लवकरच वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे. त्यानंतर वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चा होणार आहे. मात्र, हे विधेयक संसदेत पटलावर ठेवण्यापर्यंतची नेमकी प्रक्रिया काय होती ते जाणून घेऊया.
Read More
एक देश एक निवडणूकीला आमचा विरोध आहे, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. बुधवार, ८ जानेवारी रोजी एक देश एक निवडणूक याबाबत संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) पहिली बैठक होणार आहे. त्याआधी संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली.
(Waqf Amendment Bill) वक्फ दुरुस्ती विधेयकावर स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समिती (JPC) दि. २६ आणि २७ रोजी राज्यांच्या प्रतिनिधींच्या तोंडी पुराव्यांची नोंद घेणार आहे.
(JPC) ‘एक देश, एक निवडणूक’ यासाठी स्थापन होणाऱ्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) लोकसभेतील सदस्यांची नावे जाहिर करण्यात आली आहेत. पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत समिती या सभागृहाला अहवाल देईल.
(One Nation One Election Bill) केंद्रातील मोदी सरकारने 'एक देश, एक निवडणूक' या विधेयकाला गुरुवार, दि. १२ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. त्यानंतर मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 'एक देश एक निवडणूक' विधेयक लोकसभेत सादर केले आहे. या विधेयकाला लोकसभेत काँग्रेस सहीत इंडी आघाडीनेही विरोध दर्शवल्याचे समोर आले आहे. अशातच एक देश, एक निवडणूक विधेयकाला अखेर 'जेपीसी'कडे (संसदेची संयुक्त समिती) पाठवले जाणार आहे.