(Miscreants Set Minor Girl Student On Fire In Odisha's Puri)ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातून शनिवारी एका १५ वर्षीय मुलीला काही हल्लेखोरांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पीडितेला गंभीर अवस्थेत एम्स भुवनेश्वरमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
Read More
भारत आपल्या देशांतर्गत जहाजबांधणी क्षमता वाढवण्यासाठी मोठी पावले उचलत आहे. भारताकडे असलेल्या विशाल किनारपट्टीवर आठ मेगा क्लस्टर विकसित करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. यापैकी पाच पूर्णपणे नवीन ग्रीनफील्ड प्रकल्प असतील, तर तीन प्रकल्पांमध्ये विद्यमान सुविधांचा विस्तार समाविष्ट असेल, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ओडिशा येथे पार पडणाऱ्या महाप्रभु रथयात्रेच्या शुभ मुहूर्तावर लाखो भाविक पुरी येथे पोहोचले आहेत. अशातच, ख्यातनाम सँड आर्टीस्ट, पद्मश्री सुदर्शन पटनायक यांच्या आगळ्या वेगळ्या कलाकृतीने सगळ्यांचेच लक्ष्य वेधून घेतले आहे. पुरी येथील समुदकिनाऱ्यावर सुदर्शन पटनायक यांनी महाप्रभु जगन्नाथांच्या १०१ मूर्तींसह एका अत्यंत देखण्या वाळूशिल्पाची निर्मिती केली आहे. त्यांची ही कलाकृती आता सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली आणि त्यांची पत्नी अर्पिता गांगुली यांचा ओडिशामध्ये अपघात झाला. पुरीजवळील समुद्रात त्यांची स्पीडबोट उलटली, स्पीडबोटवर ४ पर्यटक होते. त्यापैकी सौरव गांगुलीचा भाऊ आणि मेहुणी होते. ’कोलकाता परतल्यानंतर मी पुरीचे एसपी आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीन’ अर्पिता गांगुलीने प्रतिक्रिया व्यक्त केली.
केंद्र सरकारने सुरू केलेला नक्षलवादाच्या विरोधातील लढ्याला आता यश मिळत असल्याचे बघायला मिळते आहे. २१ जानेवारी रोजी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्यामध्ये झालेल्या चकमकीच एकूण १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. नक्षलवादी गटाचा म्होरक्या चलापथी याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दल यशस्वी झाले आहे. चलापथी हा श्रीकालुलम-कोरापुट विभागातील दहशतवादी गटाचा नेता होता. चलापथी याच्यावर पोलिसांनी १ कोटी रूपयांचा इनाम जाहीर केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशामध्ये १८ व्या प्रवासी भारतीय दिवस (पीबीडी) निमित्त होणाऱ्या विशेष सोहळ्याचे उद्घाटन केले. प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी बुधवार दिनांक ८ जानेवारी रोजी ओडीशा येथे दाखल झाले. विमानतळावर दाखल होताच मोदी यांचे स्वागत ओडिशाचे राज्यपाल हरी बाबू कंभमपती, मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. प्रवासी भारतीय दिवस केंद्र सरकारकडून ओडिशा राज्य सरकारच्या सहकार्याने ८ ते १० जानेवारी दरम्या
SCB College Odisha Rape ओडिशातील कटक येथील एसबीसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात दोन रूग्णांवर डॉक्टरांनी बलात्कार केला असल्याची माहिती उघडकीस आली आहे. तपासणीसाठी आलेल्या रूग्णांवर वरिष्ठ डॉक्टरांनी बलात्कार केला. ही घटना ११ ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणी कटकच्या मंगलबाग पोलिसांनी वरिष्ठ डॉक्टरांना अटक केली. यावेळी रूग्णांच्या कुटुंबियांनी डॉक्टरला बेदम मारहाण केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे बलात्कार झालेल्या पीडित महिला रूग्णाचे नातेवाईक त्याच महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दिलबाग सिंह ठाकूर असे आरोपी
राज्य सरकार सेवेतील दीड लाख रिक्त पदे लवकरच भरणार आहे, असे प्रतिपादन ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांनी केले आहे. ओडिशा सरकार शासकीय सेवेतील १.५ लाख रिक्त पदे निष्पक्ष आणि पारदर्शक पध्दतीने भरणार असून पुढील दोन वर्षांत ६५ हजार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, असे राज्यपाल दास यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात आषाढात जशी पंढरपूरची वारी असते, आश्विन महिन्यात बंगालमध्ये जसा दुर्गा उत्सव असतो, तसाच आषाढ शुक्ल द्वितीयेपासून दशमीपर्यंत ओडिशात जगन्नाथाचा रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. या रथोत्सवासाठी संपूर्ण भारतातून तसेच परदेशांतूनही लाखो भाविक जगन्नाथपुरी येथे दाखल होतात. यावर्षीही आज दि. ७ व उद्या ८ जुलै रोजी जगन्नाथपुरी येथे ही जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांची रथयात्रा संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने...
