‘सेक्युलॅरिझम’ हा शब्द आणीबाणीच्या काळात संविधानात अगदी पद्धतशीरपणे पेरण्यात आला, हे आपण जाणतोच. पण, मुळात ‘सेक्युलॅरिझम’ ही संकल्पना पाश्चात्त्य असली तरी त्याचे नेमके मूळ काय, हे समजून घेणेही क्रमप्राप्तच. ख्रिस्ती ‘थिऑलॉजी’च्या पार्श्वभूमीवर उदयास आलेली ‘सेयुलॅरिझम’ची संकल्पना हे खरं तर ‘ख्रिस्ती रिलिजन’चे प्रत्युत्तर असल्याने, ते भारतासाठीही निरर्थकच ठरावे. त्याचेच हे चिंतन...
Read More
आजपासून ७५० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या भूमीत एका तेजस्वी सूर्याचा उदय झाला, ज्याच्या प्रकाशाने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण भारताला ज्ञान आणि भक्तीची नवी दिशा दिली. ते महान संत, कवी आणि तत्त्वज्ञ म्हणजे संत ज्ञानेश्वर. त्यांची ७५०वी जयंती (१२७५-२०२५) हा एक ऐतिहासिक क्षण आहे, जो आपल्याला पुन्हा एकदा त्यांच्या कालातीत कार्याचे स्मरण करून देतो. त्यांच्या आयुष्याचा काळ कमी असला, तरी त्यांनी रचलेला विचार आणि भक्तीचा पाया आजही समाजाला प्रेरणा देतो.
समाजातील काही घटकांचे भटक्या कुत्र्यांबद्दलचे असो अथवा कबुतरांवरील प्रेम हे गंभीर आजारांना निमंत्रण देणारे, प्रसंगी जीवघेणेही ठरते. पण, हे पशुप्रेम मानवी जीवनाला धोकादायक ठरत असेल, तर त्याचा कठोरपणे बंदोबस्त केलाच पाहिजे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील भटक्या कुत्र्यांसंदर्भात दिलेला निर्णय हा सर्वस्वी स्वागतार्हच म्हणावा लागेल.
प्रसूती ही एक अशी प्रक्रिया, जी मानवीसृष्टीमध्ये सृजनाच्या अविष्काराचे दर्शन घडवते. पण, त्याचवेळी आई आणि बाळ या दोघांच्या आयुष्याला धोकाही असतो. म्हणून प्रसूतीला स्त्रीचा पुनर्जन्म मानले जाते. प्रसूतीची चर्चा करण्यास कारणीभूत ठरलेली एक नुकतीच घडलेली घटना म्हणजे, ‘इन्स्टाग्राम’ मान्यताप्राप्त म्हणून नावाजलेल्या ‘फ्रीबर्थ’ पद्धतीचा अवलंब केल्याने एका महिलेला तिचे तान्हे गमावण्याची वेळ आली.
अवतीभोवतीच्या जगात आपण किमान दहाएक माणसांना तरी दररोज भेटतोच आणि अनेकजण आपल्याला ओळखतही असतात. लोक आपल्याला नावाने ओळखतात, चेहरा लक्षात ठेवतात, आपल्या व्यवसायाबद्दल, यशाबद्दल किंवा आपण समाजात पार पाडत असलेल्या भूमिकांबद्दल माहिती ठेवतात. पण, त्यापैकी खरंच कितीजण आपल्याला समजतात? कितीजण आपल्या चेहर्याच्या पलीकडे आपल्याला पाहतात? आपल्या विचारांच्या सखोलतेत, आपल्या निःशब्द लढ्यांमध्ये, आपल्या नैतिकतेमध्ये आणि आपल्या शांत स्वप्नांमध्ये?
ब्रिटिश संसदेच्या ‘संयुक्त मानवी हक्क समिती’ने नुकताच एक अहवाल सादर केला. भारतासह 12 देशांवर ब्रिटनमध्ये ‘ट्रान्सनॅशनल रिप्रेशन’च्या कामगिरीचा आरोप यामध्ये करण्यात आलाआहे. यामध्ये असे नमूद करण्यात आले की, काही परदेशी सरकारे ब्रिटनमध्ये राहणार्या लोकांना धमकावण्याचा आणि त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. या समितीने ब्रिटनमधील परदेशी सरकारांच्या कारवायांना, मानवाधिकारांच्या द़ृष्टीने धोका असल्याचे म्हटले असून, ब्रिटिश सरकारनकडे तातडीच्या कारवाईची मागणीही केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते
कोल्हापूरच्या ‘माधुरी’ हत्तीणीच्या प्रकरणामुळे समोर आलेली मानव आणि वन्यजीव संबंधांची हळवी किनार कितीही सुखावणारी असली, तरी शेवटी हा प्रश्न त्या महाकाय सजीवाच्या तितक्याच श्रद्धेने काळजी घेण्याचाही आहे. म्हणूनच हा मुद्दा फक्त हत्तीचाच आहे!
