Kakuda

७/११ मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निकालास महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान!

२००६ च्या ७/११ मुंबई लोकल रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला महाराष्ट्र राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आज मंगळवार दि. २२ जुलै रोजी एका याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर हा मुद्दा तातडीने यादीत घेण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाची सुनावणी दि. २४ जुलै रोजी घेण्यास सरन्यायाधीशांनी सहमती दर्शवल्याची माहिती आहे.

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पश्चिम विधानसभेतील 5 मंडळांतही रक्तदान शिबिराचे आयोजन ; तर कल्याण विकास फाउंडेशनतर्फे जल शुद्धीकरण - स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवारी वाढदिवस. त्यानिमित्ताने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 5 ही मंडळांमध्ये रक्तदान शिबिर राबवण्यात आले. तर कल्याण विकास फाउंडेशनच्या माध्यमातून जलशुद्धीकरण आणि परिसर स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

Read More

महाराष्ट्र धर्माचे पालन करणारा नेता - देवेंद्रजी फडणवीस

‘महाराष्ट्र विना राष्ट्रगाडा न चाले’ या थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांच्या ओळी महाराष्ट्राचे देशातले महत्त्व नेमकेपणाने अधोरेखित करतात. महाराष्ट्र म्हणजे देशाच्या विकासाचे इंजिन आहे. देशातील आर्थिक, वैचारिक आणि सामाजिक विचारांचे उगमस्थान आहे. या महाराष्ट्राची महती ज्या मोजया नेत्यांना कळली आहे, त्यामध्ये मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे नाव अग्रस्थानी आहे. संघटनेवर परमोच्च श्रद्धा, कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्याची ताकद, कधीही न ढळणारा संयम, अर्थशास्त्र, कायदा, संविधान या क्षेत्रांचा व्यासंग आणि विकासाची

Read More

देवेंद्रजी फडणवीस : महाराष्ट्राच्या विकासगाथेचं ‘सुवर्ण कमळ’

महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्वाचे स्वरूप अनेकदा बदलत गेले. पण, काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात, जी केवळ सत्ता चालवत नाहीत, तर ती इतिहास घडवतात, व्यवस्थेचे नवे प्रारूप तयार करतात. देवेंद्रजी फडणवीस हे अशा नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहेत. एक विचारशील प्रशासक, दूरदृष्टी असलेला अर्थनीतीकार आणि महाराष्ट्राच्या नवयुगाचा खर्या अर्थाने शिल्पकार, अशीच त्यांची आजपर्यंतची कारकीर्द राहिली आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मागे वळून पाहिलं, तर लक्षात येतं की, हा केवळ एका राजकीय प्रवास नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक,

Read More

समर्पित नेतृत्वाच्या वाढदिनानिमित्त ‘‘सेवाभावी आदर्श’’- भाजपा आमदार महेश लांडगे यांची भावना - मुख्यमंत्री सहायता निधीत ५ लाख रुपयांची मदत

‘‘महाराष्ट्र सेवक..’’ या समर्पित भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचा वाढदिवस साधेपणाने आणि विधायक उपक्रमांनी व्हावा, असे आवाहन पक्षाने केले. त्याला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात महारक्तदान शिबीर होत आहे. भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण 8 ठिकाणी रक्तदान महाअभियान होणार आहे. सेवाभावी भूमिकेतून होणार हा वाढदिवस निश्चितच आदर्शवत आहे, अशी भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

Read More

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची चिखल

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे महारक्तदान शिबिरांचे आयोजन - पक्षाच्या सर्व मंडलांमध्ये मुख्यमंत्र्यांना रक्तदानाच्या माध्यमातून शुभेच्छा देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी दि. २२ जुलै रोजी प्रदेश भाजप तर्फे राज्यभरात महारक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. पक्षाच्या संघटना रचनेतील सर्व मंडलांमध्ये ही शिबिरे होतील. या निमित्ताने राज्यभर विक्रमी रक्तदान नोंदवून प्रदेश भाजपातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात येणार आहेत. भाजपा परिवारातील सर्वांनी या महारक्तदान शिबीरात सहभागी व्हावे असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

Read More

विरोधकांचा सूर हरवला, महायुतीने गाजवले अधिवेशन!