ओडिसा विधानसभेत दि. १८ जून रोजी लोकशाहीचा उत्सव साजरा होताना दिसला. बीजेडी नेता आणि माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांना हरवणाऱ्या भाजपच्या लक्ष्मण बाग यांची फक्त भेट न घेता त्यांना शुभेच्छा दिल्या. नवीन पटनायक म्हणाले, अच्छा! तर तुम्ही मला हरवले? दरम्यान नवीन पटनायक हे कांटाबांजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
ओडिशात दणदणीत विजय मिळवून पहिल्यांदाच सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पहिल्या दिवसापासूनच जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. बुधवार, दि. १२ जून २०२४ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर, मोहन शरण माझी यांनी आज जगन्नाथ पुरीचे चारही दरवाजे उघडण्याची घोषणा केली आहे.
मोहन चरण माझी हे ओडिशाचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. बैठकीत माझी यांची ओडिशातील भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा निर्णय जाहीर केला.
बिजू जनता दलाचे नेते आणि माजी प्रशासकीय अधिकारी व्ही. के. पांडियन यांनी राजकारणाला सोडचिठ्ठी दिली. ओडिशा माझ्या हृदयात आणि नवीन पटनायक माझ्या श्वासात असल्याचे सांगत, त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूत जन्मलेले पांडियन उच्चशिक्षित.
केंद्रातील भाजपप्रणीत रालोआ सरकारने गेल्या दहा वर्षांत जे लक्षणीय काम केले, त्याचाच भाग म्हणून देशभरातून रालोआला मतदान झाले. प्रस्थापितांविरोधात मतदान होण्याची शक्यता असताना, प्रस्थापितांच्या बाजूने एवढ्या मोठ्या संख्येने झालेले मतदान हे लक्षणीय असेच. हा जगन्नाथाचा रथ आहे, हे ओडिशातील निकालांनी अधोरेखित केले आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ ची निवडणुकीची अर्धी मतमोजणी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यातचं आंध्र प्रदेश आणि ओडिसा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुद्धा होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजप्रणित एनडीए आणि काँग्रेसप्रणित इंडी आघाडीमध्ये चुरशीची लढत होत आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार, एनडीए ३०० चा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. तर इंडी आघाडीने आतापर्यंत २२९ जागांवर आघाडी मिळवली आहे. लोकसभा निवडणूक २०२४
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची प्रकृति अचानक ढासळण्यामागे षडयंत्र असून याचा तपास होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या ७व्या टप्प्यात पंतप्रधानांनी ओडिशातील मयूरभंज, बालासोर व केंद्रपारा येथे जाहीर सभांना संबोधित करताना ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांचे संवर्धन करणारे देशातील पहिले ‘म्युझियम ऑफ जस्टीस’ हे संग्रहालय ओडिशा राज्यातील न्यायव्यवस्थेच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगताना, देशातील न्यायव्यवस्थेचा इतिहास नकळतपणे डोळ्यासमोर उभे करते. न्याय प्रकियेचा सखोल अभ्यास करणार्या, न्यायमूर्तींच्या दूरदृष्टीतून भविष्यातील पिढीसमोर आदर्शवत अशा ओडिशातील कटक येथील ‘म्युझियम ऑफ जस्टीस’ या संग्रहालयाविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया.
