राज्य कोणतेही असो, सत्ताधारी राजकीय नेतेमंडळींना राज्यशकट हाकण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांचे सहकार्य हे अपेक्षित असते आणि तसे ते मिळतेही. पण, अनेकदा नेतेमंडळींनी, मंत्रिमहोदयांनी अधिकार्यांवर टाकलेल्या या विश्वासाचा गैरफायदाही घेतला जातो.
Read More
केरळमधील एलडीएफ सरकार हे आपले अपयश झाकण्यासाठी मोदी सरकारवर आरोप करत आहे, असा टोला भाजपचे केरळ प्रभारी प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी पत्रकारपरिषदेत लगावला.
सलग दुसर्यांदा केरळच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना, पिनाराई विजयन यांनी ‘जुने फेकुनि नवीन घ्या’चा वृत्तीचा अवलंब केला.आपल्या पहिल्या कार्यकाळातील अनुभवी मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवत, थेट अननुभवींची मंत्रिपदी त्यांनी वर्णी लावली. तेव्हा, विजयन यांचा हा खांदेपालटाचा राजकीय जुगार केरळसाठी तारक ठरतो की मारक, ते भविष्यात स्पष्ट होईलच.
पलक्कड विधानसभेत भाजपचे इ. श्रीधरन यांची आघाडी