कोल्हापुरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी मंगळवार, १५ जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Read More
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिने प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड प्राडा यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत एक ठाम आणि अभिमानास्पद भूमिका घेतली आहे. कोल्हापुरी चपलांच्या डिझाईनची नक्कल केल्याचा आरोप प्राडा ब्रँडवर झाल्यानंतर करीना कपूरने सोशल मीडियावरून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
प्राडा’ने त्यांच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल हे लेदर सँडल या नावाने प्रसिद्ध केले होते. भारतीय सांस्कृतिकतेवर हा अन्याय असल्याची भावना लोकांमध्ये होती. प्राडाविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी समाजाने केली होती. आता बौद्धिक संपदा हक्कांचे (खपींशश्रश्रशर्लीींरश्र झअॅेशिअॅीूं ठळसहीीं) वकील गणेश एस. हिंगेमिरे यांनी २ जुलै रोजी प्राडा विरोधात याचिका दाखल केली आहे. प्राडाने जाहीर माफी मागावी, अशी मागणीही यात करण्यात आली आहे.
प्राडा’ने त्यांच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल हे लेदर सँडल या नावाने प्रसिद्ध केले होते. भारतीय सांस्कृतिकतेवर हा अन्याय असल्याची भावना लोकांमध्ये होती. प्राडाविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी समाजाने केली होती.
कोल्हापूरी चप्पल म्हणजे भारतीय ब्रँड. सांस्कृतिक आणि एतिहासीक वारसाहीही. आकर्षक, टिकाऊ आणि आरोग्यदायी असणारी कोल्हापुरी चप्पल जगभरात देश-विदेशात विकली जाते. स्थानिक भाषेत या पादत्राणांना पायतान म्हणून संबोधले जाते. मात्र नुकतेच इटालियन लग्झुरी फॅशन ब्रँड ‘प्रादा’ने कोल्हापुरी चप्पलसारखे पादत्राण यंदाच्या फॅशन महोत्सवात वापरले.या प्रकरणामुळे देशभरात वादचर्चा सुरू झाली.
इटली येथे पार पडलेल्या प्राडा कंपनीच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलांचा वापर करत, त्याला ' इटालियन लेदर फुटवेअर डिझाईन' म्हणून विकणे, आता प्राडाला चांगलंच महागत पडलं आहे. प्राडा या कंपनीने आपल्या नावाचा टॅग लावत कोल्हापुरी चपला तब्बल १ लाखापेक्षा जास्त किंमतीने विकण्याचा घाट घातला होता. प्राडाच्या या कारभरानंतर, त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठली होती. सोशल मिडीयावर याबद्दल प्रतिक्रीयांचा पाऊस तर पडलाच, त्याचबरोबर कोल्हापुरी चपला तयार करणाऱ्या कारागीरांनी सुद्धा संताप व्यक्त केला होता. परंतु आता प्राडाने
कोल्हापूर महानगरपालिकेतील ३ माजी महापौरांसह २५ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवार, २४ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
रविवारसह सोमवारी बरसणाऱ्या पावसाने राज्यात अनेक ठिकणी नुकसाने केले. मंगळवार, दि. २७ मे रोजी पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकणासह, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले.
आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी मागणी केल्यानंतर ‘आरोग्य भवन’ येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणाविषयी बैठक पार पडली. “आंध्र प्रदेशात महाराष्ट्राच्या बरोबरीने अवयव प्रत्यारोपणाला सुरुवात झाली असून आजच्या घडीला चेन्नईत मोठ्या प्रमाणावर अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र मात्र या काहीसा मागे पडला आहे,” असे आ. प्रा. फरांदे यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेश्वर, गंगोबा आणि श्री स्वयंभू मंदिर देवराईमधून गोगलगायीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (sacred groves in kolhapur). देवराईमधील अधिवासामुळे या प्रजातीचे नामकरण 'डाईक्रॅक्स देवराईवासी', असे करण्यात आले आहे (sacred groves in kolhapur). नव्याने शोध लागलेल्या गोगलगायीच्या या प्रजातीमुळे देवरायांनी जपलेली जैवविविधता अधोरेखित झाली आहे. (sacred groves in kolhapur)
(Hearing on Prashant Koratkar's Bail Application) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात कोल्हापूर सत्र न्यायालयात प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणीला सुरुवात झाली आहे. प्रशांत कोरटकरला व्हिडिओ कॅान्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने मागील सुनावणीत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आली होती. यानंतर आज प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी पा
(Prashant Koratkar News) प्राथमिक चौकशीनंतर आज दि. २५ मार्च रोजी प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. जुनागड पोलीस ठाण्याबाहेर शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळाली, परिस्थिती गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना पोलीस ठाण्याच्या समोरच्या बाजूस बंदोबस्त लावून मागील दाराने कोरटकरला बाहेर काढून कोल्हापूर न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात आले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आणि त्यांचे वकील असीम सरोदे हे आधीच कोल्हापूर न्यायालयात हजर झाले होते.
(Prashant Koratkar Hearing) शिवछत्रपती अवमान प्रकरणी प्रशांत कोरटकरला आज दि. २५ मार्च रोजी सुनावणासाठी कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आणि त्यांचे वकील असीम सरोदे हे कोल्हापूर न्यायालयात हजर झाले आहेत. या प्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली असून आरोपीच्या वकीलांनी युक्तिवाद करताना कोरटकरच्या अटकेची गरज नसल्याचे म्हटले आहे.
विधानसभा निवडणूकीनंतर उबाठा गटाला लागलेली गळती अजूनही कायम असून आता कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरेंच्या माजी आमदाराने त्यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला.
विरोधकांना चितपट करत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाची कुस्ती जिंकले, असे प्रतिपादन भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी केले.
महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण रद्द करण्यासाठी महाविकास आघाडीचे काही लोक कोर्टात गेले, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शनिवार, २५ जानेवारी रोजी त्यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
कोल्हापूरमधील वन्यजीवांच्या संरक्षणाचा वसा उचलून त्यांच्यासाठी खर्या अर्थाने रक्षक ठरलेले प्रदीप अशोक सुतार यांच्याविषयी...
"समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा विकास झाला. जालना, संभाजीनगरचे चित्र बदलले आहे. महाराष्ट्राचे औद्योगिक केंद्र आता पुण्याप्रमाणेच संभाजीनगर आणि जालनाकडे विस्तारताना दिसेल. त्यामुळेच शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचे चित्र बदलेल. मात्र शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा महामार्ग उभारण्यात येईल ", असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघात महायुतीने धमाकेदार विजय मिळवला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झालीय तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाची अवस्थादेखील काही वेगळी नाही. करवीर निवासिनी अंबाबाई जिथे वास्तव्य करते अशा कोल्हापूरच्या छत्रपतींच्या सुनेचा अपमान कोल्हापूरवासियांच्या चांगलाच जिव्हारी लागला आणि थेट मतपेटीतूनच अद्दल घडवत मतदारांनी महाविकास आघडीला कोल्हापुरातून हद्दपार केलं.
(Gokul) कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे सत्ता आणि आर्थिक केंद्र म्हणून प्रचलित असणारा गोकुळ दूध उत्पादक संघ. राज्यात निवडणूक पार पडताच 'गोकुळ'कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. गोकुळ दूध उत्पादक संघातर्फे गायीच्या दूध खरेदी दरात तब्बल ३ रुपयांची कपात करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असून त्याचीच धावपळ सुरु आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात मतदान होणार असून आता हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
राज्यात सध्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. याठिकाणी काँग्रेसचे खासदार शाहू महाराज यांच्या सूनबाई मधुरीमा राजे यांनी ऐनवेळी निवडणूक अर्ज मागे घेतला. यावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना अश्रू अनावर झाले.
‘दम नव्हता तर’सारखी भाषा वापरण्याची हिंमत होतेच कशी? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेत्यांना केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आणि खासदार शाहू महाराज यांच्या सूनबाई मधुरीमा राजे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील चांगलेच संतापले आणि दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं," अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावर आता चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरीमा राजे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने काँग्रेस नेते सतेज पाटील संतापले होते. त्यानंतर आता या सगळ्यामुळे महाविकास आघाडीतही ठिणगी पडली आहे. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली.
Devendra Fadanvis विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात महायुतीची विजय निर्धार सभा आयोजित करण्यात आली. ही सभा दि: ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे जाहीर करण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. "बाळासाहेबांच्या नावातून हिंदूहृदयसम्राट शब्द वगळला, औरंगजेबाची नाव घेण्याची लाज वाटू लागली", असल्याची टीका करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला धारेवर धरले आहे.
( Kolhapur Uttar Vidhansabha )राज्यात सध्या ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळातील नाराजीनाट्य, बंडखोरी व पक्षांतरणाच्या घटना सातत्याने कानावर पडत आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे त्यांच्या पाठोपाठ कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
( Kolhapur ) काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. त्यानंतर कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. शनिवारी दि. २६ ऑक्टोबर रात्री साडे बाराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. यामुळे सध्या कोल्हापूरचे राजकारण वादाचा मुद्दा ठरत आहे.
(Rahul Gandhi) काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंचावर काँग्रेस नेत्यांसह खासदार शाहू छत्रपती महाराज हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे, काँग्रेसचा इतिहास तपासला तर या पक्षाने कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला नाही. त्यांचा अनेकदा अपमान केल्याचे दाखले सापडतील. त्यामुळे राहुल गांधींविरोधात रोष व्यक्त होताना दिसत आहे. छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा
काँग्रेस नेते राहूल गांधी हे शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, कोल्हापूरमध्ये राहूल गांधीविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राहूल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
'महिलांची प्रगती ही देशाच्या उन्नती आणि विकासामध्ये महत्त्वाची आहे. त्यामुळे महिलांच्या दैनंदिन जीवनात बदल होत आहे. आपल्यासोबत सर्व महिलांना या प्रगतिपथावर आणणे गरजेचे आहे. सहकारी संस्था बळकट करणे गरजेचे', असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती Droupadi Murmu यांनी केले. 'श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समूहा' चा सुवर्ण सोहळा व वारणा विद्यापीठाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
कोल्हापूर नगरीला कलेचा अलौकिक वारसा आणि इतिहास आहे. याच कोल्हापुरातील प्रसिद्ध ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी भीषण आग लागल्याने नाट्यगृह जळून खाक झाले. यामुळे कलाप्रेमींना अश्रू अनावर झाले असून मराठी नाट्यसृष्टीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. शॉकसर्टिकमुळे नाट्यगृहाला आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी तिथे प्रत्यक्षदर्शी असलेल्या अभिनेत्री सोनाली पाटीलच्या अश्रूंचा बांध फुटला आणि तिने भावूक होत, “आमचं वैभव पूर्ण खाक झालं,” असे म्हटले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरुन कंदीलपुष्प म्हणजेच 'सेरोपेजिया' वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (new species of ceropegia). या प्रजातीचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे 'सेरोपेजिया शिवरायीयाना', असे करण्यात आले आहे (new species of ceropegia). वेलवर्गीय असणाऱ्या या कंदीलपुष्पाच्या केवळ चार वेल संशोधकांना विशालगडावर आढळून आल्या आहेत. (new species of ceropegia)
कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसाळे याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या क्रीडाप्रकारात कांस्य पदकाची कमाई केली आहे. या पदकासह भारताच्या खात्यात तिसऱ्या पदकाची भर पडली आहे.
किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी गडावरुन परत येताना मौजे गजापुर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले. याबाबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाच्या प्रत्येक पानाचा साक्षीदार असणारा विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस अवघ्या 76 किमी अंतरावर आहे. नावाप्रमाणेच विशाल असे याचे स्वरूप, बघताच क्षणी कोणालाही मोहिनी घालणारे. हा प्राचीन किल्ला अनुस्कुरा घाट व आंबा घाट, कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणार्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला असावा.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर अतिक्रमणे वाढली आहेत. सदर बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाला रविवार, दि. 14 जुलै रोजीची मुदत दिली होती. मात्र, कारवाई न झाल्याने रविवार, दि. 14 जुलै रोजी विशाळगडाकडे कूच केली होती. दरम्यान, गडावर अज्ञातांनी दगडफेक केली, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे .
विशाळगडाच्या पायथ्याशी ‘सकल हिंदू समाजा’च्यावतीने महाआरती करण्यात आलेली आहे. विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावे यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणावर जलदगतीने सुनावणी व्हावी, अशी मागणी यावेळी ‘सकल हिंदू समाजा’च्यावतीने करण्यात आली आहे. “अतिक्रमण हटवा अन्यथा ‘वक्फ’ बोर्डाच्या जमिनीवर मंदिरे बांधू,” असा इशारा ‘सकल हिंदू समाजा’कडून देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील परिते-गारगोटी-गडहिंग्लज-नागणवाडी-चंदगड- हेरे मोटनवाडी फाटा- कळसगादे कोदाळी- भेडशी ते राज्य हद्दीमधील तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी दिनांक ३१ ऑक्टोबर अखेर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत अवैध शिकारी व वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी सायबर सेलची (cyber cell) निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर वन्यजीव वनवृत्तांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावतीप्रमाणे सायबर सेल स्थापन झाला आहे. (cyber cell)
महाराष्ट्रात आज (मंगळवार) लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्याकरिता ११ मतदारसंघांमध्ये मतदान सुरु आहे. यापैकी बारामती, सांगली आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर सर्वांच्या नजरा खिळून आहेत. या मतदारसंघांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची जाहीर माफी मागितली आहे. शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता ठाकरेंनी स्पष्टीकरण देत संभाजीराजेंची माफी मागितली. ते कोल्हापूर येथील सभेत बोलत होते.
उबाठाची १०० टक्के काँग्रेस झाली असून आणि बाळासाहेबांचा परिवार आता पंजाला मतदान करणार आहे, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. शनिवारी कोल्हापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
संजय राऊतांनी कोल्हापूरमध्ये लावलेला नियम साताऱ्यातही लावावा. साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या विरोधात शशिकांत शिंदेंना का उमेदवारी दिली? असा सवाल भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोल्हापूर दौऱ्यावर राऊतांनी टीका केली होती. यावर आता राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
छत्रपती शाहू महाराजांचा खरा अपमान हा महाविकास आघाडीने केला आहे, अशी टीका कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोल्हापूर दौऱ्यावर केलेल्या टीकेला आता हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. शनिवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
कोल्हापूरात पवारांचा डाव उलटणार? - Kolhapur Loksabha Consistency
शाहू महाराजांना निवडणूकीत उभं करणं हे शरद पवारांचंच शडयंत्र आहे. ते जूना राग काढत आहेत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी केले आहे. महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराज असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता मंडलिक यांनी भाष्य केलं. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
२६ जुलैच्या पुराच्या वेळी उद्धव ठाकरे आपल्या वडिलांना सोडून हॉटेलवर गेले होते, अशी जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. शुक्रवारी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला मेळावा व अन्य उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराजांनी लोकसभा निवडणूक आमच्या पक्षाकडून लढवावी, त्यासाठी महाराजांनी मशाल चिन्हावर लढावं, असे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, कोल्हापूरची जागा याआधी शिवसेनेची होती त्यामुळे आम्हाला असं वाटतं की, शाहू महाराजांनी आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी, असेही राऊत यावेळी म्हणाले.
कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराजांनी लोकसभा निवडणूक लढवावी याकरिता मविआतील घटक पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. यातच आता राष्ट्रवादी नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराजांच्या उमेदवारीबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. "शाहू महाराजांनी निवडणूक लढवू नये. तसेच, मी त्यांना विनंती करतो की, आपण आदर्श आहात. त्यामुळे कोल्हापूरातील जनतेची अशी विनंती आहे की, तुम्ही निवडणूक लढवू नका, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीवरुन महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु असताना आता कोल्हापूरची जागा शरदचंद्र पवार गटाकडे जाणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शाहू महाराजांचे पुत्र संभाजीराजे यांच्याशी शरद पवारांनी चर्चा केल्याची माहिती पुढे आल्याने या चर्चांना उधाण आले.