उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. २० वर्षीय सुलेमानवर विनयभंगाचा आरोप आहे. सुलेमानने मुलीला त्याच्या खोलीत बंद केले होते. पीडितेच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडून तिला वाचवले. ही घटना दि. ९ मार्च रोजी घडली. याप्रकरणी पोलिसात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. सुलेमानला अटक करून गजाआडल करण्यात आले आहे. पीडितेच्या वडिलांनी याप्रकरणी सांगितले की, सुलेमानचे कुटुंबीय त्यांना केस मागे घेण्यास सांगत आहेत.
Read More
कौशांबी येथील रहिवासी असलेल्या ७३ वर्षीय रामचंद्र केसरवानी यांनी रामनाम पुस्तिकेवर २.८६ कोटींहून अधिक वेळा प्रभू रामाचे नाव कोरले आहे. ही पुस्तिका त्यांनी अयोध्येतील आंतरराष्ट्रीय श्री सीता राम नाम बँकेत जमा केली आहे. केसरवाणी हे ऑगस्ट २०१० मध्ये उत्तर प्रदेश राज्य पाटबंधारे विभागातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एप्रिल २०११ मध्ये रामनाम लिहायला सुरुवात केली आणि तेव्हापासून दररोज किमान ५ हजार वेळा त्यांनी प्रभू रामाचे नाव कोरले आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी धार्मिक स्थळे, मशिदी आणि धार्मिक स्थळांवर लावलेले बेकायदेशीर लाऊडस्पीकर हटवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रथम राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अशी ठिकाणे शोधण्यात आली. जेथे मानकांनुसार लाऊडस्पीकर लावलेले नाहीत. आता ते बेकायदा लाऊडस्पीकर काढले जात आहेत. दि.२७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळपासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत आजपर्यंत शेकडो लाऊडस्पीकर एकतर जप्त करण्यात आले आहेत किंवा त्यांचा आवाज कमी करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफ (स्पेशल टास्क फोर्स) पथकाने मोस्ट वाँटेड गुन्हेगार मोहम्मद गुफरान यांचा एन्काऊंटर केला आहे. गुफरानवर खून, खुनाचा प्रयत्न आणि दरोड्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दि. २७ जून रोजी प्रयागराजजवळ कौशांबी जिल्ह्यात हा एन्काऊंटर झाला आहे. अनेक जिल्ह्यांचे पोलीस गुफरानच्या शोधात होते.