मुंबई : राजकारणात ’शब्द’ पाळण्यासाठी परिचित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Fadanvis ) यांनी कोपर्डी प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेला शब्दही पाळला आहे. पीडितेच्या वडिलांच्या विनंतीला मान देऊन देवाभाऊ रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी तिच्या भगिनीच्या विवाहाला पोहचले. या घटनेला आठ वर्षे उलटूनदेखील देवाभाऊंनी पीडित कुटुंबीयांची साथ सोडलेली नाही, हे विशेष.
Read More
मनोज जरांगे पाटील यांची जालन्याच्या अंतरवली सराटीत विराट सभा होत आहे. धुळे-सोलापूर महामार्गावर सभेसाठी येणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. १५० एकर मैदानावर ही सभा होत आहे. यावेळी सभेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "शांततेतल्या आंदोलनानेच मराठा समाजाला एकजुट केलं आहे. शांततेत प्रचंड शक्ती आहे. या पूढचेही आंदोलन हे मराठा समाज शांतीपूर्ण पद्धतीने करेल. २२ ऑक्टोबरला मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार." असे जरांगे पाटील म्हणाले.
कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ रोजी घडलेल्या या बलात्कार आणि खून घटनेने संपूर्ण देश हादरला होता. १५ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अतिशय क्रूरपणे बलात्कार करून निर्घृणपणे तिचा खून केल्याची घटना कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात उघडकीस आली होती