मुख्यमंत्रिपद ही केवळ एक पदवी नसते, ती असते एक जबाबदारी लोकांच्या नजरेतून, त्यांच्या श्वासातून, त्यांच्या प्रश्नांच्या गाभ्यातून उभी राहणारी. अनेक मुख्यमंत्री येतात, जातात. परंतु, काहीजण आपल्या वागणुकीने, निर्णयांनी आणि संवेदनशीलतेने लोकांच्या मनाचा कायमचा एक कोपरा जिंकून घेतात. देवेंद्रजी फडणवीस हे असेच एक नाव...
ह्युमन वेल्फेअर क्रेडिट अॅंड थ्रिफ्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (एचडब्ल्यूसी) या संस्थेच्या प्रचारासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अभिनेता श्रेयस तळपदे यांनी काम केले होते. या प्रचार जाहिरातीमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोपप्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदे यांना सोमवार दि. २१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्या के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले आहे.
कोठडीत आरोपींवर छळ करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना केवळ सरकारी परवानगी असल्याच्या कारणावरून वाचवले जाऊ शकते, या कायद्याच्या तरतुदीवर केरळ उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कौसर एडाप्पागथ यांच्या खंडपीठाने ‘सुधा विरुद्ध केरळ राज्य’ या प्रकरणात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ च्या कलम २१८ नुसार पोलिसाच्या सरकारी संरक्षणाबाबतीत निर्णय नुकताच दिला आहे.
केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला दि.१६ जुलै रोजी येमेन येथे होणाऱ्या फाशीला स्थगिती मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात तातडीची याचिका ‘सेव्ह निमिषा प्रिया अॅक्शन कौन्सिल’ या स्वयंसेवी संस्थेकडून दाखल करण्यात आली आहे. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर वरिष्ठ वकील रागेंथ बसंत यांनी याचिकेत बाजू मांडताना म्हटले की, “शरीयत कायद्यानुसार ही फासी रोखता येते. त्यासाठी केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष्य देण्याकरीता आपण निर्देश द्यावे.” अशी विंनती त्यांनी न्यायालयासमोर केली.
पंढरपूर म्हणजे मराठी जनमानसाचे प्रेमपीठ! विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन मागची अनेक शतके वारीची ही प्रथा अखंडितपणे, शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे. मानवी जीवन समृद्ध करणार्या याच विठ्ठलयात्रेचा घेतलेला हा आढावा.
रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये एकात्मिक पार्किंग व्यवस्था आणणे महत्त्वाचे आहे. त्याअनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशात नगरविकास विभागाने आपल्या नियमावलीमध्ये पार्किंग व्यवस्थेवर आधारित आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. मुंबई येथे मंत्रालयात शुक्रवार,दि.२७ रोजी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशातील महापालिका आयुक्तांच्या बैठकीत बोलत होते.
आजच्या युगावरच आपण खरं तर ‘स्पर्धात्मक युग’ असा कायमचा शिक्का मारल्याने, स्पर्धेचे मानवी जीवनातील स्थान लक्षात यावे. स्पर्धा तर सर्वत्र असते. मग नेमके या स्पर्धेला कसे तोंड द्यावे? स्पर्धा आणि प्रतिस्पर्धा यामध्ये नेमका फरक तो काय? यांविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
केवळ संघकार्याचा किंवा शाखांचा विस्तार म्हणजे संघाचा विस्तार नव्हे. तर संघातील स्वयंसेवकत्वाचा विस्तारही तितकाच महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.
अधारणीय शारीरिक वेगाचे महत्त्व तसेच ते रोखल्यास निर्माण होणारे धोके हानीकारकच. त्यामुळे अशा वेगांना अथबा त्याच्या संवेदनांना न रोखण्याचा सल्लाच आयुर्वेद देत असते. या लेखामध्ये जांभई या अशाच एका अधारणीय शारीरिक वेगाविषयी जाणून घेऊया...