‘जग फिरान इलो आणि हुमर्याक आपटान मेलो,’ ही मालवणी बोलीतील प्रचलित म्हण. जगभ्रमंती करून आलेला माणूस घरात येताना उंबरठ्याला आपटून मरण पावला, तर त्यावेळची अवस्था दर्शवण्याकरिता ती वापरली जाते. परवा संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांची स्थिती याहून निराळी नव्हती. म्हणजे, अधिवेशन सुरू होण्याआधी अमूकतमुक विषयांवरून महाविकास आघाडीचे नेते सरकारला धारेवर धरतील, मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्रिमंडळाची सभागृहात कोंडी करतील, असे जे चित्र रंगवले जात होते, ते दिवास्वप्नच ठरले. याउलट गटातटांत विभागलेले विरोधी पक्ष भूमि

Read More

मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

कायद्याच्या राजवटीने शासित असलेल्या देशात जातीवर आधारित कोणताही भेदभाव मान्य नाही, असे गुरूवार दि.१७ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अय्यनार मंदिरात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या (एससी) भाविकांना अडविल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने अरियालूर जिल्हा पोलिस अधीक्षकांना आणि उदयारपलयम महसूल अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, “पुथुकुडी येथील अय्यनार मंदिर प्रवेशासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या भाविकांना आडवू नये आणि त्यांना उत्सवात सहभागाची संपूर्ण मुभा दिली जावी.”

Read More

मानखुर्द पुनर्वसन प्रकल्पात १६० अपात्र झोपडपट्टीधारकांची शासनाकडून कबुली

मानखुर्द पश्चिम ते चिता कॅम्प ट्रॉम्बे या भागात नाला रुंदीकरणाच्या कामाच्या अनुषंगाने राबवण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत एकूण ११७९ पात्र लाभार्थ्यांमध्ये ४४१ बोगस झोपडपट्टीधारकांचा समावेश करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी अंधेरी विधानसभेचे आमदार अमित साटम यांनी विधानसभेत सरकारकडे थेट प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सभागृहात विचारले की, या प्रकल्पातील “परिशिष्ट दोन” मधील लाभार्थ्यांची येत्या ३० दिवसांत चौकशी केली जाईल का, चौकशीत बोगस लाभार्थी आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार

Read More

अरविंद पिळगावकर म्हणजे संगीत रंगभूमीची सात्विक प्रेरणा!

"अरविंद पिळगावकर त्यांचा संगीत रंगभूमीवरचा प्रवास, आपल्या सांस्कृतिक वाटचालीतला महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अरविंद पिळगावकर म्हणजे संगीत रंगभूमीची सात्विक प्रेरणाच आहे" असे मत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांची जीवनगाथा मांडणाऱ्या 'कोsहम, सोsहम' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले " हे केवळ पुस्तक नसून, संगीत रंगभूमीचा समृद्ध वारसा सांगणारा ज्ञानकोश आहे. अरविंद पिळगावकर यांचा वारसा सांगणारे हे

Read More

सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कामावर हजर राहण्याची परवानगी

प्रताप सरनाईक यांची माहिती; खासगी कंपन्यांच्या वेळेबाबत टास्क फोर्स लोकल रेल्वेला मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. मात्र, कार्यालयीन वेळेतील गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे प्रवास दिवसागणिक असह्य होऊ लागला आहे. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कामावर हजर राहण्याची परवानगी दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी विधानसभेत दिली. तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेच्या नियोजनासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याचेही सरनाई

Read More

महाराष्ट्र शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर ऊर्जा संशोधन आणि धोरण विकासासाठी सामंजस्य करार

महाराष्ट्र शासनाने बर्कले येथील जागतिक कीर्तीच्या कॅलिफोर्निया विद्यापीठासोबत ऊर्जा संशोधन आणि धोरण विकासासाठी सामंजस्य करार केला आहे. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्ण बी, महापारेषणचे संजीव कुमार आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाचे वरिष्ठ सल्लागार मोहित भार्गव उपस्थित होते. आभा शु

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121