(Safety Rules for Two Wheelers) रस्ते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी तसेच दुचाकी वाहनचालकांच्या सुरक्षितेसाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जानेवारी २०२६ पासून देशात उत्पादित होणाऱ्या सर्व दुचाकी वाहनांमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) अनिवार्य करण्याची तसेच, नवीन बाईक खरेदीवर दोन BIS प्रमाणित हेल्मेट्स देणे अनिवार्य असणार आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे.
Read More
भारतात २०२२ साली ६६ हजार ७४४ लोकांचा हेल्मेट आणि सीटबेल्ट न वापरल्याने रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हा आकडा रस्ते अपघातातील एकूण बळींच्या ४० टक्के आहे, असे केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या ‘भारतातील रस्ते अपघात २०२२’ या अहवालात दिसून आले आहे.
मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी एक नवा नियम लागू केला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर दुचाकी चालवत असाल तर, हा नवा नियम तुम्हाला लागू होऊ शकतो. मुंबईकरांना दुचाकी चालवताना आता पुढच्यासह मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.
नाशिक शहरात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत म्हणजेच केवळ ९० दिवसांत ३७ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. या ३७ पैकी ३४ दुचाकीस्वार हे केवळ हेल्मेट परिधान न केल्यामुळे मृत्युच्या कवेत ओढले गेले आहेत