युद्ध आणि शांतता या गोष्टी आपण सहसा राजकारण, रणनीती किंवा इतिहासाशी जोडतो. पण, प्रत्येक संघर्षाच्या मुळाशी आणि प्रत्येक शांततेच्या प्रयत्नामागे असतो एक महत्त्वाचा घटक, मानवी मन. मानसशास्त्रज्ञांनी हे मनोविज्ञान सखोलपणे अभ्यासले असून, माणसाला युद्धाकडे काय ओढते आणि शांततेकडे तो कसा वळतो, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा अभ्यास सांगतो की, आपली विचारशक्ती, भावना आणि सामाजिक वर्तन यांचा अभ्यास केल्याने अधिक शांततामय समाज घडू शकतो. विसंगती वाटेल, पण युद्ध काही लोकांसाठी मानसिक आणि सामाजिक गरजा पूर्ण क
मानवी आयुष्याला अधिक सुखी करण्यासाठी दिवसेंदिवस तंत्रज्ञानात प्रगती होत आहे. मात्र, पाश्चात्य तंत्रज्ञान हे मानवी शरीराच्या श्रमपरिहाराचे लक्ष्य ठेवूनच निर्माण झाले असल्याने, ते मानवी शरीराचाच विचार करते, तर भारतीय संस्कृतीत सुखाच्या व्याख्येत पंचकोशीय शरीराचा विचार करण्यात आला आहे.
पहलगामच्या बैसरन खोर्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’ने (युएनएससी) तीव्र निषेध केला आहे. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणार्या, कृत्य करणार्या आणि वित्तपुरवठा करणार्यांची जबाबदारी घेण्याची मागणी परिषदेच्या सदस्यांनी केली आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेल्या 'एकात्म मानवदर्शन ' या तत्त्वाने विश्वकल्याणाचे उद्दिष्ट साधता येईल, त्यासाठी समाजात अध्यात्माचे धडे देणाऱ्या धर्मगुरूंनी समाजात आपल्या संयुक्तिक भाषेत जनतेला जागरूक करावे असे, आवाहन भाजपचे अखिल भारतीय संघटन महामंत्री व्ही. सतीश यांनी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव अंतर्गत सर्व धर्मीय अध्यात्मिक साधकांच्या संवादाचा विशेष कार्यक्रम रुईया महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून राजेंद्र पवार यांनी शुक्रवारी दि. २५ रोजी कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.
भारतीय राष्ट्रदर्शन विकसित होण्यासाठी किमान १५ ते २० हजार वर्षे लागली. त्यामुळे आपल्या संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आहेत. पाश्चात्य देशांच्या ’नेशन’ या संकल्पनेशी भारताच्या ’राष्ट्र’ या संकल्पनेची तुलनाच होऊ शकत नाही. कारण, आपल्याकडे बहुराष्ट्रवाद नाही. आपल्या संस्कृतीत एकतेचा संदेश आहे. आपण भूमीला ’माता’ मानतो. त्यामुळे ’नेशन’ आणि ’राष्ट्र’ या भिन्न संकल्पना आहेत,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल यांनी केले. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल रोजीदरम्यान आयोजित
मुंबई, “गागर में सागर भरना’ अशी एक म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. अगदी तसेच कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशादर्शक मांडणी त्यांनी केली. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र आहे,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी केले. एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. त्याच ऐतिहासिक स्थळी त्याच
राज्यभरात येत्या २२ ते २५ एप्रिल दरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय 'एकात्म मानवदर्शन' हिरक महोत्सव राबवण्यात येणार आहे. या महोत्सवात विविध उपक्रम राबवण्यात येणार असून शासनाच्या सर्व विभागांनी तसेच जिल्हास्तरावर हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा, असे निर्देश कौशल्य विकास, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बुधवार, १६ एप्रिल रोजी दिले.
Drones now human companion रोबोटिक्स या क्षेत्राचा विस्तार आणि विकास सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याच्याच मदतीने अनेक नवीन ड्रोनही विकसित होत आहेत. त्यांचा वापर कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये केला जात आहे. यावरून अनेक मतमतांतरे असली, तरीही ड्रोन आता मानवी जीवनात त्याचा सहकारी मित्र म्हणून येऊ पाहत आहे...
