Investigation

महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास अखेर २१ महिन्यानंतर सुरू! एसआयटी प्रमुख पंकज कुमावत यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी

(Mahadev Munde Case) बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणाचा तपास अखेर आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एसआयटीमार्फत सुरु करण्यात आला आहे. याकरिता पंकज कुमावत परळीत दाखल झाले आहेत. २१ महिने उलटूनही या प्रकरणात अद्याप एकही आरोपी पोलिसांना सापडलेला नाही. याशिवाय तब्बल ९ वेळा या प्रकरणातील तपास अधिकारी बदलण्यात आले. यामुळे तपासाला विलंब होत असून आरोपी मोकाट असल्याची तक्रार करत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अनेकवेळा आंदोलनं केली आहेत.

Read More

अपघातापूर्वी विमानाचे टीसीएम बदलण्याचा फ्युएल कंट्रोल स्विचमधील बिघाडाशी संबंध नाही : अहवाल

(Air India Plane Crash AAIB Report) गुजरातमधील अहमदाबाद विमान दुर्घटनेला एक महिना उलटून गेला आहे. याप्रकरणी प्राथमिक तपास अहवाल एएआयबीने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला १२ जुलै रोजी सादर केला आहे. या अहवालातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणांनी इंजिनाच्या इंधन नियंत्रित करणाऱ्या स्विचकडे विशेष लक्ष दिल्याची माहिती आहे. तसेच अहमदाबाद विमान दुर्घटनेपूर्वी, एअर इंडियाने विमानाचे फ्युएल कंट्रोल स्विच आणि थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल (TCM) दोन वेळा बदलले होते, असे अहवालात म्हटले आहे.

Read More

एअर इंडियाचं विमान कोसळण्यापूर्वी काय काय झालं? प्रत्येक सेकंदाला काय घडत गेलं? १२ जूनचा घटनाक्रम जाणून घ्या सविस्तर..

(Ahmedabad Plane Crash 2025 Report) अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या बरोबर एक महिन्यानंतर, या अपघाताचा प्राथामिक अहवाल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. १५ पानांच्या अहवालात कॉकपिटमध्ये दोन्ही पायलट्समध्ये काय संवाद झाला, याची माहिती देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदातच दोन्हीं इंजिन बंद झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे फ्युयल स्विचेस बंद झाल्यानंतर

Read More

‘उदयपूर फाइल्स’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपीची मागणी फेटाळली

उदयपूर फाइल्स कन्हैया लाल टेलर मर्डर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत कन्हैया लाल हत्या प्रकरणातील एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात याचिका बुधवार, दि. ९ जुलै रोजी दाखल केली गेली. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मोहम्मद जावेद या आरोपीने असा दावा केला आहे की, या हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशावेळी जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याचा प्रभाव खटल्यावर होऊ शकतो आणि परिणामी निष्पक्ष न्यायदानाच्या प्रक्रियेत बाधा आणू शकतो.

Read More

दहशतवादी तहव्वूर राणाच्या ‘एनआयए’ कोठडीत वाढ

दहशतवादी तहव्वूर राणाच्या ‘एनआयए’ कोठडीत वाढ

Read More

एनआयएच्या तपासात पहलगाम हल्ल्यातील कोणते पुरावे हाती लागलेत? आतापर्यंत कोणकोणत्या गोष्टींचा उलगडा झालाय?

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक जण जखमी झालेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. हल्ल्यात सहभागी असणाऱ्या दहशतवाद्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी सर्वच स्तरातून होतेय. या पार्श्वभूमीवर तपासाच्या दिशेने देशातील सुरक्षा यंत्रणांच्या हालचाली वाढल्या आहेत. हल्ल्यानंतर बैसरनमधील स्थानिकांचे, पर्यटकांचे जबाब नोंदवले जातायत. तपासादरम्यान हल्ल्याच्या ठिकाणी असणाऱ्या मोबाईल्स कॅमेऱ्यांमध्ये असणाऱ्या व्

Read More

माझ्या वडिलांना कलमा पठण करण्यास सांगितले आणि....!, लेकीने सांगितला पहलगाममधील घटनाक्रम

Pahalgam जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २८ पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा पहिला स्केच आणि ग्रुप फोटो समोर आला आहे. आता संबंधित दहशतवाद्यांची स्केचद्वारे ओळख पटली असून त्यांची नावे आसिफ फौजी, सुलेमन शाह आणि अबू तल्हा अशी नावे आहेत. हे दहशतवादी द रेझिस्टंस फ्रंटचे असल्याचे सांगितले जात आहे. ही दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाचा सहयोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शीची चौकशी करण्यात आल्यानंतर हे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. सूत्रानुसार, केंद्रीय तपास संस्था, एनआयए आत

Read More

ड्रोनद्वारे शस्त्रे पोहोचवल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरमध्ये 'एनआयए'कडून तपास

आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांची ड्रोन पुरवणी करण्याच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने जम्मू आणि काश्मीरमधील पाच जिल्ह्यांमध्ये आठ वेगवेगळ्या ठिकाणी तपास सुरू केला आहे. जम्मू, श्रीनगर, कठुआ, सांबा आणि डोडा जिल्ह्यांमध्ये 'रेझिस्टन्स फ्रंट'च्या प्रमुख मॉड्यूलद्वारे शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांच्या खेपेसाठी वापरल्या जाणार्‍या ड्रोनला रोखल्याच्या प्रकरणात शोध घेण्यात आला. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चे एक शाखा, एनआयएने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121