भारतीय शेअर बाजाराने आज सकारात्मक वाढ नोंदविली आहे. सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही निर्देशांकात वाढ दिसून आली आहे. पहिल्या सत्राच्या सुरूवातीच्या व्यवहारात घसरण होऊन दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. मेटल, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या समभाग खरेदीचा परिणाम बाजार बंद होताना तेजीत झाला. परिणामी, आशियाई बाजारातील सकारात्मक ट्रेंडमध्ये मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने वाढ नोंदवली.
Read More
नवीन संवत वर्षाच्या सुरूवातीला बाजाराची दिशा नेमकी कशी असेल, याबाबत बाजार विश्लेषकांनी अंदाज वर्तविला आहे. दोन दिवसांपूर्वीच देशातील दोन प्रमुख भांडवली बाजार बीएसई, एनएसईने लक्ष्मीपूजनानिमित्त एक तासांचा मुहूर्त ट्रेडिंग आयोजित केला होता. या व्यापारी सत्रासह नवीन संवत २०८१ ची सुरुवात झाली. आता बाजारातील वातावरण नेमकं कसं असणार, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली असून मागील काही दिवसांपासून विदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्रीचा सपाटा सुरू आहे. सेन्सेक्स १३८.७४ अंकांच्या घसरणीसह ८०,०८१.९८ पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५० देखील २४,४३५.५० च्या पातळीवर बंद झाला.
देशातल्या दोन बड्या आयटी कंपन्यांनी तिमाही निकाल जाहीर केले आहेत. जुलै-सप्टेंबर तिमाहीत विप्रोचा निव्वळ नफ्यात मोठी वाढ झालेली आहे. विप्रो कंपनीच्या निव्वळ नफ्यात २१ टक्क्यांनी वाढ होत ३,२०९ कोटी रुपये इतका झाला आहे. कंपनीने आपल्या भागधारकांसाठी मोठा निर्णय देखील घेतला आहे. यावेळी संचालक मंडळाने बोनस शेअर देण्याची घोषणादेखील केली आहे.
'वारी एनर्जीज लिमिटेड'चा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर(आयपीओ) लवकरच बाजारात दाखल होणार आहे. वारी एनर्जीज लिमिटेडचा आयपीओ दि. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला राहणार आहे. कंपनी आयपीओद्वारे ४,३२१ कोटी रुपये बाजार भांडवल उभारले जाणार आहे. प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेले ४,८००,००० इक्विटी समभाग विक्रीची ऑफर यामार्फत केली जाणार आहे.
ह्युंदाई मोटर कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. ह्युंदाई मोटर आयपीओच्या माध्यमातून बाजार भांडवल उभारणी करणार असून दि. १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान खुला असणार आहे. कंपनीकडून आयपीओच्या माध्यमातून २७,८७०.१६ कोटी रुपये भांडवल उभारले जाणार आहे. ह्युंदाई मोटर्स आयपीओचा एक लॉट ७ शेअर्सचा असून १८६५-१९६० प्राईस बँड ठेवण्यात आला आहे. २२ ऑक्टोबरला बीएसई आणि एनएसईवर कंपनी सूचीबध्द होणार आहे.
देशातील भांडवली बाजारात आयपीओ जोरदार इंट्री पाहायला मिळत आहे. बाजारातील आयपीओमध्ये गेल्या आठ महिन्यांत तीन पटीने वाढ झाली आहे.
सध्या शेअर बाजारात प्रारंभिक सार्वजनिक ऑफर(आयपीओ) प्रचंड प्रमाणात पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीस अनेक कंपन्यांचे आयपीओज बाजारात दाखल झाले असून गुंतवणूकदारांकडून त्यास मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
आज शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली असून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ८.३० लाख कोटींची वाढ झाली आहे. वाढता विदेशी निधी प्रवाह आणि आशियाई बाजारातील मोठ्या प्रमाणावर भारतीय शेअर बाजाराने सकारात्मक परिणाम दर्शविला आहे. एकंदरीत, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार वधारला असून सलग तिसऱ्या दिवशी तेजीचा कल कायम ठेवला आहे.
लक्झरी व्हिला रेंटल कंपनी स्टेयस्टा आगामी काळात आयपीओ लाँच करण्याची योजना आखत आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनीला ६०० कोटी रुपयांची भांडवल उभारणी करावयाची आहे.
अमेरिकन बाजारातील वाढीनंतर आज भारतीय बाजारदेखील वधारलेला दिसून आला आहे. भारतीय शेअर बाजारात आज जबरदस्त वाढ पाहायला मिळत असून बीएसई निर्देशांक सेन्सेक्स १४३१ अंकांनी वधारला आहे. तर निफ्टी ४७० अंकांची वाढ होत २५,३८८ वर बंद झाला आहे.
देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहापैकी टाटा ग्रुपकडून शेअर बाजारात आपली कंपनी सूचीबध्द करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. टाटा ग्रुपने कंपनी सूचीबध्द न करता २० हजार कोटी रुपयांहून अधिक कर्जाची परतफेड करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. टाटा समूहाची ४१० अब्ज डॉलर होल्डिंग कंपनीकडून एनबीएफसी नोंदणी प्रमाणपत्र आरबीआयकडे सादर केले आहे.
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. आज मार्केटमध्ये ओला इलेक्ट्रिकच्या समभाग किमतीत ६ टक्क्यांनी घट झाल्याने १३७ रुपये प्रति शेअरवर स्थिरावला आहे.
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर किमतीत प्रचंड वाढ झाल्याने तज्ज्ञ व्यक्तींसह गुंतवणूकदार देखील हैराण झाले आहेत. दरम्यान, या प्रचंड वाढीसह शेअर होल्ड करण्याच्या सूचनेसह शेअर्समधील मूमेंट अत्यंत महत्त्वाचा असेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दि. ०९ ऑगस्ट रोजी बाजारात सूचीबध्द झाल्यापासून ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या समभागाने प्रचंड उसळी घेतली आहे.
जागतिक कर्ज या वर्षात ३०७ ट्रिलियन डॉलर या उच्चांकी पातळीवर पोहोचले. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदर वाढवले; पण ते कर्ज महागडे करणारे ठरले असून, अर्थव्यवस्थेच्या वाढीवर विपरित परिणाम करणारे ठरले. यानिमित्ताने पुनश्च भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे महत्त्व म्हणूनच अधोरेखित झाले आहे.
अमेरिकी मध्यवर्ती बँकेने व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिल्यानंतर, शेअर बाजारात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. शुक्रवारी एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.४ लाख कोटी रुपयांची भर पडली. विदेशी गुंतवणुकीचा ओघ असाच कायम राहील, असे आजतरी निश्चितपणे म्हणता येते. म्हणूनच ‘फेड’ दरवाढीचा घेतलेला हा आढावा...