देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणार्या क्रांतिकारकांना समर्पित ’क्रांतीगाथा’ या भूमिगत दालनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी राजभवन येथे झाले.
Read More
‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर` हे नाव कानावर पडताच एक नव्हे, अनेक असे त्यांचे अवतार आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. महाकवी, उत्कृष्ट वक्ता, लेखक, क्रांतिकारक, साहित्यिक, समाजसुधारक आणि विलक्षण दूरदृष्टी असलेला हिंदूनिष्ठ नेता अशा अनेक अवतारांची सांगड म्हणजे तात्याराव सावरकर. पण, त्यांची भूमिका कुठलीही असली तरी मनातले ध्येय मात्र एकच आणि ते म्हणजे राष्ट्रसेवा. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या सावरकरांच्या जीवनातील अशाच काही धीरोदात्त प्रसंगांचे स्मरण करणारा हा लेख...
सावरकर हे एक संयमी, दूरदर्शी आणि मानवतावादी विचारवंत होते. त्यामुळे देश पारतंत्र्यात असताना आपल्याला गुलामगिरीत जखडणार्या परराष्ट्राविरूद्ध अपरिहार्य म्हणून त्यांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केलेला असला, तरी त्याच सावरकरांनी भारत स्वतंत्र होताच आपल्या ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारक संघटनेचे विसर्जन करून आता स्वतंत्र भारतात आपण सर्वांनी हिंसक वृत्तीचा त्याग करून लोकशाही नि अहिंसक मार्गांचा उपयोग करून सत्तापरिवर्तन करण्यासाठी स्वतंत्र भारताच्या संविधानाने दिलेल्या 'मतदान' या अधिकाराचाच केवळ उपयोग करावा, असे बज