(Amol Mitkari on Rohit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दि. २५ नोव्हेंबर रोजी कराड येथील प्रीतीसंगमावर जाऊन महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी अजित पवार व कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांची भेट झाली.या भेटीवेळी अजित पवार रोहित पवारांना “शहाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं. दर्शन घे काकांचे” असं मिश्कीलतेने म्हणाले. त्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.
Read More
पक्षांतरामुळं गाजलेल्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला
रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल, पालकमंत्री राम शिंदे उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज