रोगाचे मूळ जेव्हा आई किंवा वडिलांपासून मुलांमध्ये अनुवांशिकदृष्ट्या येते, तरीही असे दिसून येते की, आई-वडिलांच्या दोन मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार दिसून येतात. म्हणजेच काय ROOTS किंवा मूळ जरी एक असले तरी मुलांना होणारे आजार हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. म्हणजेच जी आजाराची स्थिती रुग्णामध्ये पाहिली जाते, ती कुठले मूळ सक्रिय आहे व कुठले घटक हे या स्थितीला उत्तेजता देणारे आहेत, हे पाहणे फार गरजेचे असते.
Read More
रोगाची मूळ स्थिती शोधताना काही अनुमान असे निघतात की, जर आईची मानसिक व शारीरिक स्थिती ही खूपच संवेदनशील व प्रखर असेल, तर ती स्थिती बरेचवेळा जशीच्या तशी मुलांमध्ये दिसून येते. याशिवाय अजूनही असे अनुमान काढता येते की, जेव्हा स्त्रीला गर्भधारणा होते, तेव्हा पुरुष बीज व स्त्री बीज एकत्र येऊन Zygote तयार होतो, म्हणजेच पुरुष आणि स्त्रीचे अतिशय शक्तीशाली कण एकमेकांमध्ये मिसळून त्यातून नवनिर्मिती होते. त्याचमुळे गर्भधारणेच्या वेळेस आई आणि वडिलांची जी ’State of disposition’ असते, ती ऊर्जेच्या स्वरुपात गर्भाकडे पाठवली