मागील नऊ वर्षांत भारतातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राने २.८ कोटींहून अधिक मच्छीमार आणि मत्स्यपालकांना उपजीविका आणि उद्योजकतेची संधी प्रदान केल्याचे केंद्र सरकारच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. मागील पाच वर्षांत मत्स्यव्यवसायाचा वार्षिक वृद्धी दरदेखील सात टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर गोड्या पाण्यातील मत्स्यपालन योजना आखणारी केंद्रीय संस्था म्हणजे ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर अॅक्वाकल्चर’ (सिफा). ओडिशाच्या दौर्यात या संस्थेचे मत्स्यपालनसंबंधी कार्य जवळून अनुभवता आले. त्याचाच या लेखात घेतलेला ह
केंद्र सरकारच्या ’विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमाअंतर्गत ओडिशाच्या अभ्यासदौर्यात कटक येथील ’केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था’, ‘राष्ट्रीय भात संशोधन केंद्र’ (एनआरआरआय)ला भेट दिली. भारतातील तांदूळ उत्पादन वाढविण्यासोबतच तांदळाचे नवीन आणि दर्जेदार वाणनिर्मितीसाठी या संस्थेत विविध पातळीवर संशोधन सुरू आहे. त्यानिमित्ताने या संस्थेच्या कार्याचा घेतलेला आढावा...
भगवान जगन्नाथ धाम पुरीमध्ये हेरिटेज कॉरिडॉर अंतर्गत पहिल्या टप्प्यात ८०० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या परिक्रमा मार्गाचे उद्घाटन आज दि. १७ जानेवारी रोजी होणार आहे. पुरीचे गजपती महाराज दिव्यसिंग देब हे या विधीचे मुख्य यजमान आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपूर्ण ओडिशामधून भाविकांना सरकारी खर्चाने आणले जाणार आहे, अशी माहिती मंदिर व्यवस्थापनाने दिली.
झारखंडचे काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरू होती. यामध्ये ओडिशातून सर्वाधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय सापडलेली बहुतांश रोकड संबलपूर, तितलागड या भागातूनही जप्त करण्यात आली. आता या संपूर्ण प्रकरणावर आयकर विभागाचा अहवाल समोर आला आहे. यात आयकर विभागाने सांगितले की, जप्त केलेल्या 351 कोटी रुपयांपैकी, 329 कोटी रुपये ओडिशातील छोट्या शहरांमधील मोडकळीस आलेल्या इमारतींमधून जप्त करण्यात आले आहेत. हे पैसे लपविलेल्या चेंबर्समध्ये आणि घरांमध्ये, ओडिशाच्या बोलं
देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसह राज्याचे सचिवही उपस्थित होते.
ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) शुक्रवारी (१५ डिसेंबर २०२३) सय्यद इशान बुखारी या काश्मीरमधील वॉन्टेड गुन्हेगाराला जाजपूर येथून अटक केली. पोलिसांनी बुखारी कडून अनेक संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. पंतप्रधान कार्यालयातील डॉक्टर असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीचे पाकिस्तानशिवाय देशातील अनेक अतिरेकी संघटनांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. ईशान बुखारीने अनेक मुलींना लग्नाचे आमिष दाखवून फसवल्याची माहितीही समोर आली आहे.
काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या रांची येथील निवासस्थानावर आयकर विभागाची छापेमारी शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच होती. धीरज साहू यांच्याशी संबंधित ओडिशा आणि झारखंडमधील अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. विविध ठिकाणी सुरू असलेल्या छाप्यांमध्ये जप्त केलेली रोकड, दागिने आणि इतर मालमत्तेच्या कागदपत्रांबाबत विभागाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ठिकाणांहून 300 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे, जी मोजण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज (रविवारी) बिहार मधील पाटणा येथे २६ वी पूर्व विभागीय परिषदेची बैठक होणार आहे. या पूर्व विभागीय परिषदेमध्ये बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे स्वीय सचिव म्हणून दीर्घकाळ कार्यरत असणारे भारतीय प्रशासकीय सेवेतील (भाप्रसे) निवृत्त अधिकारी व्ही. के. पंडियन हे आता नवीनबाबूंचे उत्तराधिकारी होण्यास सज्ज झाल्याची चर्चा आहे.ओडिशामध्ये आपला एकछत्री अंमल दीर्घकाळपासून कायम ठेवणारे बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आपल्या राजकीय उत्तराधिकाऱ्याचा प्रश्न सोडविल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचे कारण म्हणजे निवृत्त भाप्रसे अधिकारी व्ही. के. पंडियन यांनी सोमवारी मुख्यमंत्री पटनायक य
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून सशस्त्र क्रांतीचे जे प्रयत्न झाले, ते केवळ शहरी भागापुरते मर्यादित नव्हते. दुर्गम भागात राहणार्या वनवासी बांधवांचे याबाबत असलेले योगदान अतिशय मोठे. पण, दुर्दैवाने अज्ञात राहिलेले आहे. जेव्हा-जेव्हा त्यांच्यावर अन्याय झाला, तेव्हा-तेव्हा वनवासी बांधवांनी इंग्रजांचा कडवा प्रतिकार केला. अशा घटना 1857च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या आधीपासून घडत आलेल्या आहेत. गुजराथ, मध्य प्रदेश, केरळ, आंध्र, आसाम, मेघालय, नागालॅण्ड, ओडिशा आणि महाराष्ट्र अशा अनेक राज्यांत अनेक वनवासी क्रांतिका
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मयूरभंज या गावातून पहिल्यांदाच एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. या वनवासीबहुल जिल्ह्याला डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार काम करत होते. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर आता ओडिशाचा मयूरभंज जिल्हा थेट कोलकाता तसेच टाटानगर आणि राउरकेलाशी जोडला जाईल. त्यासाठी चार गाड्यांना मान्यता देण्यात आली आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबई आणि नागपूरसह देशातील सहा मोठ्या शहरांमध्ये शाळेच्या निविदांमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी छापे टाकले. निविदेसाठी (लाचखोरी प्रकरण) मोठी लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या छाप्यात खासगी कंपनीच्या मालकासह सात जणांना अटक करण्यात आली.
ओडिशा सरकारने राज्यातील स्टेनलेस स्टील उद्योगाला चालना देण्यासाठी महत्त्वाकांक्षी विशेष अनुदान योजना जाहीर केली आहे. ग्लोबल स्टेनलेस स्टील एक्स्पो २०२३ च्या उद्घाटनादरम्यान ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली,ज्यामुळे ओडिशाची जगासाठी 'स्टेनलेस स्टील डेस्टिनेशन' बनण्याची वचनबद्धता आणखी मजबूत झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने १६ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या १००% निधीसह सुमारे ३२,५०० कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चासह रेल्वे मंत्रालयाच्या सात प्रकल्पांना मंजुरी दिली. या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांचे प्रस्ताव ऑपरेशन सुलभ करतील आणि गर्दी कमी करतील, ज्यामुळे भारतीय रेल्वेच्या सर्वात व्यस्त विभागांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास शक्य होईल.
खाजगी वृत्तवाहिनी ओडिशा टीव्हीने 'लिसा' नावाची एआय-जनरेट केलेली न्यूज अँकर लाँच केली. ओडिशाच्या हातमागाची साडी घातलेली एक कृत्रिम महिला OTV नेटवर्कच्या टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी ओडिया आणि इंग्रजी दोन्ही भाषेत बातम्या सादर करेल, असे कंपनीच्या प्रकाशनात म्हटले आहे. तशा पध्दतीचा व्हिडीओ कंपनीकडून प्रसारित करण्यात आला आहे. "तथापि, त्यावर काम करत असून तिला इतरांशी सहज संवाद साधता येईल अशा स्तरावर प्रशिक्षित करण्याचे आमचे प्रयत्न सुरु असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात राहून त्यांच्या इशार्यावरुन भारतातील काहीजणांना पैसे पुरविल्याच्या आरोपाखाली ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने पुण्यामधून सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. भुवनेश्वर न्यायालयाने बजावलेल्या अजामिनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करीत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
गंजम जिल्ह्यात मध्यरात्री दोन बसेसची समोरासमोर टक्कर झाल्याने बारा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, ८ प्रवासी जखमी आहेत. हा अपघात गंजम जिल्ह्यातील दिगपहांदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. ओडिशा राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या (OSRTC) आणि एका खासगी बसमध्ये हा अपघात झाला. जखमींना तात्काळ एमकेसीजी मेडिकल कॉलेजात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
पुणे : हरे राम हरे कृष्णा...जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा... चा अखंड जयघोष, वरुणराजाची संततधार आणि भाविकांचा मोठा उत्साह अशा भक्तीमय वातावरणात पुण्यामध्ये जगन्नाथ रथयात्रा सोहळा जल्लोषात साजरा झाला. ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजित रथयात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ओडिशातील भवानीपटना येथे भाजपच्या महाजनसंपर्क अभियानात जनसमुदायाला संबोधित करताना विरोधी पक्षावर जोरदार टीका केली आहे. नड्डा म्हणाले की, हिंदूंची न्याय-ह्क्कांची गोष्ट करणारे उद्धव ठाकरे विरोध पक्षांसह पाटनामध्ये दाखल झालेत. त्यामुळे हिंदूहद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, जर काँग्रेससोबत हातमिळवणी करायला लागली तर मी माझे दुकान कायमचे बंद करेन. पण आता उद्धव ठाकरेंच्या विरोधी पक्षांशी केलेल्या हातमिळवणी मुळे कोणी दुसऱ्यांने नाही तर उद्धव ठाकरेंनीच दुकान बं
पुरी रथयात्रेदरम्यान प्रशासकीय पातळीवर काही कमतरता असल्याचे दिसून येत असल्यास ती भरून काढण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ८ प्रकारची सेवाकार्य आपल्या हाती घेतली आहेत. यावर्षी या सेवाकार्यात पूर्ण गणवेशातील तब्बल १,१०० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला असून ते अविरतपणे कार्य करत आहेत.
औरंगाबादमध्ये संदलच्या मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन एक व्यक्ती नाचत असल्याचं समोर आले. या प्रकारावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी औरंगजेबाचे फोटो दाखवल्यानंतर पुण्यात दंगल करण्याचं कारण काय? असा सवाल करतानाच फोटो दाखवला तर काय परिणाम होतो? असा सवाल केला आहे.
नवी दिल्ली : ओदिशामधील बालासोर येथे अपघाताच्या ५१ तासांनी रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अपघातानंतर राजकारण बाजूला ठेवून मदतकार्यास सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याचप्रमाणे अपघातानंतर राजीनामा देण्यापेक्षाही घटनास्थळी थांबून परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन मार्ग काढणे आवश्यक असल्याचा वस्तुपाठ देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवून दिला आहे.
ओडिशातील बालासोरमधील भीषण रेल्वे अपघाताने देश हळहळला. या अपघातात २७५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला, तर जवळपास ९०० हून अधिक जण जखमी झाले. सध्या याठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर आली असून त्यामागे ‘एनडीआरएफ’च्या जवानांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा वाटा आहे. या रेल्वे अपघाताची माहिती मिळताच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दिल्लीहून घटनास्थळी पोहोचले. दुसर्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीही घटनास्थळी पोहोचले.
"महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) यांच्यात पुण्यात ३ जून रोजी करार झाला आहे. या कराराच्या माध्यमातून बजाज फिनसर्व्ह पुण्यात जवळपास ५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. यातून ४० हजार रोजगार तयार होणार आहेत. नजीकच्या काळातील महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे." अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नवी दिल्ली : ओदिशामधील बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघाताची सखोल चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बालासोर येथे दिले आहे. ओदिशामधील बालासोर येथे शुक्रवारी सायंकाळी बंगळुरू – हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस, शालीमार चेन्नई – कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्या विचित्र अपघातामध्ये आतापर्यंत २५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत, तर ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची तीव्रता अतिशय गंभीर असून त्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे
शिव मंदिरात भांग बंद करण्याचा निर्णय ओडिशा सरकारने २३ मे रोजी घेतला आहे. त्यानुसार ओडिशातील सर्व शिव मंदिरात यापुढे भांग सेवन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित बाबा बलिया यांनी गांजावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर ओडिशा सरकारने हे आदेश दिले आहेत.
'मोचा' चक्रिवादळ हे १६० किमी प्रतितास आणि १८० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील अतितीव्र ‘मोचा’ चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारकडे झेपावत आहे. त्याच्या प्रभावाखाली आज पश्चिम बंगाल,ओडीशा, बांग्लादेश, आणि म्यानमारच्या किनाऱ्यावर अतिवृष्टी अपेक्षित आहे. भारतात त्रिपूरा , मिझोराम, नागालँड, अरूणाचल प्रदेश, आसाममध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच महाराष्ट्रात उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात उष्माघाताने ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी दि.११ एप्रिल रोजी ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील झामू यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी पुजेदरम्यान सुमारे १० मीटर जळत्या कोळश्यावर ते अनवाणी धावले. त्याचा २४ सेकंदांचा व्हिडिओ त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.व्हिडिओमध्ये अंगारावर धावताना त्याच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे. त्याला पाहून गावकरीही खूश दिसत आहेत.
‘दृष्टि स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र’ ही संस्था महिलांसंबंधित समस्यांवर सखोल अभ्यास करते. अभ्यासगट, परिसंवाद, संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण शिबीर, सर्वेक्षण या विविध माध्यमांतून संस्था आपली वाटचाल करत आहे. त्यानिमित्ताने संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा मागोवा...
इंटरपोल ही युनायटेड नेशन्सनंतर जागतिक दृष्ट्या महत्वाची संघटना मानली जाते. यंदा ९० व्या इंटरपोलच्या आमसभेचा लोगो कोणार्क सूर्य मंदिराच्या रथाच्या चाकाने प्रेरित आहे. तब्बल २५ वर्षांनंतर इंटरपोलच्या आमसभेचे आयोजन करण्याची संधी भारताला मिळालेली आहे. पुढील महिन्यात ही सभा होणार असून १९५ देशांतील कायदा आणि अंमलबजावणी अधिकारी या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) नुकतेच या लोगोचे अनावरण केले.
ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील सिमिलीपाल नॅशनल पार्कमध्ये काळ्या (मेलेनिस्टिक) वाघाचे दर्शन झाले आहे. या दुर्मिळ काळ्या वाघाने झाडावर ओरखडे काढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय वन सेवा अधिकारी सुसंता नंदा यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त शेअर केलेल्या १५ सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये, दुर्मिळ 'मेलेनिस्टिक' वाघ एका झाडावर ओरखडे काढताना दिसून आला आहे.
एकेकाळी लिपिक म्हणून काम केलेल्या ओडिशातील मयुरभंज या छोट्या गावात राहाणार्या वनवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांचा आता राष्ट्रपती भवनाच्या दिशेने होणारा आत्मविश्वासपूर्ण प्रवास थक्क करणारा आहे. आज त्यांच्या मुंबई दौर्यानिमित्त हा विशेष लेख...
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे आवाहन ओडिशाच्या विधानसभेच्या सर्व सदस्यांना केले आहे. याबाबत दि. २२ जून रोजी नवीन पटनायक यांनी ट्वीट केले. आणि ओडिशा राज्य विधानसभेच्या आमदारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले.