पाकिस्तानमध्ये सुन्नी विरुद्ध शिया आणि दोन्ही मिळून अहमदिया विरुद्ध असे गृहयुद्ध सुरू आहे. कालपरवा तर अहमदिया दुश्मनीवरून हजारो सुन्नी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयावर चाल करून गेले. ‘जमियत उलेमा-ए-इस्लाम’ आणि ‘जमात-ए-इस्लामी’ समवेत विविध धार्मिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘मजलिस-ए-तहफ्फुज-ए-खतमे नबुव्वते’च्या बॅनरखाली आंदोलन केले.
Read More
आज दि. 14 ऑगस्ट. फाळणीच्या अगणित वेदनांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस आपण ‘विभाजन विभिषिका दिन’ म्हणून साजरा करतो, तर दुसरीकडे हा दिवस पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन. तेव्हा, स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने पाकिस्तानची वाटचाल नेमकी कुणीकडे सुरु आहे, त्याची कल्पना यावी.
अजमेरमध्ये गेल्या काही दिवसांपुर्वी अकरावीत शिकणाऱ्या मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराप्रकरणी आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तिघांना अटक केली होती. तर १७ पोलिसांचे एसआयटी पथकं तयार केल्यानंतर ४ जणांना अटक करण्यात आली. त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. तर उर्वरित आरोपी इरफान, अरबाज, अस्लम, रज्जाक, मुबारक खान आणि इम्रान खान आहेत.
पाकिस्तानमध्ये दि. 8 फेब्रुवारी रोजी पार पाडलेल्या सार्वत्रिक आणि प्रांतीय निवडणुकांच्या निकालांकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून होते. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे हिंसाचार, मतपेट्यांची पळवापळव, उमेदवारांवर हल्ले असे हिंदी सिनेमामधील दृश्यांनाही लाजवतील, असे कित्येक प्रसंग घडले. तब्बल तीन ते चार दिवसांनी निकालाचे चित्र स्पष्ट झाले आणि इमरान खान समर्थक अपक्षांनी पाकिस्तानात बाजी मारली खरी. पण, त्यांना बहुमताने हुलकावणी दिल्याने, अखेरीस राजकीय वाटाघाटी आणि तर्कवितर्कांनंतर तिथे इमरान खान विरोधकांनी पुन्हा एकत्र येत
नवाज शरीफ पुन्हा एकदा पंतप्रधान होणार, हे स्पष्ट असले तरी ते किती काळ लष्कराची मर्जी राखू शकतील, याबाबत शंका आहे. पण, वर्षानुवर्षे नवाज शरीफ यांची सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींशी घनिष्ठ संबंध आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये भारत आणि आखाती अरब देशांमध्ये संबंध मोठ्या प्रमाणावर सुधारले असल्याने त्यांचा परिणाम भारत पाकिस्तान संबंधांवरही होऊ शकेल.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सिफर प्रकरणात १० वर्षांचा शिक्षा सुनावण्यात आली आहे. अधिकृत गुप्तता कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांच्यासह माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना सिफर प्रकरणात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
पूर्वी भारताच्या नावाने खडे फोडणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आता चक्क भारताचे गोडवे गाऊ लागले आहे. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांना हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे की मग पाकिस्तानमध्ये परतल्यानंतर पुन्हा एकदा सुरू केलेला दुटप्पीपणा? पाकिस्तानने भारताचे गोडवे गावे, भारताच्या बाजूने बोलावे याची अपेक्षाही भारताने कधी केली नाही. मात्र, शरीफ यांच्या बदलत चाललेल्या शरीफ स्वभावाने सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
नवाझ शरीफ यांच्याकडून बर्याच अपेक्षा आहेत. अर्थात, नवाझ शरीफ पंतप्रधान झाल्यावर त्यांचा लष्कराशी किती काळ मधुचंद्र चालतो, यावर बरेच अवलंबून आहे. लष्कराने कोणत्याही पाकिस्तानी पंतप्रधानाला त्याचा पूर्ण सत्ताकाळ लाभू दिलेला नाही. पंतप्रधानाने थोडेही धोरण स्वातंत्र्य घेतले की, त्याला लष्कर पदच्च्युत करते. त्यामुळे नवाझ शरीफ हे लष्कराला उसंत मिळण्यापुरते पंतप्रधान असू शकतात, हे लक्षात घेतले पाहिजे.
