मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात दि. २८ मे रोजी मुंबई शहर शिक्षक मंडळाचे महायुवा संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमात आमदार प्रवीण दरेकर यांनी युवा शिक्षकांना मार्गदर्शन केले. या महासंमेलनात १६०० हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षकांच्या विविध समस्या, मार्गदर्शनपार सत्रांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांच्या मार्गदर्शनातून साकारलेल्या या महायुवा संमेलनाचे आयोजन मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे कार्यकारिणी सदस्य विशाल कडणे यांच्या नेतृत्वात करण्यात
Read More
तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विशाल रविवारी (११ मे) तामिळनाडूमधील विल्लुपुरम येथे झालेल्या ‘मिस कूवगम ट्रान्सजेंडर ब्युटी कॉन्टेस्ट २०२५’ दरम्यान अचानक व्यासपीठावर कोसळल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी विशाल याला अटक झाल्यापासूनच समाजातील सर्वच स्तरातून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती. परंतु आज विशालच्या आत्महत्येमुळे पिडीतेला नैसर्गिकरित्या न्याय मिळाला आहे असे म्हणत समाजाच्या विविध स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे . पिडीतेला न्याय मिळाला असला तरी कायद्याने त्याला फाशी झाली असती तर इतरांवर कायद्यांचा धाक राहिला असता असे सर्वच स्तरातून बोलले जात आहे
रामनवमीचे औचित्य साधून ईशान्य मुंबई दैवज्ञ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून, मुंबई शहरांतील शालेय शिक्षक तसेच महाविद्यालयीन शिक्षकांसाठी खास प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
सिडको कार्मिक विभागाच्या प्रधान व्यवस्थापक प्रमदा बिडवे यांनी जारी केलेले परिपत्रक दैनिक मुंबई तरुण भारतच्या हाती लागले आहे.
National Youth Day स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत शिक्षक चळवळीतील युवा कार्यकर्ते डॉ विशाल कडणे यांच्या हेल्पिंग हँड फाऊंडेशनतर्फे (Helping Hand Foundation -NGO) मुंबईसह आसपासच्या विभागातील शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांसाठी विशेष प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये १७२५ स्पर्धकांनी सक्रिय सहभाग घेतला. १२ जानेवारी ‘राष्ट्रीय युवा दिन’ या संकल्पनेवर आधारित ह्या प्रश्नमंजूषा स्पर्ध्येमध्ये युवा दिनाबाबत ३० प्रश्न समाविष्ट होते.
कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीसह त्याची पत्नी साक्षी गवळी यांना २ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी या दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्या दालनात याप्रकरणाची सुनावणी पार पडली.
Kumbhmela: आपल्या हिंदू धर्मात कुंभमेळ्याचं विशेष महत्व आहे. गेल्या अनेक शतकांपासून होणारा कुंभमेळा म्हणजे आपल्या संस्कृतीचा आणि संस्कारांचा जागरच आहे. कोट्यावधी भाविक या कुंभमेळ्यात सहभागी होतात. पण कोट्यावधी भाविक ज्या वेळी एकत्र येतात त्यावेळी साहजिकच व्यवस्थापनाची आणि परिसराच्या स्वच्छतेची आव्हानं सुद्धा उभी राहतातच. याच आव्हानांवर मात करण्यासाठी Vishal Tibrewala आणि त्यांची My green society ‘एक थैलू एक थाली’ हा प्रकल्प घेऊन सज्ज आहेत. हा प्रकल्प काय आहे हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत
मुंबई : निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षकांना मतदान करताना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई उपनगरातील ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट प्रयत्नशील आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा म्हणून शिक्षक चळवळीतील युवा नेते डॉ. विशाल कडणे यांनी ट्रस्टच्या माध्यमातून अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या शैक्षणिक संस्थेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे १००% मतदान ( Voting ) होईल अशा शैक्षणिक संस्थांचा आणि संस्थाप्रमुखांचा गौरव करण्याचा निर्धार मुंबई उपनगरातील ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट
( Vishal Parab )आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दि. ४ नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. राज्यातील अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी माघार न घेता आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीनंतर देखील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अखेर परब यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
( Navi Mumbai ) उद्यानातील पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नवी मुंबईतील वाशी परिसरात घडली आहे. वाशी सेक्टर १४ येथील गोरक्षनाथ पालवे उद्यानात शनिवार दि. २ नोव्हेंबर रोजी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यादरम्यान उद्यानातील सुरक्षारक्षक घटनास्थळी उपस्थित नसल्याची बाबदेखील उघडकीस आली आहे. ऐन दिवाळसणामध्ये या चिमुकल्याचा असा दुर्देवी अंत झाल्यामुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
( Pravin Darekar ) ’युवा पिढीला मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचा सन्मान आणि गौरव आजच्या काळात कमी झाला आहे. मात्र, ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने अशा घटकांचा सन्मान सोहळा आयोजित केला, यासाठी विशाल कडणे यांचे अभिनंदन!’ असे गौरवोद्गार भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी काढले.