Kerala Firm Viral Video : एका खाजगी कंपनीतील बॅासने कर्मचाऱ्यांसोबत अमानुष वागणूक केल्याचा संतापजनक प्रकार केरळमधून समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधलेल्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्यांप्रमाणे रांगायला लावल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून संबंधित बॉसवर कडक कारवाईची मागणी होत आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. अशातच आता हा कथित व्हिडिओ हा ब
म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने केवळ बँकॉकच नव्हे, तर संपूर्ण जग हादरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर झालेली नासधूस ही मनाला चटका लावून जाणारी होती. इमारती कोसळल्या, रस्ते उद्ध्वस्त झाले, हजारो लोक मृत्यू पावले. ज्या भारताकडे एकेकाळी जग दुर्लक्ष करत होते, तोच भारत आज म्यानमारच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भारताने म्यानमारच्या मदतीसाठी ‘ऑपरेशन ब्रह्म’ सुरू केले आहे. ‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत भारतीय लष्कराची एकूण पाच विमाने तैनात करण्यात आली आहेत. हवाई दलच नव्हे, तर
भाषा म्हटले की, हल्ली अवतीभोवतीचे अनेक वाद आपल्याला आठवतात. भाषा म्हणजे संस्कृतीची वाहक आहे, भाषा ही माणसाची अस्मिता आहे. भाषा म्हणजे अनेक प्रश्न आणि भाषा म्हणजे, अनेक प्रश्नांची उत्तरेसुद्धा. थोडक्यात काय, तर भाषा हा तुमच्या माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग. परंतु, भाषा जीवनाचा अविभाज्य भाग कधीपासून झाला, याचा आपण कधी विचार केला आहे का? अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’मध्ये, या संदर्भात एक महत्त्वाचे संशोधन सुरू होते. या संशोधनामधून अनेक नवीन गोष्टी पुढे येत आहेत. या विद्यापीठातील एका प्रबं
बांगलादेशात शेख हसीना यांना पंतप्रधान पदावरून हटवल्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. त्यानंतर कट्टरपंथींचा उन्माद मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसला. हिंदू अल्पसंख्याक आणि विशेषतः हसीना समर्थक तसेच, अवामी लिगच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यास कट्टरपंथींनी सुरुवात केली. एखाद्या हॉलीवूड किंवा दाक्षिणात्य चित्रपटाची कथा चोरून आपला नवीन चित्रपट तयार करायचा, ही ‘टेक्निक’ तशी चित्रपटसृष्टीत जुनीच. अशाच पद्धतीने बांगलादेशातील स्टोरी एकाअर्थी चोरण्याचा प्रकार सीरियातही झाल्याचे दिसते.
मानवी स्थलांतर ही खरं तर मानवी उत्क्रांतीपासूनचीच निरंतर सुरु असलेली प्रक्रिया. अशा स्थलांतरातून नवीन प्रदेशात प्रत्येक धार्मिक समुदायाची तेथील स्थानिक समाजांशी जुळवून घेण्याची प्रक्रियाही वेगवेगळी असते. काही गट नव्या देशांत गेल्यावरही आपली वेगळी ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोकसंख्येच्या बळावर स्थानिक संस्कृतीत मोठे बदल घडवण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. मात्र, हिंदू समाजाचा दृष्टिकोन प्रारंभीपासूनच यापेक्षा पूर्णतः वेगळा राहिला आहे. हिंदू जिथे जातो, तेथील स्थानिक संस्कृतीशी तो समरस होतो, त्या
आपल्या पुराणांमध्ये सांगितले आहेच की, परोपकार हे पुण्याचे, तर इतरांना पीडा देणे हे पापाला आमंत्रित करते. पण, दुर्दैवाने परोपकाराची भावना हळूहळू समाजातून लोप पावताना दिसते. ‘मी आणि माझे’ यापलीकडे विचार करणारी समाजशील व्यक्तिमत्त्वेही विरळाच. म्हणूनच आजच्या या व्यक्तिकेंद्रित युगातील परोपकाराची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून महती अधोरेखित करणारा हा लेख...
Rohingya ह्यूमन राईट्स इनिशिएटीव्ह नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून निर्वासितांसाठी सुविधांसाठी मागणी केली. दिल्लीमध्ये अवैधपणे राहणाऱ्या रोहिंग्यांना शाळा आणि रुग्णालयामध्ये प्रवेश देण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला द्यावेत, असे एनजीओने याचिकेमध्ये म्हटले आहे. याचपार्श्वभूमीवर सोमवारी १० फेब्रुवारीला न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी केली.
