देशात हवाई प्रवासी सुविधेसाठी स्वतंत्र हेलिकॉप्टर संचालनालय स्थापन करणार असल्याची घोषणा आज येथे नागरी उड्डाण खात्याचे केंद्रीय मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी केली. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकार, पवन हंस आणि फिक्की (FICCI) यांच्या सहकार्याने ७वी हेलिकॉप्टर आणि स्मॉल एअरक्राफ्ट परिषदचे पुण्यात आयोजित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेला नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाले होते.
Read More
संरक्षण सामग्रीचा सर्वात मोठा आयातदार अशी कोणे एकेकाळी ओळख असलेल्या भारताने, आज जागतिक पातळीवर संरक्षण सामग्रीचा एक प्रमुख निर्यातदार म्हणून नावलौकिक सिद्ध केले आहे. २०२३ मध्ये भारताने ८५ देशांना संरक्षण सामग्रीची निर्यात केली. देशांतर्गत उत्पादनसुद्धा एक लाख कोटींच्यावर पोहोचले. एकूणच या धडाकेबाज कामगिरीमुळे भारताची संरक्षण क्षेत्रातील वाटचाल ‘आत्मनिर्भरते’कडे सुरू झाली आहे, त्याचाच घेतलेला हा आढावा...
सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाचा भाग म्हणून केंद्र सरकारने २.२३ लाख कोटी रुपयांच्या संरक्षण खरेदी प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यामध्ये 97 तेजस हलकी लढाऊ विमाने आणि 156 प्रचंड लढाऊ हेलिकॉप्टर खरेदीचा समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवर असलेली एक कोर आता चीनच्या विरुद्ध आक्रमक कोर म्हणून काम करेल. याशिवाय काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी अभियानामध्ये गुंतलेल्या सैनिकांना आता काढून लडाखमध्ये पाठवण्यात आले आहे. आता भारताची आक्रमक सतरा कोर चीनवर हल्ला करण्याकरता सज्ज झालेली आहे. यामुळे चीनला प्रत्युत्तर देण्याची क्षमता पुष्कळच वाढली आहे.
सॅन डिएगोच्या उत्तर बेटातील अमेरिकेच्या नौदल एअर स्टेशनवर आयोजित कार्यक्रमात हेलिकॉप्टर अमेरिकी नौदलाने औपचारिकपणे भारतीय नौदलाला दिले.दशकापेक्षा जास्त कालावधीच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी अमेरिकेतून भारताला दोन एमएच -६० मल्टी-रोल हेलिकॉप्टर (एमआरएच) मिळाले. भारतीय नौदलाने अमेरिकेच्या नौदलाकडे ठेवलेल्या आदेशाच्या ओळीत हे दोघे पहिले आहेत.
भारताने बोईंक कंपनीकडे चार वर्षांपूर्वी २२ अपाचे हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी नोंदणी केली होती
अमेरिकेकडून तब्बल २४ अँटी सबमरीन ‘रोमियो’ हेलिकॉप्टर खरेदी करण्याची इच्छा भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे.