Devendra Fadnavis साधी राहणी उच्च विचारसरणीचा अंगीकार करीत हशुजी अडवाणी यांनी समाजसेवेसाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. त्यांचा जन्म पाकिस्तानातील सिंध प्रांतात झाला. देशाची फाळणी झाल्यानंतर फाळणीच्या वेदना सोसत निर्वासित म्हणून नव्या भारतात आलेल्या हशुजी यांनी समाजसेवेसाठी केलेले कार्य अतुलनीय आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.
Read More
‘लव्ह जिहाद’चा वाढता विळखा आणि मोबाईलचे व्यसन हे दोन विषय एकमेकांना संलग्न असून त्यावर विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. त्याअंतर्गत रविवार, दि. 9 एप्रिल रोजी मयुरेश्वर प्रतिष्ठानतर्फे हशू अडवणी मेमोरियल स्कूल, गोवंडी येथे हा उपक्रम राबविण्यात आला. त्यात सुमारे 350 विद्यार्थी सहभागी झाले होते.
भारतीय जनता पक्ष आज देशात प्रथम क्रमांकाचा राजकीय पक्ष आहे. मुंबईत पक्षाचे तीन खासदार, २० आमदार आणि ८५ नगरसेवक आहेत. पण, अर्ध शतकापूर्वी चित्र अगदी वेगळे होते. १९६७ साली पहिला आमदार निवडून आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सिंध प्रांतातला प्रचारक ते महाराष्ट्राचा मंत्री असा राजकीय प्रवास करणारे जनसंघाचे मुंबईतील पहिले आमदार हशु आडवाणी यांच्या २५व्या पुण्यतिथीनिमित्त...