नांदेड : मानवी मूत्रापासून ऊर्जा निर्मिती करण्याच्या संशोधनाला अमेरिकन पेटंट ( Research Got US Patent ) मिळाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्रा. डॉ. राजाराम सखाराम माने व डॉ. झोयेक शेख यांच्या टीमने हा शोध लावला. मानवी मूत्रामध्ये असलेला कार्बन हा ऊर्जानिर्मितीसाठी उपयुक्त ठरु शकतो हे त्यांनी या संशोधनातून सिद्ध केले. मानवी मूत्राचा वापर करून कार्बन पदार्थाची निर्मिती केली जाणार आहे आणि या पदार्थाचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. मानेंनी कोरियाच्या हॅनयांग विद्यापीठात पोस
कृत्रिम बुद्धिमत्ता ( Artificial Intelligence ) मानवी बुद्धिमत्तेशी स्पर्धा करू शकत नाही, या मतावर सुरुवातीच्या काळात अनेकजण ठाम होते. पण, कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ने अल्पावधीतच अनेकांना त्यांचे हे मत बदलायला लावले. ‘एआय’ अस्तित्वात आल्यानंतर, एकामागोमाग एक अशा अनेक क्षेत्रांमध्ये माणसांची जागा घ्यायला सुरुवात केली. इतके सगळे होत असतानाही साहित्यक्षेत्रात ‘एआय’ शिरकाव करू शकणार नाही, असे काहींना वाटत होतेच. कारण, साहित्यात बुद्धिमत्तेची जितकी गरज असते, तितकीच भावनिकतेची असते. साहित्य म्हणजे बुद्धि
(HMPV) चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसप्रमाणे ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसने थैमान घातले आहे. चीनमधील एचएमपीव्ही (HMPV) या विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे अन्य देशांसह भारतातही चिंता वाढली आहे. अशातच या विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आता भारतामध्येही आढळून आला आहे. या माहितीनंतर देशपातळीसह राज्यपातळीवरील आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत.
V Ramasubramaniam सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही रामसुब्रमण्यम (V Ramasubramanian) यांची सोमवारी २३ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC चे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे प्रमुख म्हणून रोहिंटन नरिमन यांची नियुक्ती न झाल्याने काँग्रेसनेही आपली नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणाचे पत्र आता समोर आले आहे.
मुंबई : एस.एन.डी.टी. ( SNDT ) महिला विद्यापीठाच्या मानवी विकास विभागाने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' (एनईपी-२०२०) अंतर्गत पूर्वप्राथमिक बालकांचा सर्वांगीण विकास’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद १९ व २० डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे.
(Kurla Bus Accident) कुर्ला भागात झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातात सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अशातच माणुसकीला कलंकित करणारी घटना घडली आहे. या अपघातात मृत पावलेल्या फातिमा कनिस अन्सारी या ५५ वर्षीय महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने एका अज्ञात व्यक्ती काढत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच, फातिमा यांच्या कुटुंबियांनीदेखील त्यांच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याचा आरोप केल्यानंतर कुर्ला पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.
आयुर्वेदाच्या तज्ज्ञ आयुर्वेद चिकित्सक, नि:स्वार्थी सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुपरिचित असलेल्या डॉ. मधुरा कुलकर्णी यांच्या विचारकार्याचा संक्षिप्त मागोवा घेणारा हा लेख. प्रसारासाठी...
रियाध : सौदी अरेबियामध्ये ( Saudi Arebia ) यावर्षी १०० पेक्षा अधिक परदेशी लोकांना फाशी देण्यात आली आहे. वृत्तसंस्थेने मानवाधिकार संघटनेच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. हा आकडा गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. शनिवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी एका येमेनी नागरिकाला अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली दक्षिण-पश्चिमी भागात नजरानमध्ये फाशी देण्यात आली. यानंतर, यावर्षी फाशीची शिक्षा सुनावलेल्या परदेशींची संख्या १०१ झाली आहे. सौदी अरेबियाने २०२२ आणि २०२३ मध्ये ३४ परदेशी नागरिकांना फाशीची शिक्षा सुन
पैशापेक्षा माणुसकी जपणे महत्त्वाचे असल्याचे बाळकडू उमाकांत श्रीकृष्ण चौधरी ( Umakant Chaudhari ) यांना आपल्या कुटुंबातूनच मिळाले होते. जीवनात अनेक चढउतार आले असतानाही त्यांनी पैशापेक्षा माणुसकी जपत संकटांना तोंड दिले. अशा परिस्थितीत ही त्यांनी चेहर्यावरील हसू कधी ढळू दिले नाही. त्यांच्या जीवनावर टाकलेला हा प्रकाश...