(Pravin Darekar) भाजप गटनेते, महाराष्ट्र विधान परिषद आमदार व तसेच मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या हस्ते वाढदिवस विशेष पुरवणीचे प्रकाशन दहिसर येथील आदित्य दरेकर आयोजित चांडक निवास येथील वह्या वाटप कार्यक्रमात रविवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. पुरवणीची संकल्पना अखिल भारतीय दैवज्ञ समाजाचे युवा प्रमुख विशाल कडणे यांची होती. यावेळी आ. प्रविण दरेकर यांनी विशेष पुरवणीचे कौतुक केले. तसेच दै. ‘मुंबई तरुण भारत’चे आभार मानले. पुरवणी प्रकाशनादरम्यान विशाल कडणे यांनी आ. दरेकर यांना भेटवस्तू देऊन वाढदिवस
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात एक मोठी अपडेट पुढे आली आहे. मद्यप्राशन करून दोन जणांना चिरडणारी पोर्शे कार परत करा, अशी मागणी आरोपी अग्रवाल कुटुंबाने केली आहे. याबाबत बालहक्क न्यायमंडळ काय निर्णय घेतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरुन कंदीलपुष्प म्हणजेच 'सेरोपेजिया' वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (new species of ceropegia). या प्रजातीचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे 'सेरोपेजिया शिवरायीयाना', असे करण्यात आले आहे (new species of ceropegia). वेलवर्गीय असणाऱ्या या कंदीलपुष्पाच्या केवळ चार वेल संशोधकांना विशालगडावर आढळून आल्या आहेत. (new species of ceropegia)
विशाळगड अतिक्रमणा विरोधात उभे ठाकलेल्या छत्रपती संभाजी राजांच्या भूमिकेला भारतीय मराठा महासंघाने समर्थन दिले असुन विशाळगड आंदोलनाला जाहिर पाठींबा व्यक्त केला आहे. तसेच, येत्या आठ दिवसात छत्रपती संभाजी राजांची भेट घेऊन महासंघाच्यावतीने निवेदन सुपूर्द करणार आहोत. अशी माहिती भारतीय मराठा महासंघाचे नूतन अध्यक्ष महेश कदम यांनी दिली. भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महेश कदम यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राष्ट्रभक्तांचा अतिरेकी म्हणून उल्लेख सहन होणारा नाही, असा इशारा भाजप आमदार नितेश राणेंनी दिला आहे. राज्यात सध्या विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला असून अतिक्रमणांविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी गडावरुन परत येताना मौजे गजापुर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले. याबाबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाच्या प्रत्येक पानाचा साक्षीदार असणारा विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस अवघ्या 76 किमी अंतरावर आहे. नावाप्रमाणेच विशाल असे याचे स्वरूप, बघताच क्षणी कोणालाही मोहिनी घालणारे. हा प्राचीन किल्ला अनुस्कुरा घाट व आंबा घाट, कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणार्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला असावा.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर अतिक्रमणे वाढली आहेत. सदर बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाला रविवार, दि. 14 जुलै रोजीची मुदत दिली होती. मात्र, कारवाई न झाल्याने रविवार, दि. 14 जुलै रोजी विशाळगडाकडे कूच केली होती. दरम्यान, गडावर अज्ञातांनी दगडफेक केली, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे .
"विशाळगड मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या सगळ्या शिवभक्तांबरोबर मी उभा आहे. एक ऐतिहासिक कार्य ते करीत आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ", असा विश्वास भाजप आमदार नितेश राणे यांनी सोमवार, दि. १५ जुलै रोजी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाला रविवार, दि. १४ जुलैपर्यंत मुदत दिली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अनधिकृत पद्धतीने बांधण्यात येत असलेल्या मशीद बांधकामाविरोधात अनेक शिवप्रेमींनी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंदोलन स्थळी जाऊन सर्व आंदोलकांची तात्काळ भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा करुन, त्यांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासन दिले.
