शेअर बाजारात उत्साह मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आता नव्या विक्रमाकडे झेपावत आहे, बुधवारी बाजाराने आत्तापर्यंतचा सर्वाधिक विक्रमाजवळ पोहोचण्यासाठी केवळ २१५.७५ अंश मागे राहिला. सेन्सेक्सने दुपारी पावणे दोन वाजता सर्वाधिक उसळी घेत ४० हजार १६५ इतक्या अंशांवर पोहोचला. दिवसअखेर तो मुहूर्त ट्रेडिंगच्या तुलनेत २२० अंशांनी वधारत ४० हजार ५१.८७ च्या स्तरावर बंद झाला.
Read More
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल ६० डॉलरवरून घसरु शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कच्च्या तेलाच्या मागणीतील घट लक्षात घेता या किंमती प्रतिबॅरल ४५ डॉलर इतक्या खाली उतरण्याची चिन्हे आहेत. ही स्थिती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली मानली जात आहे. रिअल व्हिजन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी राऊल पाल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधताना हा अंदाज व्यक्त केला आहे. कच्च्या तेलाच्या बाजारातील मानक ब्रेंट क्रुडनुसार प्रतिबॅरल ६० डॉलर इतका दर सुरू आहे तर, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटनुसार, हा
भांडवली अर्थव्यवस्थेत खरेदीसाठी ज्याच्याकडे पैसा आहे, त्याचे महत्त्व असते याला ‘क्रयशक्ती’ म्हणतात. ही क्रयशक्ती मध्यमवर्ग, उच्च-मध्यम वर्ग आणि श्रीमंत वर्ग यांच्याकडेच मोठ्या प्रमाणात असते. भांडवली अर्थव्यवस्था फक्त या वर्गांचा विचार करते, कसा ते आपण बघू. चारचाकी गाडीची गरज कोणाची आहे? शेतकर्याची आहे का? शेतमजुराची आहे का? कारखान्यात मजुरी करणार्याची आहे का? रिक्षाचालकाची आहे का? चहाची टपरी चालविणार्याची आहे का? यापैकी कुणाचीही गरज नाही.
श्रीगणेशाची स्थापना करण्याची एक विधिवत पद्धती आपल्याकडे परंपरेनुसार चालत आली आहे. त्यासाठीची संहिता प्रत्येक घरात पाळण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या घरात अनुभवी ज्येष्ठ असतील तिथे त्रुटी राहत नाही. परंतु नवतर मंडळी असतील तर बहुतेकदा सोपस्कार पार पाडले जातात. असंच काहीसं म्युच्युअल फंड व त्यातील विविध पर्यायांची कार्यपद्धती माहित न करून घेता जाहिरात बघून कमिशन वाचणार म्हणून डायरेक्ट गुंतवणूकदार बनतात. मग पदरी मोदकाचा प्रसाद येण्याऐवजी खिरापत सांभाळण्याची वेळ येते.