न्यूयॉर्क : ( Hamas ) हमासला नेस्तनाबूत करण्यासाठी इस्रायलने वर्षभरापूर्वी गाझा पट्टीवर हल्ले चढविले होते. आता जवळपास ८० टक्के गाझापट्टीतील इमारती विदीर्ण अवस्थेत आहेत. हमासचे दहशतवादी या हल्ल्यांचे लक्ष्य असताना गाझातील ७० टक्के महिला आणि मुले या युद्धात ठार झाल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे.
हिंसा हा माणसाचा मूळ स्वभाव? | Psychology of Violence | Dr. Nandu Mulmule | MahaMTB Gappa मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा...
बहराइच येथील झालेल्या हिंसाचारात आरोपींच्या घरावर बुलडोझरच्या कारवाई होत आहेत. हे प्रकरण आता मानवाधिकार आयोगाकडे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात आता अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वकील डॉ. गजेंद्र सिंह यादव यांनी आयोगात याचिका दाखल करून आरोपींच्या घरावर बुलडोजर चालवण्यास बंदीची मागणी केली आहे. असे कृत्य केल्यास मानवी हक्कांचे उल्लंघन असेल असे ते म्हणाले आहेत.
बदलापूर येथील एका शाळेत झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाने घेतली आहे. आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना नोटीस बजावून दोन आठवड्यात अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत पवई येथे करण्यात आलेली अतिक्रमण निर्मूलन कारवाई ही कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच करण्यात येत होती. या हल्ल्यात जखमी महानगरपालिका कर्मचारी तसेच पोलीस कर्मचा-यांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांसह प्रत्यक्ष ठिकाणास भेट देवून आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या कारवाईदरम्यान महानगरपालिका कर्मचा-यांवर झालेला हल्ला कदापि सहन केला जाणार नाही. महानगरपालिका प्रशासन कर्मचा-यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी कर्मचा-या
मणिपूरमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. दरम्यान, युरोपियन युनियनने (EU) मणिपूरच्या लोकांच्या मदतीसाठी अडीच लाख युरो देण्याची घोषणा केली होती, मात्र मणिपूर सरकारने ती फेटाळली आहे. ईयू ने पाठवलेली २.५ लाख युरोची रक्कम भारतीय चलनात सुमारे २.२५ कोटी रुपयांच्या बरोबर आहे.
आफ्रिका खंडातील नायजेरिया या देशामध्ये मानवी शरीराचे कापलेले अवयव ठेवल्याप्रकरणी एका मौलानाला अटक करण्यात आली आहे. ओलुवाफेमी इद्रिस असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत सॅम्युअल कुतेलू आणि बाबातुंडे कयोडे या नावाचे दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. या तीन आरोपींकडून पोलिसांनी मानवी हात, ३ हृदय आणि किडनी, प्रत्येकी १ मणका आणि जीभ जप्त केली आहे.
आपल्या मनाला सुसाट विचार करण्यापासून रोखणे अशक्य आहे, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणून, विचार आणि भावना दूर ढकलल्याने त्यांचे व्यवस्थापन करणे कठीण होईल. त्याऐवजी स्वयंशिस्त सुधारण्याचा सर्वोत्तममार्ग म्हणजे प्रतिरोधक विचार आणि भावना व्यवस्थित लक्षात घेणे, स्वीकारणे आणि त्यापासून दूर जाणे, जेणेकरून आपण पुढे जाऊ शकू आणि जे काही आपल्याला करायचे आहे, ते पूर्ण करू शकू.
भारतीय राज्यघटनेचे भाष्यकार, थोर मानवतावादी आणि भारतीय न्यायव्यवस्थेच्या सद्सद्विवेकबुद्धीचा संरक्षक अशा फली नरिमन यांचे नवी दिल्ली येथे नुकतेच वयाच्या ९५व्या वर्षी दुःखद निधन झाले. न्यायालयीन निकालाच्या प्रक्रियेत मैलाचे दगड ठरावेत, अशा प्रकरणात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. आपल्या नैतिक अधिकाराने त्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेला योग्य ते वळण दिले, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. त्यांना अतिशय सफल आणि समृद्ध असे दीर्घायुष्य लाभले. म्हणूनच त्यांना झोपेतच शांतपणे मृत्यू यावा, हा काव्यगत न्यायच म्हणाव