१९३३ ते १९४५ असा दहा वर्षांहून अधिकचा कालखंड हा जगाच्या पाठीवरचा काळा कालखंड. यादरम्यान हिटलरप्रणीत नाझी जर्मनीकडून जवळपास सहा दशलक्ष ज्यूंची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. नाझी जर्मनीच्या या पाशवी हत्याकांडावर अनेक पुस्तकं, नाटकं, चित्रपटदेखील होऊन गेले. पण, दुर्देवाने ज्यूंच्या रक्ताने हात माखलेले नाझी युद्धसैनिक आजही युरोपसह अमेरिकेत आश्रयास आहेत. याचे कारण म्हणजे, चर्चच्या संगनमताने या नाझी युद्धसैनिकांचे मागच्या दाराने अमेरिका, लॅटिन अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांत गपचूप पुनर्व
Read More
‘ग्लोबल साऊथ’ देशांची विभागणी पॅसिफिक/ओशनिया बेट राज्ये, आसियान देश, दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील देश, आफ्रिकन देश अशी केली जाते. ‘ग्लोबल साऊथ’ हा शब्द सामान्यतः लॅटिन अमेरिका, आशिया, आफ्रिका आणि ओशनिया या प्रदेशांना सूचित करतो. भारतानेही या ‘ग्लोबल साऊथ’च्या समस्या, आव्हाने वेळोवेळी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मांडली. त्यानिमित्ताने एकूणच या संकल्पनेविषयी...
अशा देशात जिथे अन्नपाण्यासाठी लोक आसुसले आहेत, तिथे जन्मलेल्या मुलांचेही पालनपोषण करणे पालकांना मुश्कील. पण नाही, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपती महोदयांनी सर्व नागरिकांना सहा (नेमकी सहाच का, ते कळण्याचा मार्ग नाही.) मुलं जन्माला घालण्याचे आवाहन केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
मादुरोंच्या कार्यपद्धतीवर ठपका ठेवत अमेरिकेने व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध लादले आहेत.तेलाच्या निर्यातीवरच थेट बहिष्कारच टाकला आहे. त्यामुळे तेलनिर्यातीवरच जगणाऱ्या आणि फुलणाऱ्या व्हेनेझुएलाच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या. वीज नाही, पाणी नाही, देशात काही जास्त उत्पादन होत नाही. त्यामुळे जनतेचीअवस्था बिकट झाली आहे.