पाकिस्तानमध्ये जानेवारी महिन्यात निवडणुकांची घोेषणा करण्यात आली आहे. त्यातच इमरान खानमुळे अमेरिका आणि आखाती अरब देशांनी पाकिस्तानला वार्यावर सोडले असून हे बदलायचे असेल, तर नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदी बसवण्याला पर्याय नाही, हे तेथील लष्कराच्या लक्षात आले आहे. नवाझ शरीफ यांचे परत येणे भारतासाठी चांगली गोष्ट असली, तरी आज भारत पाकिस्तानवर विश्वास टाकू इच्छित नाही.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना तोशखाना प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेस स्थगिती देत त्यांचा जामीन मंजूर केला आहे.
'चांद्रयान-३ चे लँडिंग पाकिस्तानमध्ये दाखवण्यात यावे', अशी मागणी पाकिस्ताचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी केली आहे. फवाद चौधरी नेहमीच भारताविरोधात गरळ ओकत असतात. चांद्रयान-२ मोहिमेच्या अपयशानंतर फवाद चौधरी यांनी भारताची खिल्ली उडवली होती. पण आता ते सुधारले आहेत किंवा भारताचे सामर्थ्य ओळखले आहे असे दिसते.
पाकिस्तानामध्ये वेगवेगळे गट स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. पश्तून, बलूच आणि इतर मुस्लिम जातींवरील अत्याचाराविरोधात शुक्रवारी (१८ ऑगस्ट २०२३) निदर्शने झाली. राजधानी इस्लामाबादमध्ये असलेल्या सर्वोच्च न्यायालयासमोर पश्तून नेत्यांनी आयोजित केलेल्या या निदर्शनात हजारो लोक सहभागी झाले होते. यावेळी पश्तून नेत्याने पश्तूनांचा आवाज ऐकला नाही तर स्वातंत्र्यासाठी युद्ध होईल, अशी धमकी दिली आहे.
पाकिस्तानच्या संसदेचा कार्यकाळ संपल्यामुळे संसद १० ऑगस्टला भंग करण्यात आली. संसद भंग केल्यानंतर तीन दिवसांच्या आत पाकिस्तानच्या सरकारला काळजीवाहू पंतप्रधानाची नियुक्ती करायची असते. पण आता पाकिस्तानमध्ये काळजीवाहू पंतप्रधानावरुन राष्ट्रपती आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यात वाद सुरु झाला आहे.
अनवर-उल-हक कक्कर यांची पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवर्तमान पंतप्रधान शहबाज शरीफ आणि विरोधी पक्षनेते राजा रियाझ यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अन्वर-उल-हक कक्कर यांच्या नावावर सहमती बनली.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी पाकिस्तानची संसद बरखास्त करून निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आहे. पाकिस्तानच्या संसदेचा कार्यकाळ १२ ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळेच राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी संसदेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार घटनेच्या कलम ५१-१ अंतर्गत संसद बरखास्त केली.
