महारेराने घर खरेदीदारांच्या तक्रारी लवकरात लवकर सोडविण्यासाठी गठीत केलेल्या सलोखा मंचांनी राज्यातील १७४९ घर खरेदीदारांच्या तक्रारी यशस्वीपणे निकाली काढल्या आहेत. महारेराकडे नोंदवलेल्या तक्रारीची ज्येष्ठता आणि हक्क अबाधित राहत असल्याने तक्रारदारांचा सलोखा मंचला वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच सध्या राज्यात ५२ सलोखा मंचांकडे ५५३ प्रकरणांची सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत एकूण ५९५८ प्रकरणांपैकी १७४९ प्रकरणे निकाली निघाली आहेत.
Read More
गोदरेज प्रॉपर्टीजचे विक्री बुकिंग गेल्या आर्थिक वर्षात ८४ टक्क्यांनी वाढून विक्रमी रु. २२,५२७ कोटी झाली आहे, जी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये रु. १२,२३२ कोटी होती. गेल्या आर्थिक वर्षातील कोणत्याही सूचीबद्ध घटकाने नोंदवलेली ही सर्वाधिक विक्री आहे. पिरोजशा म्हणाले की, विशेषत: प्रतिष्ठित ब्रँड्समध्ये गृहनिर्माण क्षेत्रात मागणी मजबूत राहील.
र खरेदीदारांना भविष्यात पार्किंग संबंधित समस्यांना सामोरे जायला लागू नये यासाठी सदनिका नोंदणीच्या वेळी दिल्या जाणाऱ्या नियतवाटप पत्रात आणि केल्या जाणाऱ्या विक्री करारांमध्येच पार्किंगचा सर्व तपशील असलेले जोडपत्र जोडणे बंधनकारक केलेले आहे.