विशाळगडाच्या पायथ्याशी ‘सकल हिंदू समाजा’च्यावतीने महाआरती करण्यात आलेली आहे. विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावे यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणावर जलदगतीने सुनावणी व्हावी, अशी मागणी यावेळी ‘सकल हिंदू समाजा’च्यावतीने करण्यात आली आहे. “अतिक्रमण हटवा अन्यथा ‘वक्फ’ बोर्डाच्या जमिनीवर मंदिरे बांधू,” असा इशारा ‘सकल हिंदू समाजा’कडून देण्यात आला आहे.
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट पुढे आली आहे. अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालनंतर आता त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही जामीन मिळाला आहे. कार चालकाला डांबून ठेवल्याचा त्या दोघांवर आरोप आहे.
लोकसभा निवडणूक संपली. निकालही लागला. मात्र, सांगली लोकसभेचा वाद काही केल्या संपताना दिसत नाहीये. लोकसभेच्या उमेदवारीवरून सुरु झालेला हा वाद आता निकाल लागल्यानंतर पुन्हा उफाळून आल्याचं दिसतंय. फरक एवढाच की, आता या वादात आणखी एका पाटलांनी एन्ट्री घेतलीये. ते आहेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम या दोघांनी थेट जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांनाच थेट आव्हान दिलंय. त्यामुळे सांगलीचा वाद पुन्हा एकदा
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल याला जामीन मंजूर झाला आहे. परंतू, त्याची सुटका झाली नसून अन्य दोन गुन्ह्यंमध्ये पुन्हा त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. त्यामुळे विशाल अग्रवालचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
पुणे अपघात प्रकरणात आता एक मोठी अपडेट पुढे आली आहे. या अपघातातील मुख्य आरोपी वेदांत अग्रवालचे ब्लड सँपल बदलण्याआधी तीन जणांमध्ये बैठक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या तिघांनाही आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
यावेळीच्या निवडणूकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल पुढे आला आहे. सांगली लोकसभेतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. विशाल पाटलांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांच्या विजयामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
पुण्यातील कल्याणीनगर भागातील अपघातप्रकरणी एक मोठी अपडेट पुढे आली आहे. शनिवारी अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालची आई शिवानी अग्रवाल यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता संपूर्ण अग्रवाल कुटुंबच या अपघातप्रकरणात अडकलेलं आहे.
पुण्यातील पोर्शे कार अपघातातील आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयील कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ केली होती.
ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवालचे ब्लड सँपल बदलण्यात आले होते. हे बदलण्यात आलेले ब्लड सँपल नेमके कुणाचे याबाबतचा तपास सुरु असताना आता मोठी माहिती पुढे आली आहे. आरोपी वेदांतचे बदललेले ब्लड सँपल हे त्याच्या आईचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे पोर्शे कार अपघातातील आरोपीचे वडील विशाल अग्रवालने आपल्या लेकाला वाचवण्यासाठी डॉ. अजय तावरेंना २ तासांत तब्बल १४ कॉल्स केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालचे रक्ताचे नमुने घेण्याच्या आधी दोघांमध्ये कॉलवर बोलणं झाल्याचं सांगण्यात येत आहे.
डोंबिवलीतील ‘अंबर’ नामक केमिकल कंपनीमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या स्फोटाने, संपूर्ण मुंबापुरी हादरून गेली. ज्याच्यासाठी औद्योगिक विकास करतो आहे, त्या मानवी आयुष्याच्या शाश्वततेसाठी उपाययोजना काय, याची चर्चा या निमित्ताने जोराने सुरु झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा या लेखात घेतलेला हा आढावा...
पुण्यातील कल्याणीनगमध्ये झालेल्या अपघातप्रकरणी आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर दोन दिवस ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा आरोप आहे. दरम्यान, याप्रकरणात विशाल अग्रवालवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे अपघात प्रकरणात आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कारच्या ड्रायव्हरला धमकावत त्याला दोन दिवस घरात डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे शनिवारी पुणे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
दि. १९ मेच्या मध्यरात्री पुण्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत एका उच्चभ्रू बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने अत्यंत महागडी पोर्शे कार प्रचंड वेगाने चालवत दोन तरुण व्यक्तींना चिरडून ठार केले. या घटनेचे तीव्र पडसाद पुण्यात, महाराष्ट्रात आणि देशभरात उमटले. या प्रतिक्रियांमधून या घटनेला कारणीभूत असणार्या परिस्थितीविषयी देशभर चीड, त्या विरोधात असलेली समाजभावना आणि कळकळसुद्धा स्पष्टपणे दिसून आली. या दुर्दैवी घटनेचा पोलिसांचा तपास, बालन्याय अधिनियम, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व उत्पादन शुल्क, अनधिकृत बांधकाम आणि ए
‘नाईट लाईफ’चे आकर्षण व पाश्चात्त्य संस्कृतीचा आंधळेपणाने स्वीकारताना नकळत एक पिढी आज बिघडत आहे. पालक आपल्या पाल्यापुढे हतबल होताना दिसतात.
उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात मुख्तार सुलेमानी याने विशाल गुप्ता नावाच्या व्यक्तीचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न करताना त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले. दुसऱ्या हल्ल्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात विशालचा हात कापला गेला. विशाल हा आरोपीला नीट काम करत नसल्यामुळे बोलला होता. विशालच्या बोलण्याचा राग आला म्हणून मुख्तार सुलेमानीने त्याच्या हत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवार, दि. १४ मे २०२४ घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील काँग्रेसच्या स्नेहभोजनात उपस्थित झाल्याचे सांगण्यात येत आहे. उमेदवारी न मिळाल्याने पक्षात बंडखोरी करणारे विशाल पाटील निवडणूक संपताच स्नेहभोजनात सामील झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.
मुलाने कार मागितली तर त्याला चालवायला दे, तू बाजूला बस अशा सूचना पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल यांनी आपल्या ड्रायव्हरला दिल्या होत्या. विशाल अग्रवालच्या ड्रायव्हरने चौकशीदरम्यान असा जबाब नोंदवला आहे. तसेच त्यामुळेच अपघात घडल्याचेही त्याने म्हटले आहे.
काँग्रेस पक्षातून विशाल पाटील यांची हकालपट्टी करा, अन्यथा इथून पुढे आमच्याकडून मदतीची अपेक्षा करु नका, असा इशारा उबाठा गटाकडून काँग्रेसला देण्यात आला आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील हे पक्षाच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने उबाठा गटाचे नेते संजय विभुते यांनी हा इशारा दिला आहे.
पुणे अपघातातील (Pune Accident) आरोपी असलेल्या अग्रवाल कुटुंबाबात एक मोठी बातमी पुढे आली आहे. अग्रवाल कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय गँगस्टर छोटा राजनशी त्यांचा संबंध असल्याचाही माहितीही पुढे आली आहे.
पुणे अपघात (Pune Accident) प्रकरणामुळे सध्या राज्यात संतापाचे वातावरण आहे. या अपघाताप्रकरणी बुधवारी बालहक्क न्यायायालयात सुनावणी होणार असून आरोपी वेदांत अग्रवाल आपल्या कुटुंबियांसह कोर्टात दाखल झाला आहे. दरम्यान, अपघाताआधी त्याने पबमध्ये किती पैसे उडवले याबद्दलची कबुली त्याने दिली आहे.
पुणे अपघातप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले आहे. आरोपी वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दानवेंनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्राद्वारे केली आहे.
विशाल अग्रवालसह पुणे अपघातातील ३ आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी सत्र न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी आरोपीचे वडिल विशाल अग्रवालसह तीन जणांना २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या भीषण अपघाताबाबत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनीच त्याला कार चालवायला दिल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच आपण मद्य प्राशन करत असल्याचे आपल्या वडिलांना माहित असल्याचेही त्याने म्हटले आहे.
सांगली लोकसभेच्या जागेबाबत नक्की काहीतरी षडयंत्र झालेलं आहे, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी केला आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उबाठा गटात वाद रंगला होता. बुधवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना विश्वजित कदमांनी याबाबत खुलासा केला आहे.
एखाद्या पक्षाचा उमेदवार बंडखोरी करत असेल तर त्या पक्षाने त्याची हकालपट्टी करायला हवी, असे म्हणत उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. सागंली लोकसभेची जागा उबाठा गटाला गेल्याने विशाल पाटील नाराज असून त्यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाचा आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. यावर आता राऊतांनी प्रतिक्रिया दिली.
माझी माघार घ्यायची तयारी आहे. फक्त मित्रपक्षांनी शेतकऱ्याचा मुलगा खासदार म्हणून चालणार नाही, हे जाहीर करावं, असं वक्तव्य ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केलं आहे. सांगली लोकसभेच्या जागेसाठी सध्या मविआमध्ये वाद सुरु आहेत. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज भरल्याने आता विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने सांगलीमध्ये खूप मोठी चूक केली आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी केली आहे. सागंली लोकसभेची जागा उबाठा गटाला गेल्याने विशाल पाटील नाराज असून त्यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाचा आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यानंतर त्यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला.