पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे देशवासीयांच्या मनात दुखः आणि क्रोध आहे. जसा द्वेष आणि शत्रुता हा आपला स्वभाव नाही, तसा मार खाणे हादेखील आपला स्वभाव नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून दमदार उत्तराची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण केली जाईल,” असा विश्वास वाटतो, असे स्पष्ट मत सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केले.विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते मंगेशकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
Read More
भारतीय संगीतक्षेत्रात स्वताची वेगळी ओळख निर्माण करत, आपल्या कार्यतून भारतीय संगीत शास्त्रावर ठसा उमटवणाऱ्या पद्मश्री ह्रदयनाथ मंगेशकर यांना प्रतिष्ठेचा 'उत्तम वाग्गेयकर पुरस्कार' दि.९ मार्च रोजी प्रदान करण्यात आला.आचार्य जियालाल वसंत संगीत निकेतनच्यावतीने अजीवासन हॉल जुहू येथे आयोजित वसंतोत्सव २०२५ या कार्यक्रमात त्यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते. त्याच बरोबर ख्यत्नाम गायक सुरेश वाडकर, प्रेम वसंत, पद्मा वाडकर, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचा भाग म्हणून 'शिवचरित्र - एक सोनेरी पान' या गीताच्या लोकार्पण प्रसंगी, पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी आपली बहीण भारतरत्न लता मंगेशकर यांच्या विषयीच्या आपल्या गहिऱ्या पोकळीचा अनुभव व्यक्त केला. ‘हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले’ या पंक्तींप्रमाणे होणारी अवस्था आज आपल्या हृदयाची आहे अशी भावना मंचावर व्यक्त केली. तसेच लतादीदींची आठवण सतत हृदयात व्यापून असते असेही सांगितले.
नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत असताना त्यांची एक आठवणही सांगितली.
स्वर्गीय स्मिता पाटील पुरस्कार २०१९ वितरण सोहळा संपन्न