मंत्री रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवली विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या वतीने उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला. चव्हाण यांच्या डोंबिवली पश्चिमेतील जनसंपर्क कार्यालयापासून रॅली काढण्यात आली होती. भव्य शक्तीप्रदर्शन करत मंत्री रविंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ढोलताशा आणि लेझीमच्या गजरात चव्हाण यांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात येत होती.
Read More