म्हणा, गेल्या ७५ वर्षांत स्थिरता ही पाकिस्तानला कधी लाभलीच नाही. त्यातच सद्यःस्थिती तर आणखीन भयंकर. चीन आणि ‘आयएमएफ’कडून मिळणार्या कर्जावर, हा देश आणखीन किती वर्षं तग धरू शकेल, हाच मोठा प्रश्न. अशा परिस्थितीत कुठल्याही देशात स्थिर आणि खंबीर सरकार असणे आवश्यक. पण, पाकिस्तानच्या राजकीय पटलावर या देशाला आर्थिक, धार्मिक, सामाजिक अशा कुठल्याही प्रकारच्या बिकट परिस्थितीतून सावरू शकेल, असा एकही राजकीय पक्ष अथवा नेता नाही. त्यामुळे साधारण नोव्हेंबरच्या आसपास होणार्या निवडणुकांमध्ये नेमके काय होणार, त्यावर या देशा
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथील इस्लामिया विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या मोबाइल फोनमध्ये महिला विद्यार्थिनींच्या अश्लील व्हिडिओ क्लिप सापडल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये या व्हिडिओंची संख्या सुमारे ५५०० असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षावर प्रतिबंध लावण्याकरिता सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, पाकिस्तानात ९ मे रोजी झालेल्या हिंसक राष्ट्रव्यापी आंदोलनानंतर इम्रान खान यांच्या तहरीक ए इंसाफ (पीटीआय) वर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यास जोर आला. त्यानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी सांगितले की, पीटीआयवर निर्बंध लावणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस आले आहे. शिवकुटी पोलिस स्टेशनमधील एका महिला पोलिस कॉन्स्टेबलने इमरान खानवर बौद्ध धर्म स्वीकारून फसव्या पद्धतीने लग्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेचे म्हणणे आहे की, लग्न झाल्यापासून इमरान आणि त्याचे कुटुंबीय तिच्यावर जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत आहेत.
बुद्धीबळाच्या खेळात थेट राजाच्या गळ्यापर्यंत पोहोचण्याआधी त्याच्या आसपासचे प्यादे, वजीर यांचा खेळ खल्लास करावा लागतो. पण, पाकिस्तानी सरकार, सैन्य आणि ‘आयएसआय’ने उतावीळपणा दाखवत नेमकी उलट खेळी करण्याचा प्रयत्न केला. ‘तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) या पक्षाचे सर्वेसर्वा आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना मंगळवार, दि. ९ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातूनच पाकिस्तानी रेंजर्सने अटक केली.
पाकिस्तानमधील राजकीय अस्थैर्याचा परिणाम त्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणार्या कर्जावर होत आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असून परिस्थिती अशीच राहिली, तर तेथे अराजकता माजेल. इमरान खान लोकप्रिय असले तरी त्यांच्याच काळात घेतल्या गेलेल्या लोकानुनयी निर्णयांमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले.
एकेकाळी इमरान खान क्रिकेटहिरो इमरान खान होते. नंतर त्यांचे परिवर्तन बदल घडवून आणणारा इमरान खान असे झाले आणि चार वर्षांच्या राजवटीत त्यांना विशेषण लावण्यात आले, ‘टेरर खान’. त्यांच्या चार वर्षांच्या काळात दहशतवादी गटांकडून लष्करावर ४०० हून अधिक हल्ले झाले. त्याविषयी घेतलेला आढावा.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेनंतर अख्ख्या देशात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. इमरान खान यांच्या समर्थकांनी सार्वजनिक, खासगी मालमत्तांना तर लक्ष्य केलेच, शिवाय पाकिस्तानी लष्करावरही हे आंदोलक तुटून पडले. एका मेजरचे घरही पेटवण्यात आले. आतापर्यंत या दंगलींमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून, ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. इमरान खान यांच्या पक्षाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडी करत आहेत. अशा परिस्थितीत इतर देशातून तेथे पोहोचलेले अधिकारी आणि खेळाडू आपल्या देशात परतण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना योग्य सुरक्षा आणि भारतीय खेळाडूंना लवकर परतण्याची विनंती केली आहे. बीएफएएमई चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी गेलेल्या भारतीय ब्रिज संघाला भारतीय उच्चायुक्तालयाने लवकरात लवकर
नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना बुधवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात राजधानी इस्लामाबाद येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इम्रानला आठ दिवसांच्या कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.
चहुबाजूने अस्वस्थ आणि अन्नान्नदशा असलेल्या पाकिस्तानात पीठासाठी सामान्यांचे गेल्या काही दिवसांत हकनाक बळी गेले. महागाईबरोबरच राजकीय अस्थैर्य, न्यायालयाशी सत्ताधार्यांचा उभा डाव आणि ‘आयएमएफ’च्या पॅकेजकडे पाकिस्तान आस लावून बसलाय. अशी ही पाकी आवामची तडफड या देशासाठी अखेरची फडफड ठरण्याचीच शक्यता आता अधिक!
पाकिस्तानला आणखी कर्ज देण्यास आयएमएफतर्फे नकार देण्यात आला आहे. आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानचे भवितव्य धोक्यात आले आहे. इम्रान खान आणि शेहबाज शरीफ यांच्यातील देशवासीय नरकयातना भोगत आहेत. पाकिस्तानचे खायचे वांदे आहेत. मात्र, नेते आपसात भांडत आहेत.
पाकिस्तानचे पोलिस रविवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घरी पोहोचले. तोशाखाना (सरकारी खजिना घोटाळा) प्रकरणात आरोप असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस त्यांच्या घरी पोहोचले, त्याआधीच इम्रान खान घरातून फरार झाले. त्यामुळे पोलिसांना रिकाम्या हातानेच परत यावे लागले. इमरान यांना केव्हाही अटक होऊ शकते. त्यामुळे ते गायब झाल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानमधील सोमवारच्या पेशावरच्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याने पुनश्च या देशातील सुरक्षा यंत्रणांचे धिंडवडे निघालेच. पण, या हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणांमधील अक्षम्य अपयशाचे आत्मपरीक्षण करण्यापेक्षा तालिबान आणि भारतावर दोषारोपणाचीच पुनरावृत्ती सवयीप्रमाणे पाक सरकारने केली असली तरी हा देश अखेरच्या घटका मोजतोय, त्याचाच हा बॉम्बहल्ला आणखीन एक पुरावा...
रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढलेल्या कागदाच्या किंमती भारतीय वृत्तपत्रसृष्टीनेच पचवल्या. पाकिस्तानात मात्र वह्या पुस्तकांच्या किमती वाढल्या म्हणून १० लाख मुलांनी शाळा सोडल्या आहेत.
अपयशी राष्ट्र ठरलेल्या पाकिस्तानला अखेर नवे लष्करप्रमुख मिळाले आहेत. यापूर्वी जनरल कमर जावेद बाजवा यांनाच मुदतवाढ देण्यात येईल, अशीही एक चर्चा पाकिस्तानात रंगली होती. त्यासाठी जनरल बाजवादेखील प्रयत्नरत असल्याचे म्हंटले जात होते. मात्र, अखेरीस पाकिस्तान सरकारने लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांना नवे लष्करप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये नव्या लष्करप्रमुखाचा शोध आता संपला आहे.
इमरान खान विरुद्ध लष्कर-‘आयएसआय’ हा पाकिस्तानात उफाळून आलेला संघर्ष खान यांच्यावरील हल्ल्यानंतर एका वेगळ्याच वळणावर पोहोचला. परिणामी, आगामी काळात इमरान खान यांनी पेटवलेला हा राजकीय वणवा पाकिस्तानच्या लष्करासह संपूर्ण देशालाही उद्ध्वस्त करुन सोडेल, यात शंका नाही.
इमरान खान यांनी पाकिस्तानी सैन्याविषयी उपस्थित केलेला प्रश्न पूर्णपणे योग्य आहे. पण, इमरान खान हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी मात्र योग्य व्यक्ती नाही, हेही तितकेच खरे.
पाकिस्तानमध्ये १७ जुलै रोजी पंजाब विधानसभेच्या २० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांनी पाकिस्तानच्या नाजूक राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेला धक्का दिला आहे. निकाल पूर्णपणे अनपेक्षित होता, असा दावा करणे अधोरेखित होईल.
‘आयएमएफ’कडून मिळालेल्या या नव्या कर्जामुळे पाकिस्तानात आनंद साजरा करण्यासारखे खरंतर काहीही नाही. परंतु, या देशाची आर्थिक परिस्थितीही तितकीच भीषण आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान कप्तान इमरान खान सध्या सैरबैर झाले आहेत. कारण, हातातून सत्ता गेल्यापासून ते नुसते पाकिस्तानच्या कानाकोपर्यात मोठाल्या रॅली घेऊन शक्तिप्रदर्शन करण्यातच धन्यता मानताना दिसतात. पाकिस्तानी आवाम अजूनही माझ्या पाठीशी आहे, हेच दाखवून देण्याचा हा सगळा नसता खटाटोप. एप्रिल महिन्यात विश्वासदर्शक ठरावावेळी इमरान खान यांनी अखेरपर्यंत आपली खुर्ची वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण, इतके सगळे करूनही इमरान खान यांच्या हातातून सत्ता निसटलीच. तेव्हापासून ते कालपरवापर्यंत आपले सरकार उलथवण्याचा हा अ
पाकिस्तानमधील सत्ताधारी ‘पीएमएल-एन’ पक्षाच्या अध्यक्षा मरीयम नवाझ यांनी ‘आयएमएफ’चा पाकिस्तानवर आता विश्वासच नसल्याचे नुकतेच विधान केले. त्याचे कारण म्हणजे इमरान खान यांचा ‘आयएमएफ’बरोबरचा ‘फितना’ म्हणजेच फसलेला करार. पण, खान असो वा शरीफ सरकारचे निर्णय, भरडली जातेय ती पाकिस्तानी आवाम...
पाकिस्तानकडून होणार्या रसद पुरवठ्याच्या जोरावर भारतात हिंसक घटनांना प्रत्यक्षात आणण्याचे काम तुकडे तुकडे गँग करत असते. पण, आता मात्र पाकिस्तानची परिस्थितीच इतकी बिकट झाली की, ‘तुकडे तुकडे गँग’च्या नंदनवनाचेच तुकडे होण्याची वेळ आली आहे. तसे झाल्यानंतर ‘तुकडे तुकडे गँग’कडून केला जाणारा मातम नक्कीच पाहण्यासारखा असेल.
पाकिस्तान भयंकराच्या उंबरठ्यावर नव्हे, तर दरीतच कोसळल्यासारखे झाले आहे. अर्थात, करावे तसे भरावे. भारताविरोधात स्वतःचे नाक कापून अपशकुन करणारा हा देश. जन्मापासूनच भारताविरोधात कटकारस्थानांमध्ये इतका गुंतला की,त्या गुंत्यात तो स्वतःच अडकला. या पाकिस्तानला कधीही राजकीय आणि आर्थिक स्थैर्य लाभलेच नाही.
इमरान खान यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला गेला. त्या ठरावाला सामोरे न जाता त्यांनी संसद बरखास्त केली. प्रकरण पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायमूर्तींनी संसद बरखास्तीचा निर्णय घटनाबाह्य ठरविला आणि रविवार दि. १० एप्रिल रोजी संसदेच्या अधिवेशनात अविश्वासाचा ठराव पारीत झाला आणि इमरान खान ‘क्लीन बोल्ड’ झाले. यात अमेरिका कुठे येत नाही.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अखेर पायउतार व्हावे लागलेच. पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये इम्रान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला
पाकिस्तानची संसद बरखास्त झाल्यामुळे आता ९० दिवसांत तेथे सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे मोठे आव्हान आहेच. पण, त्याचबरोबर भविष्यात जे सरकार स्थापन होईल, त्यांच्यासमोर इमरान खान यांच्या काळात विविध देशांशी बिघडलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांना पुन:प्रस्थापित करण्याचेही मोठे आव्हान असेल
आजवरच्या इतिहासात पाकिस्तानमध्ये एकदाही लोकनियुक्त सरकारने आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही, हे विशेष. कोणतेही सरकार तिथे साधारणतः तीन ते साडेतीन वर्षं टिकते. त्यानंतर लष्कर उठाव करून सत्ता ताब्यात घेते
इमरान खान २०१८ मध्ये सत्तेत आल्यापासून त्यांच्या सरकारविरोधात असंतोष आणि तक्रारी वाढत आहेत. अनेक दशकांनंतर, त्यांच्या कार्यकाळात, देशाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आणि अर्थव्यवस्था मंदावल्याने, २०१९ मध्ये प्रथमच देशाने नकारात्मक विकास दर नोंदविला.
पाकिस्तानातील राजकीय परिस्थितीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून असून पुढील काही दिवसांत नेमके पाकिस्तानमधील इमरान सरकार कोसळणार की, कुठल्या चमत्काराने इमरान यांची खुर्ची वाचवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्या अनुषंगाने पाकिस्तानातील राजकीय उलथापालथी आणि शक्याशक्यतांचा आढावा घेणारा हा लेख...
पाकिस्तान कधीही एक स्वतंत्र राष्ट्र आणि लोकाभिमुख परराष्ट्र धोरणाचे पालन करू शकला नाही. स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या दशकात पाकिस्तान विन्स्टन चर्चिल आणि अॅन्थनी ईडनच्या नेतृत्वातील ब्रिटनचा अनुयायी होता. तसेच, अमेरिकी नेतृत्वातील साम्यवादविरोधी आघाडीकडे पाकिस्तानचा कल होता व हा कल पुढच्या दशकांत अधिकाधिक वाढत गेला. आज मात्र पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण आपली दिशा पूर्णपणे गमावून बसले आहे.
पाकिस्तान सरकारचे भवितव्य अस्पष्ट आहे. परंतु, विश्वासदर्शक ठरावानंतर पाकिस्तानमधील राजकीय संकट अधिकच गहिरे होण्याची शक्यता आहे. सरकारच्या दमनशाहीच्या प्रयत्नांचा विरोधक रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून विरोध करतील. वर्तमान सरकार पडले अथवा कायम राहिले, तरी दोन्ही स्थितीत पाकिस्तानमधील लोकशाही मात्र अधिकच दुबळी होईल.
नुकताच फेब्रुवारीच्या उत्तरार्धात एका प्रमुख स्विस बँकेतून डेटा लिक झाल्यामुळे १४०० पाकिस्तानी नागरिकांशी निगडित ६०० खात्यांबाबतची माहिती समोर आली. स्वित्झर्लंडमधील नोंदणीकृत गुंतवणूक बँकिंग संस्था ‘क्रेडिट सुइस’च्या आकडेवारीनुसार, लीक झालेल्या खातेधारकांत माजी ‘आयएसआय’प्रमुख जनरलसह कितीतरी प्रमुख राजकीय नेते आणि जनरल सामील आहेत.
पूर्व युक्रेनमध्ये रशियन सैन्याने केलेल्या 'विशेष लष्करी कारवाई' दरम्यान रशियामध्ये पाहुणचार घेत असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अमेरिकेने मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेच्या 'यूएस फेडरल रिजर्व'ने 'नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान' (NBP) आणि तिच्या न्यूयॉर्क शाखेला ५५ दशलक्ष यूएस डाॅलसचा दंड ठोठावला आहे. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, यूएस फेडरल रिझर्व्ह आणि न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेसने मनी लॉन्ड्रिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावला आहे.
युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेण्यासाठी मॉस्कोमध्ये पोहोचले आहेत. युक्रेनवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खान यांच्या रशिया दौऱ्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खास करुन या भेटावरुन अमेरिकेनेही इम्रान खान यांचे कान टोचले आहेत.