मनोज कोटक यांच्या पत्राला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद लसीकरणाचा सुरू असलेला गोंधळ आणि तुटवडा तसेच लसीकरण केंद्रांवर पोहोचण्यासाठी मुंबईकरांना करावी लागणारी कसरत टाळावी म्हणून खासदार मनोज कोटक यांनी महापालिका आयुक्तांकडे घरपोच लस मिळावी यासाठी पत्रव्यवहार केला होता. आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीही त्यांच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत सोसायट्या व वस्त्यांवर लसीकरण मोहिमेची तयारी दर्शवली आहे. लसीकरण मोहिम आणखी तीव्र व्हावी यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचेही चहल यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
Read More
संजय राऊत यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती.