मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अॅन्टेलिया स्फोटक प्रकरणात कोठडीत असणार्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे.
Read More
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार असून १५ दिवसांत प्रार्थमिक चौकशीचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. परमवीर सिंह यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते.
"ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, सन्मानाचे धिंडवडे निघाले आहेत. या सर्व घटनांचा अहवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून मागवावा व त्याची सत्यता तपासून तो राष्ट्रपतींकडे पाठवावा", अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी केली.
महिला अत्याचाराच्या घटना ह्या, विकृतांना अत्याचाऱ्यांना पाठीशी घालण्याच्या धोरणांमुळे वाढत आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. 'शक्ती' कायदा लागू करण्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरीही बलात्काराच्या घटना काही थांबलेल्या नाहीत. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी सामुहिक बलात्काराची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. नराधमांनी १३ वर्षीय मुलीला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाताच गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर!
आघाडी सरकारचा अभिव्यक्ती विरोध अधिकाधिक स्पष्ट होत जातो आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाने ‘कलम १४४ ’खाली सोशल मीडियावर निर्बंध घालण्यासाठी काढलेला आदेश सरकारच्या अभिव्यक्ती दबाव धोरणाचे प्रतिबिंब आहे.