उबाठा गटाला नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्का बसला आहे. गुरुवार, ३ जुलै रोजी नाशिक शहरातील अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Read More
कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाप्रमुखांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाला खिंडार पडले आहे. मंगळवार, १५ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
संजय राऊतांनी परत एकदा काँग्रेस आणि शरद पवार गटाचा अपमान केला आहे, अशी टीका भाजप नेते नितेश राणेंनी केली. महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे २ सरकार येणार, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. यावर आता राणेंनी प्रतिक्रिया दिली.
शरद पवार गटाची यात्रा म्हणजे छत्रपती शिवरायांच्या नावावर मतं मिळवण्याचा मनसुबा आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शरद पवार गटाने शिवस्वराज्य यात्रा सुरु केली आहे. यावर आता भाजपने टीका केली.
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडून आ. जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांचा अवमान केल्याप्रकरणी भाजप अनुसूचित जाती मोर्चा, मुंबई आक्रमक झाली आहे. आव्हाड यांच्या विरोधात त्वरीत गुन्हा नोंदविण्याची मागणी पंतनगर पोलीस ठाण्यात भाजपकडून करण्यात आली आहे. तसेच, आव्हाड यांना अटक झाली नाही तर भाजप अनुसूचित जाती मोर्चा मुंबई व महाराष्ट्राच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शरद पवारांचा उरला सुरला गट संपवायला आणखी कुणाची गरज नसून पवार गटातील लोकचं पक्ष संपवायला पुरेसे आहेत, असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वकतव्याचा समाचार घेत भुजबळ म्हणाले, आपण एक म्हण ऐकली असेल अति शहाणा त्याचा बैल रिकामा. त्यामळे त्यांना संपविण्यासाठी आणखी कुठल्या दुसऱ्या पक्षाला काही करण्याची गरज नसल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले.
आमदार अपात्रताप्रकरणी तत्काळ सुनावणीचे निर्देश देण्याची विनंती करणाऱ्या उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गट यांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १३ ऑक्टोबर रोजी एकत्रित सुनावणी होणार आहे.