरची नातेवाईकांची होरपळ, अवयवदान म्हणजे काय? किंवा मृत्यू आणि कायद्याची जड गंभीरता या व्याख्यानामध्ये नक्की असेल असे वाटले. पण हे व्याख्यान म्हणजे मानवाच्या मृत्यूनंतरही त्याला लाभलेल्या जीवदानाच्या अद्भुत शक्तीविषयीचे सकारा
समाजातील दुर्बल, गरीब, वंचित मतिमंद मुलांसाठी काम करण्याच्या उद्देशाने २०१२ मध्ये ‘माय अॅक्टिव्हिटी सेंटर’ची स्थापना विकास घोगरे यांनी केली. या सेंटरमध्ये २२ मतिमंद मुले शिकत आहेत, तर १४ जणं निवासी शिक्षण घेत आहेत.
विक्रोळीच्या शुश्रूषा सुमन रमेश तुलसीयानी रुग्णालयामध्ये १७ फेब्रुवारी रोजी अतिशय व्यापक स्वरूपाचे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. हजारो गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. . त्याचा घेतलेला हा आढावा...
विद्यार्थीदशेत जे शिक्षण घेतले जाते तेच शिक्षण आयुष्यभराच्या पुंजीसाठी पूरक असते. मात्र, या पुंजीसाठी शिक्षणपद्धतीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. उत्तम शिक्षणपद्धतीतच उद्याचे भविष्य घडते. याचा उत्तम प्रत्यय म्हणजे संडे सायन्स स्कूल!
आजकाल ‘मेवा तिथे सेवा’ हे ब्रीद घेऊन समाजसेवकाचा मुखवटा लावलेल्या कितीतरी संस्था आणि व्यक्ती पैशाला पासरी आहेत. उद्देश एकतर लोकसहभागातून कोणती ना कोणती विचारधारा लोकांच्या मनावर लादण्यासाठी तसेच या माध्यमातून सर्व प्रकारचे दान उकळणे असाच काहीसा असतो, पण मग भूमी जीवदया संवर्धन संस्थेच्या या पशुपक्षी प्रेमाचा, सेवेचा उद्देश काय?