July 1

९ वर्षांची सत्ता गमावली! बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा मोठा पराभव, २१ जागांवर भोपळाही फोडता आलेला नाही

(Mumbai BEST Election Results) मुंबईतील 'दी बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटी'ची निवडणूक सोमवारी १८ ऑगस्ट रोजी पार पडली. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निकालाने ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत प्रचंड चर्चा असलेल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला २१ पैकी एकही जागा जिंकण्यात यश आलेले नाही. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि

Read More

"...त्यांच्यासोबत जो जाणार तोही राजकारणातून संपणार"; मनोज तिवारी यांचा राज ठाकरेंवर निशाणा

(Manoj Tiwari On Raj Thackeray) महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदीच्या मुद्यावरून वाद चांगलाच पेटला आहे. मिरा-भाईंदर येथे व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून सभा घेतली. या सभेत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, मराठीच्या मुद्द्यावरुन अभिनेता, भाजप खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे. "राज ठाकरे यांच्यासोबत जो जाईल तोही संपणार", असे खासदार तिवारी यांनी थेट राज ठाकरे यांचे नाव घेऊन म्हटले आहे

Read More

"काय अवस्था झालीये महाराष्ट्राची?"; विधानभवनातील हाणामारीवरुन राज ठाकरेंचा उद्विग्न सवाल

(Raj Thackeray) राज्यात सुरु असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात घमासान पाहायला मिळाले. दरम्यान, गुरुवारी १७ जुलैला विधीमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये 'काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?' असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

Read More

राज ठाकरेंचा युतीबद्दल 'वेट अँड वॉच', उबाठा मात्र, सेलिब्रेशनमध्ये व्यस्त! मुलाखतीत म्हणाले, "आता राज पण..."

(Uddhav Thackeray Saamana Interview) उबाठा खासदार संजय राऊत यांनी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर नुकताच जारी करण्यात आला आहे. ‘सामना’तून ही उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ मुलाखत येत्या १९ आणि २० जुलै रोजी दोन भागांमध्ये प्रसारित होणार आहे. मुलाखतीला ‘ब्रँड ठाकरे’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी एक्सवर टीझर पोस्ट करुन माहिती दिली आहे. १९ आणि २० जुलैला सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरे मिळणार, असेही या टीझरमधून सांगितले जात आहे.

Read More

‘बिहार’च्या धसक्यामुळे काँग्रेसची ठाकरेंच्या मेळाव्याकडे पाठ ; ‘वंचित’ची गैरहजेरी; हिंदुत्ववादी राज ठाकरेंना करावे लागले कम्युनिस्टांचे स्वागत

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी वरळीच्या डोम मैदानात झालेला मेळावा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. या मेळाव्याला भाकपचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, माकपचे अजित नवले, रासपचे महादेव जानकर, विनोद निकोले आणि भालचंद्र मुणगेकर यांनी हजेरी लावली. मात्र, काँग्रेसने या मेळाव्यापासून जाणीवपूर्वक अंतर राखले. राज ठाकरेंच्या याआधीच्या आक्रमक भूमिकेमुळे बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याची भीती काँग्रे

Read More

ना झेंडा, ना अजेंडा... नेता कोण? - राज-उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा ठरली; पण शेवटी भाषण कोण करणार, यावर घोडे अडले

त्रिभाषा सूत्रावरून उगाचचा गोंधळ घालणाऱ्या ठाकरे बंधूंना अखेर एकत्र येण्यासाठी कारण मिळालं. सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर दोघांनीही 'विजयी सभा' जाहीर केली, जणू काही हा लढा त्यांनीच उभारला होता! ५ जुलै रोजी वरळीच्या डोम मैदानावर ही सभा होणार आहे. पण या तथाकथित एकजुटीला ना मराठी भाषेचं भान आहे, ना मराठी माणसाच्या भविष्याची चिंता. फक्त एकत्र येण्याचं निमित्त हवं होतं, ते मिळालं इतकंच. बरं, इतकं करूनही आतल्या गोटात सध्या गोंधळ आहे तो ‘शेवटी भाषण कोण करणार?’ या मुद्द्यावर! राज ठाकरे हे प्रभावी भाषणांसाठी ओळखले

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121